आठवणी! स्मृती..! आपल्या सावलीसारख्याच असतात नाही का? कधी कधी किती अविरतपणे मनाचा पाठपुरावा करतात. काळ पुढे पुढे धावत जातो अन् वर्तमानातील क्षण भूतकाळात विलीन होत असतो. प्रत्येक क्षणाची, घटनेची आठवण निश्चीतच राहत नाही... पण घडतात अशा घटना, असतात असे कित्येक क्षण ज्यांच होतच नाही विस्मरण... आठवणींच्या गावी त्यांच घरच होऊन बसतं नाही का?
आयुष्यात चांगले,वाईट,सुखाचे,दु:खाचे, कधी गोड,कधी कटू प्रसंग घडतात त्यांच्याच तर "स्मृती" होतात अन् आपोआपच जोपासल्या जातात. चांगल्या आठवणींची आवड कोणाला नाही? त्याच तर भूतकाळातील सुख,आनंद पुन्हा उपभोगायला देत असतात, मनाला प्रफुल्लित करत असतात्...अन् मग दु:खद स्मृतींचं काय? त्यांचीसुध्दा होते ना सय.काळामुळे दु:खाची तीव्रता कमी झाली असेलही कदाचित पण अंतःकरणात सल तशीच राहते आठवणीच रुप घेऊन...!
अनेक नाती जीवनात जोडलेली असतात..त्यामुळेच तर जीवन अर्थपुर्ण होतं, रक्ताची नाती भरपूर असली तरी प्रत्येकजण या जगात अनेक नाती जोडत असतो (जोडली जातात) त्यांच स्वरुप वेगळ असतं, मग ते कधी मैत्रीचं नातं असतं...तर कधी कर्तव्याच, स्नेहाचं, ओळखीच, कधी प्रेमाच! कधी कधी जुने ऋणानुबंध असतात...तर कधी असत असं नात की ज्यांना नावच नसतं असतो फक्त जिव्हाळा, स्नेह, आपलेपणाची भावना, हाच तर नात्यातील एक वेगळा अविष्कार!
असतात अनेक आठवणी प्रत्येक नात्यातील पण जास्त करुन ज्या आठवणी असतात त्या मैत्रीच्या नात्यातील... हे एक अस नातं की ज्याच्या आठवणीसुध्दा आपल्या दु:खांच्या आठवणींना पुरून उरतात. नसतच नाव एखाद्या नात्याला..मग त्या बंधातील आठवणी, काही क्षण किती अर्थ ठेवतात ना जीवनात? वास्तविक अशा नात्यातील बर्याच घटना,क्षण यांची आठवण आपणच जपत असतो अगदी कळत-नकळत! ती प्रत्येक आठवण आपल अस्तित्व असं निर्माण करते की त्यांच वेगळेपण आपोआप जपल जातं इतक की कधी कधी व्यक्त करताना देखील शब्दांच अस्तित्व मर्यादित होतं (वाटतं).
जे मिळत नसतं त्याचचं तर हे मन मागणी करत असतं. खूप वाटत अस घडावं...आपल जीवन अशा घटनांनी (स्वप्न) घडाव्...कधी तरी एखादी गोष्ट तशी घडेल ही पण सगळ्याच नाही घडत...मग अशा घटनांच, स्वप्नांच आठवणीत रुपांतर होतं, मग केव्हातरी आठवणीच्या गावात मन जात तेव्हा होते आठवण 'बघितल होतं असचं एक स्वप्न..!'
असतात अनेक गोड स्मृती ज्यात जपलेले असतात अनमोल क्षणांचे मोती, अन् एकसारख्या आठवतात अश्या स्मृती की सगळे मोती एकत्र येऊन एक मालाचं तयार होते. स्मॄती स्मरताना का आपण मनाशी बोलत असतो? होय्..तेच तर भूतकाळात रमतं...या आठवणींच्या क्षणांच तेच तर एक आपलं हक्काच साक्षीदार असतं. त्याला स्मरतात प्रत्येक आठवणी!
या आठवणी मनात केव्हा येतील, कधी कशा येतील, कोणत्या काळी येतील याचं गणितच नाही, मर्यादाही नाहीत... येतील केव्हातरी वादळासारख्या झंझावत तर येतील कधी मंद, लहरी वार्याची झुळूकाप्रमाणे! येतील कधी सागराच्या लाटेसारख्या गरजत...तर कधी बरसतील पावसाच्या हलक्या सरीसारख्या......!
आठवणी सुखाच्या असोत की
आठवणी सुखाच्या असोत की दु:खाच्या... डोळ्यात पाणी आणतात
नाना हे खरेच रे पण काही आठवणी
नाना हे खरेच रे पण काही आठवणी अश्या असतात कि स्वतचाच राग येतो की काय मुर्खांच्या आपण नादी लागलो.
काही आठवणी अश्याही असतात कि लायकि नसलेल्यांना आपण मित्र मानले. माझा एक मित्र आहे तो हल्ली माझ्याशी कॉम्पिटीशन ने वागतो
..मी हे घेतले मी ते घेतले.... मला त्याचा कंटाळा येतो.
छान लिहले आहेस गं.
छान लिहले आहेस गं.
वाह ! मनाचा एक कप्पा अलगद
वाह !
मनाचा एक कप्पा अलगद उघडला गेला.. व अनेकानेक आठवणीचा प्रवाह सुरु झाला.... सुंदर लेखन.
पुलेशु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
भारी लेखन.... एवढं चांगलं
भारी लेखन....
एवढं चांगलं लिहिता येतं तर लिहीत रहावं माणसाने.....
छान लिवताय स्नेहा बै लिवते
छान लिवताय स्नेहा बै लिवते रहो...........
क्या बात है
क्या बात है स्नेहा..........दंडवत...(बरोबर पंचगंगेच पाणी पितेस ना रोज.)
खुप छान लिहिलयस. मागे एकदा
खुप छान लिहिलयस.
मागे एकदा कुणीतरी पाटी कोरी करण्याबद्द्ल म्हटल होतं.
हा खजीना आहे जो आपण आयुष्यातले अनमोल क्षण खर्चुन संचय करीत असतो.
दरवेळी हिरे माणकंच मिळतील असं नाही काही काचेचे खडे पण असायचे त्यात.
पण मग ते आपल्याच हातात असत की काचा ठेवायच्या की हिरे माणकं. नाही का?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
>>>दरवेळी हिरे माणकंच मिळतील
>>>दरवेळी हिरे माणकंच मिळतील असं नाही काही काचेचे खडे पण असायचे त्यात.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."