कॉलेज कट्टा भाग - अंतिम

0
0

---भाग १ व २-----
---भाग - ३-------
---भाग - ४-------
---भाग - ५-------

"ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश
सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती. सैतान जागा झाला होता.

चोवीस तास नशेत असल्यावर कुणी माणुस थोडीच राहतो. आता आयुष्याचं एकच ध्येय होतं, आणी ते म्हणजे इतकी दहशत पसरवायची की प्रेमाचं कुणी नाव जरी घेतल तरी त्याचा थरकाप उडावा. वैभवला आम्ही रुम सोडण्यास भाग पाडले होते, कारण आम्हाला कुणीच साक्षीदार नको होता. खुप रडला बिचारा आम्हाला सोडुन जाताना. अधुन मधुन तरी तो आमच्याकडे येई आणी आम्हाला सुधारण्याचा असफल प्रयत्न करी. आम्ही त्याला शिव्या देऊन हाकलुन देत असु.

आम्हाला या कामासाठी भरपुर पैसे हवे होते. रुपेशने त्याच्या नावावर असलेला एक प्लॉट कुणाच्याही नकळत विकला, आणी पुष्कळ पैसा आमच्या हाती आला.
आता आम्हाला अफेअर असणार्‍या मुलींची माहिती होती. ओळखीतल्या कुणालाही सुरुवातीला हात लावायचा नाही असं ठरलं होतं कारण त्यात पकडले जाण्याची शक्यता जास्त होती, पण वेळ आली की त्यांना पण संपवायचं होतं. सचिन कंप्युटर, पासवर्ड हॅकींग आणी ईंटरनेट यात खुपच हुशार असल्यानं त्याला मुलींचे ए-मेल/सोशल नेटवर्कींग अकाउंट्स हॅक करुन त्यांची माहिती मिळवायची जबाबदारी मिळाली. मी आणी रुपेश त्यांच्यावर पाळत ठेवणार आणी ज्या दिवशी काम करायचे असेल त्या दिवशी तुषार चारचाकी गाडी चोरणार आणी चालवणार असा प्लॅन झाला. एक महिना सर्व माहिती मिळवणे, पाळत ठेवणे, जास्त वापरात नसलेल्या चारचाकी हेरुन ठेवणे ही कामे करत होतो. या कामासाठी हत्यारे लागणार होती, पनवेलला सज्जाद नावाचा कुणी व्यक्ती अवैध रित्या हत्यारे विकतो अशी आम्हाला माहिती होती, त्यानुसार आम्ही त्याला शोधुन बरीचशी हत्यारे जमा केली. सुरे, चॉपर, गावठी कट्टे जवळ आल्यावर वेगळाच रानटी, असुरी आत्मविश्वास जाणवायला लागला होता.

सचिनने त्याची कामगिरी चोख बजावली होती. पाच मुलींची इत्यंभुत माहिती नेटवरुन मिळवली होती. मी आणी रुपेशने त्यातील तीन जणींवर पाळत ठेवुन शेवटी सर्वांनी मिळुन एक टारगेट फिक्स केलं.
"पद्मिनी केळकर. वय २१ वर्षे, उंची ५'३", पोस्ट ऑफिसजवळ सदानंद सोसायटीमधे चौथ्या मजल्यावर राहते. रोज मैत्रीणीकडे अभ्यासाच्या नावाखाली बॉयफ्रेंडला चौपाटीवर भेटते आणी रात्री उशीरा स्कुटीवर घरी जाते. घरी जाताना एका निर्जन अंधार्‍या गल्लीतुन शॉर्टकट घेते. गल्लीच्या दोन्ही बाजुला सरकारी कार्यालये आहेत आणी उंच भिंती आहेत." - मी एका ड्रॉइंग शीटवर रस्ता काढुन दाखवत बोलत होतो. मान वर करुन पाहिलं, कुणाच्याच डोळ्यात जराही भिती दिसत नव्हती.
"१ एप्रिल ला हिला संपवायचं. आणी प्रत्येक वेळी "Love is Death" ची चीट ठेवायची, म्हणजे आपला मॅसेज सर्वांना लवकर पोहोचेल." - रुपेश म्हणाला.
पुन्हा सगळा विचार करुन १ एप्रिल तारीख अंतिम झाली. ती चौपाटी कडुन निघाली की रुपेश ने मला फोन करायचा आणी तिच्या मागे यायचं. त्या निर्जन अंधार्‍या गल्लीत सचिन आणी तुषार एक तार घेऊन उभे राहतील. ती गाडीवरुन पडली की तिला खलास करायचं आणी तिथुन दोघा दोघांच्या ग्रुपने वेगवेगळ्या दिशेला निघुन जायचं आणी मग रुमवर जमायचं असा प्लॅन ठरला.

एक एप्रिल. आम्ही दुपारपासुनच दारु आणी गांजा पीत होतो. एक एप्रिलची रात्र. सगळीकडे भयाण शांतता, भुंकणारे कुत्रे, रातकिडे आणी अधुन मधुन जाणार्‍या एखाद्या ट्रकचा दुरुन येणारा आवाज यापलिकडे काहीही नव्हतं. रात्रीचा एक वाजला. माझा मोबईल वाजला आणी माझे हात थरथरु लागले.
"ती निघालीये" - एवढे बोलुन रुपेशने फोन ठेवला. ठरल्याप्रमाणे मी कुणी येउ नये म्हणुन लक्ष ठेवण्यासाठीगल्लीच्या दुसर्‍या बाजुला थांबलो, सचिन आणी वैभव तार घेवुन गल्लीच्या मध्यावर थांबले. दुरुनच मला स्कुटी येण्याचा आणी त्यापाठोपाठ पडल्याचा आवाज आला. गल्लीपासुन दुरदुर पर्यंत कुणी नाही पाहुन मी गल्ली मधे आलो. एका बाजुला पडलेली स्कुटी, दुसर्‍या बाजुला पद्मिनी आणी तिच्याबाजुला रुपेश्,सचिन आणी तुषार दिसले. ती आम्हाला मदत मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तिला तडफडताना पाहुन मला एक असुरी आनंद मिळत होता.
"अरे बघताय काय हरामखोरांनो, काढा सुरे आणी संपवा खेळ" - रुपेश खवळला. तिने ओरडायच्या आत त्याने सुरा काढला आणी सर्रकन तिच्या गळ्यावरुन फिरवला. रक्ताचे कारंजे उडाले, सर्वांनी जमेल तेवढ्या वेळा तिच्यावर सुरे, चॉपरने वार केले आणी सर्व हत्यारं एका बॅगेत भरुन तिथुन पळालो. चीट ठेवायची राहिली म्हणुन मी पुन्हा मागे फिरलो, चीट ठेवली आणी तिच्याकडे पाहुन असुरी हसलो.
दुसर्‍या दिवशी पेपरात बातमी होती - '२१ वर्षाच्या तरुणीची निर्घृण हत्या. पोलिसांचा प्रियकरावर संशय'
"म्हणजे आपली चीट मिळाली नाही की कुणी पाहिली नाही, साला तिचा बॉयफ्रेंड आपलं क्रेडीट घेऊन नको जायला" - मी
"मिळेल मिळेल, नक्की मिळेल. या वेळी नाहीतर पुढच्या वेळी" - तुषार. सर्वजण पुन्हा राक्षसी हसले.

सचिनने पुढची तारीख एका सुत्रावर काढायची आयडीया दिली. ज्या तारखेला खुन केला त्या तारखेची आणी महिन्याची बेरीज करायची आणी जी टोटल येईल त्या तारखेला पुढचा खुन करायचा. १ एप्रिल च्या पुढची तारीख होती ५. ५ मे, टारगेट - विशाखा नाईक, वय २६ वर्षे, कॉल सेंटरमधे नोकरी करते, टॉप फ्लोरच्या फ्लॅटमधे एकटीच राहते, वीकेंडला बॉयफ्रेंड मुंबईवरुन येतो. पाच तारखेला नाईट शिफ्टला आहे, पहाटे पाच वाजेपर्यंत घरी येईल. गॅलरीचं दार कधीच बंद नसतं. ती घरी यायच्या आधी टेरेसवरुन फ्लॅटच्या गॅलरीत उतरायचं आणी तिच्या घरात लपुन बसायचं. बेशुद्ध करण्यासाठी लागणारं क्लोरोफॉर्म आम्ही एका सरकारी हॉस्पिटलच्या बेवड्या वॉर्डबॉयकडून मिळवलं होतं.
सव्वा पाच वाजता ती दरवाजा उघडुन आत आली. मी बेडरुमच्या दरवाज्याआड क्लोरोफॉर्म लावलेला टॉवेल घेऊन उभा होतो. ती आत येताच मी तिच्यावर झडप घातली आणी रुमाल तिच्या तोंडावर दाबुन ठेवला. क्लोरोफॉर्मची मात्रा कमी पडली होती त्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध झाली होती पण काही करण्या इतपत नक्कीच शुद्धीत नव्हती. ती बेडवर पडली होती आणी आम्ही बेडच्या बाजुला उभे होतो.
"मला हिला आणखी एक शिक्षा द्यायचीये" - तुषार म्हणाला आणी त्याने तिचा बलात्कार केला, ते पाहुन सर्वच जणांनी हा प्रकार केला आणी तिचाही खेळ संपवला.

७ खुन केल्यावर आम्ही भलतेच सराईत झालो होतो. खुन झालेल्या व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नसल्याने आणी कॉलेज स्टुडंट अशी ओळख असल्याने आमच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड होते. पण "Love is Death" मुळे सिरीयल किलर्स हा प्रकार करताहेत हे सिद्ध झाल्यावर पोलिसही सतर्क झाले होते आणी आम्हीही. पेपरातल्या बातम्या वाचुन आम्हाला खुप आनंद होत होता. आपल्याला कुणीही पकडु शकणार नाही असा आत्मविश्वास वाढु लागला होता. सर्वजण विक्षिप्त बुद्धीचे झाले होते. दरम्यान तुषारचे स्केच प्रसिद्ध झाले म्हणुन तो थोडे दिवस मुंबईला निघुन गेला.

"माणसाला मरताना पण मजा येत असणार, आपण खुन केला तेव्हा पोरी कशा उगाच ओरडायच्या, पण मग शांतता, कायमची गाढ झोप. मग काहीच दुखत नाही." - मी. रुपेश, सचिन आणी मी एका निर्जन टेकडीवर बसलो होतो.
"ए सचिन. आम्ही तुला मारतो आणी मग तु कसं वाटत ते आम्हाला सांग हा" - रुपेश.
आम्ही सचिनला धरुन आडवा केला, मी त्याच्या छातीवर बसलो, रुपेशने त्याचे हात धरले.
"शशSSSSSSSSSSSSSSशश, तुला काहीही त्रास होणार नाही, तु शांत पडुन रहा" - असे म्हणुन मी दोन्ही हातात सुरा धरला आणी त्याच्या छातीवर टेकवला.
"बघ तुला काही त्रास होणार नाही" - असे म्हणत मी हळुहळु सुरा त्याच्या छातीत रोवत गेलो. सचिन शेवटचं कण्हला आणी त्याने डोळे मिटले.
"बघ. कसा शांत झोपलाय ते. लोकं उगाच मरायला घाबरतात." - रुपेश.
सचिनच्या पायाला दोरी बांधुन दोघांनी त्याला ओढत टेकडीच्या खालपर्यंत आणला. समोर पोलिस उभे होते. आम्ही दोघे पुन्हा टेकडीकडे पळत सुटलो. पोलिस आमच्या मागे होते. पळता पळता ठेच लागुन मी पडलो, कुणीतरी डोक्यावर हतोडा मारल्यासारख वाटलं.

सचिनने कायमचे डोळे मिटले होते. तुषार मुंबईवरुन कधी परतलाच नाही. बापाने खुप सारा पैसा ओतल्यावर रुपेश केसमधुन सुटला. आता निवडणुक लढवण्याची तयारी करतोय.

आणी मी, मी अजुनही कॉलेजात जातो, सगळे लेक्चर पुर्ण अ‍ॅटेंड करतो, अभ्यास करतो. प्रेरणा कॉलेजला येण्याची वाट बघतो.
इथले लोकं वेडेच आहेत. मला म्हणतात हे कॉलेज नाही, वेड्यांच ईस्पितळ आहे.

समाप्त.

टीप: कथेतील सर्व पात्र, घटना व नावे काल्पनिक आहेत.

( निवेदनः वेळेच्या अभावी कथेची मांडणी आणी लेखनशैली याकडे लक्ष कमी दिले गेले आहे, मनात आलं तसं लिहित गेलो. कथेत काही चुका असल्यास निदर्शनास आणुन देणे.)

आपला,
मराठमोळा

चांगली रंगवली आहे कथा

1

चांगली रंगवली आहे कथा हास्य

छान लिहले आहेस रे...

2

छान लिहले आहेस रे... !

माणसाच्या मनातील द्वेष कधी राक्षसाचे रुप घेईल सांगता येत नाही हेच खरं !
पण शेवट खुप वेगाने गुंडाळला गेला आहे की काय असे क्षणभर वाटले...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+ १

3

तंतोतंत असेच म्हणतो.

मस्त........ राजेशी

4

मस्त........

राजेशी सहमत..........

मस्तं रे वेगळाच विषय पण छान

5

मस्तं रे वेगळाच विषय पण छान हाताळला आहे. शेवटचा भाग का बरं इतक्यात गुंडाळला थोडा अजून चालवला असतास तरी चालला असता.


-पुण्याचे पेशवे

मस्त

6

मस्तच झालाय भाग,
कथा मालिका छान रंगली होती.!

जबरदस्त ..... भाषाशैली अन

7

जबरदस्त ..... भाषाशैली अन प्रसंगज्ञान उत्तम मांडलय...!!! (पण) पहिला ते पाचव्या भागापर्यंत आलेला तो थरार,रोमांच अन उत्सुकता ह्या भागात कुठेतरी हरवल्या सारखी वाटली...!!!


जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...

मस्त रे मस्त..

8

मस्त रे मस्त.. हास्य

आवडली रे कथा, ममो.

9

आवडली रे कथा, ममो.

अरे पुन्हा लिहतो म्हणाला

10

अरे पुन्हा लिहतो म्हणाला होतास ना रे ही कथा ?
काय झाले त्याचे ?


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुन्हा नको.........एकदम मस्त

11

पुन्हा नको.........एकदम मस्त जमलीय. पुन्हा लिहायला गेल तर हीच भट्टी जमेल अस नाही.

सुंदर लिखाण

जबरा

12

एकदम अंगावर येणारा शेवट.
ममो आम्हाला ही कथा अशीच आवडली. मुळीच पाणी घालू नकोस. शेवटचा भाग आयुष्यातील एक निर्णायक वळण म्हणून आला आहे, हे वळण घेताच समोर शेवट येतो हेच चांगले. ती धक्कादायक परिणती हेच तर कथेचे बलस्थान आहे. आणखी विस्तार केला तर परिणामाची तीव्रता कमी होईल.