२००९च्या ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्याला दोरखंडाचे सहाय्य लागेल.
काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा.
डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता. त्याला पट्ट्याच्या साह्याने वर काढून दोघेजण खांद्याचा आधार देत खाली घेऊन आले होते.
ट्रेकची तयारी क्लबने एका ट्रेकिंग / ईव्हेंट जमवणार्या कंपनीस दिली होती सो तयारी चा काही त्रासच नवता. (खरं तर ट्रेकची तयारी हा ट्रेकचा सगळ्यात मजेशीर भाग आहे.) आम्ही काही लोक ठाण्यातून, काही दादर तर काही वाशी असे निघालो.
ह्या ट्रेक साठी मुंबई - अहमदाबाद हा राजमार्ग घ्यावा लागतो. सफाळे च्या पुढे एका ठिकाणी डावीकडे वळाले की १०-१५ मिनिटाच्या अंतरावर तांदूळवाडी गाव लागते.
(मुंबई - अहमदाबाद राजमार्गावरून दिसणारा तांदूळगड - धुक्यात न्हालेला)

गडाच्या पायथ्याला पोचून चहा-नाश्टा केला. प्रत्येकाला स्वतःचे खाण्याचे डबे मिळाले आणी १०-१५ जणांचे कंपू करून सर्वांनी ट्रेक ला सुरूवात केली.
(पायथ्याहून दिसणारा तांदूळगड)

साधारण एक तृतियांश टप्पा पाऊण-एक तासात पार झाला की खालील दृश्य दिसते. हा चढा टप्पा पार केला की वर सांगितलेला इकडे डोंगर तिकडे दरी वाला प्रवास चालू होतो.

मस्त आरामात एक एक टप्पा पार करत टवाळक्या करत , प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत आंम्ही आडीच-तीन तासाने वर पोहोचलो. एकसलग केला तर हा गड दोन तसात चढता येतो.
हा गड शिवरायांच्या काळात मुलुखावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असल्याने यावर इमारती जवळजवळ नाहीतच.
एक तळे आहे सध्या फक्त आणी थोडे भग्नावशेष. खाली गडावरील अथवा टप्प्यांवरील काही छायाचित्रे.
(आंबेहळद)

काटेसावर

इतकी छान हिरवळ होती कि तिथल्यातीथे मस्त लोळून घ्यावे वाटत होते...वाराही मस्त सुटला होता..थोडा बोचराच...उडून जाउ की काय वाटत होतं..पण काय ती गवताची सळसळ....मन खुष करून गेली.

हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे !

हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे ! - गडाच्या दुसर्या बाजूने

गडमाथ्यावरून वैतरणानदीचा खूपच सुंदर आणी विस्तीर्ण नजारा दिसतो.

गडमाथ्यावरच एक बोडकं झाड होतं...आधी रायगडावर आणी आता भर पावसाळ्यात बोडकं झाड बघून खरं तर अचंबाच वाटला.

गडावरील काही आधुनीक प्रेमविरांचे नक्षीकाम

गड चढताना बारीक बारीक पाउस पडत होता..नव्हता म्हटले तरी चालेल..जेवण करून गड भटकून आणी थोडे टीम बिल्डींग गेम खेळून झाल्यावर उतरताना मस्त पाऊस पडायला सुरूवात झाली. चढताना ज्या दोन खडकाळ पॅच ला दोरखंड बांधले होते ते उतरताना शेजारच्या गावातील तरूण चोरून घेउन गेले. पोरींची आणी नॉनट्रेकर्सची पंचाईत झाली. त्यात एकजण एक पॅच उतरताना पाय मुरगाळून बसला. त्याला एक ऑर्गनायजर आणी आम्ही तीन मित्रांनी खांद्याचा अधर देउन खालपर्यंत उतरवले.
गड उतरल्यावर मस्त चहा-भजीचा पोटोबा करून घरी परतलो...जाता -येता बसमधे सुंदर ललनांच्या साथीत अंताक्षरी खेळताना वेळ कसा गेल हे समजलेच नाही.
सही रे..!!
वा वा !! एकदम छान...
आंबे हळद ,काटेसावर अन आधुनिक प्रेमींची कलाकृती खूपच भावली...... तुम्ही फिरत राहा अन (हो) आम्हाला(न चुकता)फोटो दाखवत राहा....
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
धन्यु हो...
धन्यु हो...
अर्रे फक्त २ फोटो दिसत आहे
अर्रे फक्त २ फोटो दिसत आहे बाकी सगळी कडे रेड क्रॉस
अर्र..का म्हणे??? मला सगळे
अर्र..का म्हणे???
मला सगळे दिसताहेत फोटो.
अग्ग्गाग्गा ! लै भारी रे.....
अग्ग्गाग्गा !
लै भारी रे.....
जबरदस्त फोटु मज्जा आली बघतानाच.
काटेसावर
ओह !
ह्यांचे नाव काटेसावर आहे काय.........
दुश्मनी बहुत पुरानी है... ठाकूर !
लिहू कधीतरी ह्यावर पण
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यु रे..... लवकर लिहा..
धन्यु रे.....
लवकर लिहा..
मस्त फोटो आहेत.
मस्त फोटो आहेत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
धन्यवाद रे पाभे.
धन्यवाद रे पाभे.
मस्त
मस्त फोटो.
धन्यवाद.
धन्यवाद.
सुंदर आले आहेत फोटो.
सुंदर आले आहेत फोटो.
धन्यवाद अस्मिता.
धन्यवाद अस्मिता.
लैच फिरलाय ल्येका. आता
लैच फिरलाय ल्येका. आता अहमदाबाद हायवे खरंच राजमार्ग झालाय पण!
बाकी कंपूबाजी सगळीकडेच करता तर तुम्ही?
हे काहीच नाही बे.....आधीचे
हे काहीच नाही बे.....आधीचे अजून टाकले नाहीयेत...
कंपू हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे..
फोटो मस्तच रे.
फोटो मस्तच रे.
धन्यवाद रे ममो.
धन्यवाद रे ममो.
लै भरी
लै भरी
धन्यु रे नान्या... चौपाटी
धन्यु रे नान्या...
चौपाटी काय म्हणतेय सध्या???
एय काय वात्रटपणा आहे असा अधीर
एय काय वात्रटपणा आहे असा अधीर बाळे असल्यासारखा काय प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद देत आहेस ?
तुला समजला ना... चल, भेळ
तुला समजला ना...
चल, भेळ खायला जाऊ....राजे, परा कुठायत??
मी पण हेच विचारणार होतो पण
मी पण हेच विचारणार होतो पण म्हणालो असू दे देतो ना प्रतिसाद म्हणून गप्प बसलो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>असू दे देतो ना
>>असू दे देतो ना प्रतिसाद
हलकट..
ख्या ख्या ख्या !
ख्या ख्या ख्या !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कृपया गप्पांसाठी खवचा वापर
कृपया गप्पांसाठी खवचा वापर करावा
कोण आपण?? धन्यवाद.
कोण आपण??
धन्यवाद.
कळेल लवकरच. धन्यवाद नाही
कळेल लवकरच.
धन्यवाद नाही
वोक्के..
वोक्के..
>>कळेल लवकरच.
अंतरजालाला न सुटलेले कोडे मला सुटणार...
फक्त ते सुटल्यावर काड्यांची
फक्त ते सुटल्यावर काड्यांची गरज न पडो ||प्रभो||
पाध्यांचे फटके खाऊन नानू
पाध्यांचे फटके खाऊन नानू आजकाल उपहास विसरला की काय????
ते मी स्वत:लाच उपहासात्मक लिहहिलं होतं..
उपहास मी विसरेन ? शक्य नाही.
उपहास मी विसरेन ? शक्य नाही. फक्त तुझा खांदा वापरला. दुखलं नाही ना?
लै पोचलेला आहेस तू..हे आम्ही
लै पोचलेला आहेस तू..हे आम्ही जाणून आहोत.....
खांदा वापरल्याबद्दल एक चपटी पाठवून द्या...(२ थेंब त्या ररा आणी मेव्याचा साईडला उडवा आधी.. )
आभार
त्या ररा आणी मेव्याचा साईडला उडवा आधी..
टाईमप्लीज, २ थेंब म्हणजे प्रत्येकी दोन की एकूण दोन, म्हणजे एक माझा नि एक मेव्याचा?
(मणिलाल) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
चपटी थेंबा-थेंबानी मोजणारे
चपटी थेंबा-थेंबानी मोजणारे तुम्हीच.. उगाच नाय म्हणत तुम्हाला शेट आम्ही
नाना को भी क्या याद करोगे तुम, आंय.....(कालच अग्नीपथ पाहिला... ) दोघांकडे २-२ थेंब उडवण्यात येतील...
कृपया सभासदांना
कृपया सभासदांना आडून/पलिकडून्/अलिकडून धमक्या देऊ नयेत...
कृपया आमची न्यु ध्येय धोरणे शोधा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धोरणे
कृपया मोघम उल्लेख नकोत. लिंक द्या.
कारण धोरणांवरुन धो धो रण होतात.
(धोरणी) अवलिया
सर्वात शेवटी पहा.
सर्वात शेवटी पहा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
क्या बात
क्या बात, क्या बात.
थोडे टीम बिल्डींग गेम खेळून झाल्यावर...
च्यायला एवढी मस्त हिरवाई नि अंताक्षरी खेळणार्या कन्यांना घेऊन टीम बिल्डिंग कसले डोंबलाचे करतोयस रे. छ्या. तुझा गजा खोत झाला रे. (समोरून हजार हृदये पायदळी तुडवित जाणारी पोरगी जात असावी नि त्याच वेळी हा डेपोकडे निघालेल्या रिकाम्या बसकडे बघत असावा.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आम्ही टीम बिल्डींग खेळलो असं
आम्ही टीम बिल्डींग खेळलो असं वाटलं का तुमास्नी??? हॅहॅहॅ.....
कसंचं क्संचं......आम्ही कंपनीचं एक पण काम सरळ करत नाही....
मोकळ्या वातावरणाचा फायदा घेत आम्ही नजरसुख घेत होतो.... (कोणतं ते सांगत बसत नाही... )
प्रभो..
अप्रतिम
अप्रतिम
च्यायला हापिसात फक्त २च फोटू
च्यायला हापिसात फक्त २च फोटू दिसत होते. म्हणून घरी येउन पहिल्याम्दा हा धागा उघडला...
फोटो लै भारी आलेत राव.
गुर्जी, पिकेपिलाच आहात काय? व्यनी करतोय.
मस्त...
मस्त...