अंगार चित्तवेधी - गझल

0
0

अंगार चित्तवेधी

दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी
नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो?
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले
दु:ख्खा खरेदणारा बाजार चित्तवेधी

आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची
इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी

आगीत खेळतांना, सुर्यास छेडतो मी
कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी

गंगाधर मुटे
---------------------------------------
.. रानमेवा ..

आगीत खेळतांना, सुर्यास छेडतो

1

आगीत खेळतांना, सुर्यास छेडतो मी
कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी

क्या बात है मुटेसर

ती बोलली तरी का शब्दास नाद

2

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो?
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे
मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी

वा !

मस्तच..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त आहे गझल. कानास पीळणारा

3

मस्त आहे गझल.

कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

वेगळेच चित्र डोळ्यासमोर आले.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्तं . चित्तवेधी कविता आहे.

4

मस्तं . चित्तवेधी कविता आहे.


-पुण्याचे पेशवे

छान

5

छान हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त

6

मस्त हास्य

उत्तम गझल. नाहीच राग येतो,

7

उत्तम गझल.

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

यातील कल्पना थोडी अस्पष्ट वाटते.

दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले
दु:ख्खा खरेदणारा बाजार चित्तवेधी

सुरेख!!


- प्राजु

फटका हवाहवासा

8

नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा
कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी

माझ्या चुकांवर तू पांघरून न घालता, माझे कान पिळून मला फटकारतोस ना,त्याचा मला मुळीच राग येत नाही उलट असे फटकारणेही मला हवेहवेसे वाटते.(त्यामुळेच तर माझे जीवन अधिकाअधिक समृद्ध होत आहे.) असा जो फटका (फणकार) तो लक्षवेधी ठरतो किंवा मला चित्तवेधी वाटतो.

असा काहीसा अर्थ.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

गझल

9

सुंदर आहे! हास्य

वा

10

चांगली. पहिली द्विपदी - आजार चित्तवेधी हे - पटले नाही. सूर्यविषयक द्विपदी सकस!

नजरेत गुंतणारा आजार

11

नैनोसे नैना मिलानेकी बिमारी ... चित्तवेधीच असते हो श्रावणजी. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.