आमच्या मार्लिसकाकू हानोफरच्या, त्यांच्याकडे कॉफीला गेलो असताना त्यांनी हा फर्मास केक केला होता. इतका अलवार केक होता की लग्गेच त्यांच्याकडून पाकृ घेतली आणि घरी आल्यावर प्रात्यक्षिके झालीच.
अदितीबै दुर्बिटणे येथे आल्या असताना हाच केक केला होता.

साहित्य-
२५० ग्राम पिठीसाखर, ५ अंडी, २ चमचे वॅनिला अर्क, १/४ लिटर आयर लिक्युअर (एग लिक्युअर),
१/४ लिटर तेल/बटर (मी बटर वापरले परंतु मार्लिसकाकूंनी तेल वापरुन केलेला केकही अप्रतिम होता.)
१२५ ग्राम मैदा, १२५ ग्राम आरारुट/पोटॅटो स्टार्च, ४ चहाचे चमचे बेकिंग पावडर,चिमूटभर मीठ
कृती-
पीठीसाखर,अंडी, वॅनिला अर्क एकत्र करणे व भरपूर फेटणे. त्या मिश्रणात २५० मिली एग लिक्युअर, २५० मिली तेल किवा २५० ग्राम बटर पातळ करुन घालणे व हलक्या हाताने फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ पोटॅटो स्टार्च एकत्र करणे, त्यात चिमूटभर मीठ घालणे व हे एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे.
१७५ अंश से. वर ३० मिनिटे बेक करणे व नंतर १५० अंश से वर २५ ते ३० मिनिटे बेक करणे.
विणायची सुई किवा सुरी केकच्या पोटात खूपसून पाहणे जर मिश्रण चिकटले नाही तर केक झाला आहे असे समजावे.
केक झाला असला तरीही ३/४ मिनिटे तो अवनमध्येच राहू देणे.
नंतर जाळीवर काढून घेणे व गार झाल्यावर तुकडे करणे.
वॉ ! मस्त फोटो ! जबरदस्त !
वॉ !
मस्त फोटो !
जबरदस्त !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पाणी सुटले
स्वातीबै, तोंडाला पाणी सुटले हा सुंदर केक पाहून
खूप छान. मनापासून आवडला. कृती सविस्तर असल्यामुळे खूप छान सोय झाली माझ्यासारख्या खादाडमाऊंची
(खादाडमाऊ) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
(विषय दिलेला नाही)
राकलेट विसा साठी दाखला भरावा
राकलेट विसा साठी दाखला भरावा म्हणतो..
यम्म्म्म्म्मीय्य्य्यम्म्मीय्य
यम्म्म्म्म्मीय्य्य्यम्म्मीय्य्यम्म्म्मीय्यम्म्म्म्मीययम्म्म्म्म्मी
स्वती भारतात कधी येणार ग तू???
केकचे नाव कसले भारी..
केकचे नाव कसले भारी आहे...
नाव घेतांना जेभेचे तुकडे पडले...