समाजवादी
भारत हे समाजवादी राष्ट्र असावे काय ?
http://timesofindia.indiatimes.com/India/SC-refuses-to-dump-socialism-st...
१९९१ साली डा. मनमोहन सिन्ग यान्नी लायसेन्स - परमीट राज सम्पवले. बाजारपेठिय अर्थ व्यवस्था सुरु केलि. तेव्हा कोन्ग्रेस समाजवादि नाहि, भाजपा एकात्मिक मानवता वाद आणि हिन्दुत्व मानतो. एकात्मिक मानवता वाद हा समाजवाद आणि भान्डवल वाद यान्च्या विरोधी आहे असा रा. स्व. सन्घाचा दावा आहे. भाजपा पण त्याबद्दल होय नाहि करत अस्तो.
जदयु, जदसे, राजद, लोजशपा, सपा, बसपा, फो.ब्लो., राष्ट्र्वादि कोन्ग्रेस हे व्यक्ति निष्ठ पक्ष आहेत. पण बरेचसे समाजवादि आहेत. येत्या १० वर्षात त्यातले काहि (कदाचित) नामशेष होतिल.
शिवसेना, मनसे, ADMK, AIADMK, तेलुगु देशम, आसाम गण परिषद, अकालि दल, PDP इत्यादि बहुतेक प्रादेशिक आहेत.
कम्युनिस्ट पक्ष उतरन्डि वर आहेत. मग समाजवादाला वाली (तारणहार) कोण ?
दरम्यान बाजारपेठिय अर्थ व्यवस्था जोरावर आहे.
मग भारत हे समाजवादी राष्ट्र असावे काय ?
.jpg)
काही प्रश्न
१९९१ साली डा. मनमोहन सिन्ग यान्नी लायसेन्स - परमीट राज सम्पवले.
मला एक पेट्रोल-पंप काढायचाय, जागाही आहे. होताय का पार्टनर? फक्त ते परमिट्चे बघा बरं.
भाजपा एकात्मिक मानवता वाद आणि हिन्दुत्व मानतो.
एवढा अंतर्विरोध असलेलं वाक्य आजतागायत माझ्या वाचण्यात नाही. हिंदुत्व हे धार्मिक किंवा भाजपा तोंडदेखले म्हणते तसे 'आसिंधुसिंधुपर्यंता...' वगैरे व्याख्येने घेतले तरी ते विशिष्ट - धार्मिक वा प्रादेशिक - समुदायाच्या अस्मितेशी निगडित आहे. असे असता एकाच वेळी दोन्ही मानणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. अर्थात भाजपातर्फे असे कधी म्हटल्याचे माझ्या स्मरणात नाही. (मी भाजप समर्थक नाही!)
कम्युनिस्ट पक्ष उतरन्डि वर आहेत.
कोणत्या 'उतरंडीवर' आहेत. तसे सगळेच कुठल्या ना कुठल्या उतरंडीवर असतात. (तुम्हाला 'उतरणीवर' म्हणायचे असावे.). आणि कम्युनिस्ट हे 'समाजवादी' आहेत???
मग समाजवादाला वाली (तारणहार) कोण ?
समाजवादीच!!!. ते संपले तर तो इझमही संपेल.
दरम्यान बाजारपेठिय अर्थ व्यवस्था जोरावर आहे.
बरं मग? आणी याचा समाजवादाच्या चढ-उताराशी काय संबंध?
मग भारत हे समाजवादी राष्ट्र असावे काय ?
नसावे! समाजवादच काय कोणताच एक वाद स्वीकारून इतर इझमची चांगली तत्त्वे नाकारण्याचा करंटेपणा करू नये.
बाकी तुम्ही लिहिलेल्या "पण बरेचसे (पक्ष) समाजवादि आहेत" या वाक्याचे दोन अर्थ मला लागतात. एक तुम्हाला समाजवाद म्हणजे काय हे नक्की माहित आहे नि दोन बरेच पक्ष त्या व्याख्येनुसार समाजवादी आहेत. पैकी अर्थातच मी दुसर्या अर्थाशी पूर्ण असहमत आहे. खरेतर फारच थोडे समाजवादी आहेत (म्हणजे तसे म्हणवतात, धोरणात्मक दृष्ट्या आज एकही समाजवादी पक्ष अस्तित्वात नाही!)
(समाजवादाचा चाहता) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आम्ही पण समाजवादाचे चाहते
आम्ही पण समाजवादाचे चाहते आहोत.
(ररा या प्रतिसादात तुमच्या बद्दल काही लिहीलेले नाही हां. फक्त तुम्ही चाहते तर आम्ही पण चाहते. असे अनुमोदन आहे)
-पुण्याचे पेशवे
हो
हे तुम्ही न लिहिताही तुमच्याबद्दल हे आम्हाला ठाऊक होतेच
.
आमची कोटी (खालील प्रतिसाद पहा) ढापून आम्हाला श्रेय न दिल्याबद्दल निषेध.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ररांना गृहपाठ दिला जात
ररांना गृहपाठ दिला जात आहे..
समाजवाद ह्यावर किमान एक पान लेख लिहा.. अन्यथा एखाद्याचे पाणी तोडतात तसे पुढच्या प्यार्टीला योग्य ते पेय तोडले जाइल.
(पंतोजी) अर्धवट
तोडपाणी
मास्तरांच्या घरी नारळ नि मासळी पोचती केली तर काही सवलत मिळेल का? पेय तोडणे ही फार मोठी शिक्षा आहे हो. आणि एका पानात काय डोंबलं लिहिणार हो.
अवांतरः आम्ही गमतीने म्हणायचे की इंग्रजीतल्या प्रमाणे मराठीत 'अनुच्चारी व्यंजने' (जसे न्युमोनिया चे स्पेलिंग अनुच्चारी पी ने सुरू होते) असतात का या प्रश्नाला असतात असे उत्तर देऊन 'समाजवादी' (वादी, वाद नाही हां) हे उदाहरण म्हणून द्यायचो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
उत्तर
परमिट राज जवळपास सम्पवले आहे. सम्पूर्ण नव्हे.
भाजपा च्या वेबसाइट नुसार ते एकात्मिक मानवता वाद आणि हिन्दुत्व मानतात. दिनदयाळ उपाध्याय यान्ची व्याख्याने ठेवली आहेत साइट वर.
समाजवाद हा सर्व्-साधारण पणे बाजार-पेठिय अर्थ व्यवस्थे ला पर्याय मानला जातो. अनेक लोक (अर्थ-तज्ञ) समाजवाद हा बाजार-पेठिय अर्थ व्यवस्थे च्या विरुद्द्ध मानतात. १९९१ सोविएत युनियन च्या विघटना पासुन कम्युनिझम चा अन्त व्हायला सुरुवात झालि. हा समाजवादाचा हि पराभव आहे. कम्युनिझम (साम्यवाद) हा समाजवादाचा अगदी जवळचा नातेवाइक मानला जातो. खरे तर तीव्र स्वरूप (समाजवादाचे).
दोघान मध्ये फरक हा कि समाजवादामध्ये लोकशाहि असते. साम्यवादात नसते. (नियम म्हनुन नव्हे ... तर सर्व सामान्य पणे).
फारच थोडे पक्ष समाजवादि आहेत हे खरे आहे.
समाजवादातली चान्गली तत्वे सान्गाल काय?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
हम्म
समाजवाद हा सर्व्-साधारण पणे बाजार-पेठिय अर्थ व्यवस्थे ला पर्याय मानला जातो.
असहमत. समाजवाद हा बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या आधीचा आहे. तुम्हाला 'भांडवलशाही' अपेक्षित आहे की 'खुली अर्थव्यवस्था' यावर ते अवलंबून आहे. आणि समाजवादाचा पाया हा बाजारपेठ किंवा हा रोजगारनिर्मितीची साधने हा नाही, त्यामुळे आमच्या मते अशी तुलना गैरलागू.
१९९१ सोविएत युनियन च्या विघटना पासुन कम्युनिझम चा अन्त व्हायला सुरुवात झालि.
हा समाजवादाचा हि पराभव आहे.
रामा शिवा गोविंदा. माणसे बदलतात पण तर्क तेच नि तसेच एकांगी राहतात. या दाव्याचा इतक्या वेळा प्रतिवाद केला आहे की आता कंटाळा आलाय. केवळ एखाद्या राष्ट्रातून एखादा इझम हद्दपार झाला हा जर पूर्ण तत्वज्ञानाचा पराभव मानला तर जगातील सगळी तत्वज्ञाने पराभूतच आहेत नि असतील. सध्या एवढे पुरे.
कम्युनिझम (साम्यवाद) हा समाजवादाचा अगदी जवळचा नातेवाइक मानला जातो.
असं कोण मानतं? समाजवादाचे विरोधक की समर्थक.
चला गरजेपेक्षा फारच जास्त बोलतोय मी. बाकीचे मुद्दे सोडून देतो. आपण आपले चड्डीत रहावे हे बरं.
जाताजाता: तुम्ही ज्याला समाजवाद म्हणता तो(फक्त देशीच नावे घेऊ सध्या)एम.एन.रॉय यांचा की लोहियांचा?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
भाजपा पण त्याबद्दल होय नाहि
भाजपा पण त्याबद्दल होय नाहि करत अस्तो.
ही तर त्यांची नेहमीचीच पद्धत.
एके काळी भाजपाने गांधीवादी समाजवादाचा स्वीकार करायचा निर्धार केला होता
त्यापूर्वी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राम मनोहर लोहिया यांची तत्वे काही काळ त्यानी स्वीकारल्याचा देखावा केला होता हल्ली ते मोदी वादी माजवाद स्वीकारु पहायचा विचार करत आहेत.
भाजपा बहुतेक निर्नायकी अवस्थेप्रत जात आहे. पक्ष म्हणून तो टिकेलही पण तत्वप्रणाली म्हणून त्यानी केंव्हाच कात टाकली आहे.
वाजपेयी वयोवृद्ध झाले आहेत.लोहपुरुष अडवाणी अडगळीत गेले आहेत. फायर ब्रान्ड नेत्या सुशमा स्वराज कोठे आहेत हेच कळत नाही. उमा भारतींशी पटत नाही, ठाम विचार ठाम दिशा देऊ शकणारा नेता कोणीच उरलेला नाहिय्ये पुढील निवडणूकांत मोदींच्या मागे फरफट्त जावे लागेल असेच दिसते.
बहुतेक भाजप पुढील निवडणूकांत शरद साहेबांसोबत अदृश्य तह करून गड लढवायचा प्रयत्न करेल
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
भारत हे राष्ट्र असावे की
भारत हे राष्ट्र असावे की नसावे यावर विचार करत आहे
छान
छान
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
छान
छान
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
समाजवाद आणि समाजवादी
समाजवाद आणि समाजवादी दोन्हीही तद्दन बकवास आहे.त्याच्या इतकी बावळट आणि भोगळ कल्पना जगात दुसरी कोणतीही नसेल.समाजवाद आणि समाजवद्यांपेक्षा कम्युनिस्ट परवडले.
भारत हे कधीही समाजवादी
भारत हे कधीही समाजवादी राष्ट्र होउ शकत नाही आणि होउही नये.
असहमत
समाजवाद हा बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या आधीचा आहे.
समाज्वाद जन्माला सुद्धा आल नव्हता तेव्हा बाजारपेठीय अर्थव्यवस्था होति.
केवळ एखाद्या राष्ट्रातून एखादा इझम हद्दपार झाला हा जर पूर्ण तत्वज्ञानाचा पराभव मानला तर जगातील सगळी तत्वज्ञाने पराभूतच आहेत नि असतील.
सोविएत युनिअन नन्तर अनेक राष्ट्रानि कम्युनिझम चा त्याग केला. उदा. पोलन्ड, पुर्व जर्मनि वगैरे. लटविया, लिथुआनिय वगैरे नि बाजारपेठीय अर्थव्यवस्था स्विकारलि. जवळपास सर्व पूर्व-युरोप (जो पुर्वी कम्युनिझम मानायचा) (warsaw pact countries) बाजारपेठीय अर्थव्यवस्था मानतो.
कम्युनिझम (साम्यवाद) हा समाजवादाचा अगदी जवळचा नातेवाइक मानला जातो. असं कोण मानतं? अर्थतज्ञ, राजकिय विश्लेशक.
लोहिया समाजवादि. एम. एन. रॉय साम्य वादि. (त्यानि नन्तर साम्य वादचा धिक्कार केला).
आपण आपले चड्डीत रहावे हे बरं.
का हो असे म्हणता !! मला आवडले तुमचे प्रश्न. तुमचि टिप्पणि.
'भांडवलशाही' आनि 'खुली अर्थव्यवस्था' यान्तिल फरक सान्गाल काय ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
छान
छान
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सहमत
चंद्रकांत भाउ मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
इथ्ल्या समाजाला हे झेपणार
इथ्ल्या समाजाला हे झेपणार नाही,जे चाललय ते चालूद्या..कशाला वाद-बिद घालताय
पुष्करिणी
समाजवाद म्हणजे काय ?
समाजवाद म्हणजे काय ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."