मी गेल्यावर ....?

0
0

मी गेल्यावर ....?

मी गेल्यावर माझे कोण,कशाला गुण गाईन?
मी तरी जातांना कुणास काय देऊन जाईन?

जरी माझी कातडी जाड असेल गेंड्यासारखी
पण तीची चप्पल बनते ना खेटर
केसापासून ना वारवत,ना चर्‍हाट
ना उब देणारं स्वेटर.
मी कसा कुणाच्या चिरकाल स्मरणात राहीन?

हाडेही माझी कणखर आहेत खरी पण
आयुर्वेदात उपयोग शुन्य
मी मात्र मिरवत आलो
देहाचे लावण्य
स्वर्गवाले मजकडे का आतुरतेने पाहीन?

नसलो काही देणार तरी जातांना
नवमन लाकडांची राख आणी
आणखी प्रदुषीत करणार
हवा आणि पाणी
जीवेभावे का कोणीतरी श्रद्धांजली वाहीन?

हसू फ़ुलवलं नाहीच आजवर
कधी कुणाच्या चेहर्‍यावर
मात्र नुसतच रडवणार
जातांना-गेल्यावर
स्वप्रेरणेने कोण मग खांद्यावर घेईन?

केले असतील सत्कर्म
पण असतील दोन-चार
तेवढ्याने थोडच उघडणार
स्वर्गाचं दार.
काहीतरी कर अभय
जेणेकरून मुक्तिमार्ग जरा सुलभ होईन...!!

गंगाधर मुटे
.........................................
रानमेवा

>>समसमान होईन...! येथे मार

1

>>समसमान होईन...!

येथे मार खात आहे असे वाटत आहे.. Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

किमान बरोबरी तरी

2

पाप-पुण्याचा हिशेब करतांना माझ्यासारखा साधारण व्यावहारी माणुस पापापेक्षा पुण्य जास्त मिळवेल असे वाटत नाही.
मग किमान बरोबरी तरी करावी हा उद्देश.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

बदल केलाय..

3

राजे,
थोदा बदल केलाय..


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

मस्त !

4

मस्त !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आशय चांगला आहे कवितेचा.

5

आशय चांगला आहे कवितेचा.


-पुण्याचे पेशवे

+१ हेच म्हणतो. (पण थोडी मोठी

6

+१ हेच म्हणतो. (पण थोडी मोठी झालीय का?)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान हो.

7

छान हो..डोळ्यात "आसू" च आणले कवितेने...!!!!


जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...