माझी समस्या

0
0

माझे नाव गब्बर आहे. ही माझी प्रमुख ओळख आहे.
माझी जात अमुक आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
पोट जात तमुक आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
माझा धर्म ढमुक आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
मी महाराष्ट्रिय आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
मी मराठी आहे. ही माझी आणखी एक स्वतन्त्र ओळख आहे.
मी विद्युत अभियन्ता आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
मी सन्गणक अभियन्ता ही आहे. ही माझी आणखी एक ओळख आहे.
मी एक पुत्र, पती, भाउ, जावई, मेहुणा वगैरे आहे.
अरे हो मी भारतीय ही आहे.
(मी एक दरोडेखोर सुद्धा आहे).

समस्या ही आहे की - माझी नक्की ओळख काय आहे ?

कुणी सान्गेल काय ?

या सगळ्यात मी माणुस देखिल आहे

1

या सगळ्यात मी माणुस देखिल आहे हे राहिलंच की!

आँ

2

काय सांगता काय? आणि विमो तुम्हाला हो कसे ठाऊक? की गब्बर हा तुमचा डु आयडी आहे?
(गब्बरभौ, विमो हलकेच घ्या बरं का. रागवू बिगवू नका.)

मीमचे सदस्य पण आहात हो..

3

मीमचे सदस्य पण आहात हो..

मीमचे सदस्यत्व मिळण्यासाठी

4

मीमचे सदस्यत्व मिळण्यासाठी माणुस असणं सिद्ध करायला लागतं का?

नसावं

5

हां फक्त तुम्ही १८ वर्षाहून अधिक वयाचे असलात तरी पुरते, मग तुम्ही हत्तीही असू शकता.

(विषय दिलेला नाही)

6

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मग तुम्ही हत्तीही असू शकता

7

मग तुम्ही हत्तीही असू शकता
Laughing out loud ठ्यॉ..र रा जय हो. दिवसाची सुर्वात लै भारी

--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

(विषय दिलेला नाही)

8

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

(विषय दिलेला नाही)

9

Laughing out loud

याला रराचा गणिती हलकट्टपणा

10

याला रराचा गणिती हलकट्टपणा म्हणावे काय? ;०)

-पुण्याचे पेशवे

खुलाश्या बद्दल धन्यवाद. आता

11

खुलाश्या बद्दल धन्यवाद. आता आपण मूळ मुद्द्याकडे यायला हरकत नसावी.

>समस्या ही आहे की - माझी नक्की ओळख काय आहे ?

कुणी सान्गेल काय ?<

असु द्या की काही पण. टेन्शन

12

असु द्या की काही पण.
टेन्शन घेऊ नका! :

विवेक भाऊ

13

अगदी बरोबर विवेक भाऊ.

माझी नक्की ओळख काय आहे ?

हा प्रश्न मला खुपतोय, डाचतोय, पीडतोय, सतावतोय.

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

माझी नक्की ओळख काय आहे ? >>

14

माझी नक्की ओळख काय आहे ?
>> तुमची ओळख आहे 'गब्बर सिन्ग'.
गब्बर सिन्ग हे नावच इतके मोठे आहे की अजुन ओळखीची गरज पडत नाही.

तुम्ही हे वर जे लिहिलय ते

15

तुम्ही हे वर जे लिहिलय ते सगळं आहात....
तुमच्या समोर असणार्‍या सबसेट नुसार ठरवा, कोणाला कोणती ओळख द्यायची ते...

पुष्करिणी

गब्बरसिंग यांच्या समस्येबर

16

गब्बरसिंग यांच्या समस्येबर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.ही स्मॄतीभंशाची केस आहे का आयडेंटी क्रायसिसचा प्रकार? हा आत्मशोधाचा प्रयत्न आहे काय? ओशॊ किंवा जे कॄष्ण्मूर्ती वाचल्यामूळे असे होते काय? चायनीज किंवा कोरियन लोककथेमध्ये एक मिथक आहे.त्यामध्ये विस्मॄतीच्या नदीचा उल्लेख आहे.त्यानदीमध्ये आंघोळ केलेल्या प्रत्येकाची स्मॄती जात असते.गब्बरसिंगने तसल्या तर एखाद्या नदीत अंघोळ केली नसेल?.....पण गब्बर आंघॊळ करत असेल असं वाटत नाही त्याच्याकडे बघितल्यावर.सांबाला विचारलं पाहिजे.

असो.गब्बरसिंगजी, तुम्ही स्वताला ओळखत नसला तरी तुम्हाला ओळखणारे(आणि ओळखून असणारे) बरेच आहेत.ते करतील काही तरी.

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

ओशॊ किंवा जे कॄष्ण्मूर्ती - नाही नाही. त्रिवार नाही

17

मी ओशॊ किंवा जे कॄष्ण्मूर्ती यान्च्या पैकि एकाचेहि साहित्य (?) वाचलेले नाही. पण प्रश्ण अजुन सतावतोय !!!

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

अहो गब्बर सिंग, एकदा

18

अहो गब्बर सिंग, एकदा विस्मृतीत गेलं की काय् काय वाचलय हे नाही आठव्त बहुतेक्...हास्य

पुष्करिणी

तुम्ही कुठल्याश्या साईटचे

19

तुम्ही कुठल्याश्या साईटचे संपादक आहात. कारण असा आयडेंटिटी क्रायसिस त्यांनाच असतो म्हणे हास्य

जॅकी चेनचा एक चित्रपट आहे.

20

जॅकी चेनचा एक चित्रपट आहे. परप्रदेशात अपघातात सापडलेला जॅकी त्याची स्मृती हरवून बसतो.लोकांना त्याची भाषा कळत नसते. “ तु कोण आहेस?’ ह्या त्यांच्या प्रश्नाला जॅकीचा प्रतिप्रश्न.व्हूऍमाय(whho am I?) त्या लोकांना तेच त्याचं नाव वाटतं ते त्याला व्हूऍमाय नावानेच बोलावु लागतात.असं काहीतरी होइल तुमचं गब्बरसिंग !
किंवा असं असेल काय?
अलेस्ट्र मॅक्लिन च्या जेसन बार्न सारखी केस आहे का तुमची? कुठल्या तरी CIA सारख्या एजन्सीनं तुमची ऒळख पुसून कुठल्यातरि मीशनवर पाठवलं आहे का तूम्हाला? जवळ किती पासपोर्ट आहेत ते मोजा राव एकदा!

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

आता तरी कळलं का ?

21

गब्बरभाऊ तुम्ही हा प्रश्न विचारून आता वर्ष होत आलं ... आता तरी कळलं का तुमची नक्की ओळख काय आहे ते??

मी नक्की कोण आहे...

22

कधी कधी धुंदीतुन सावरतो तेंव्हा विचार करतो की मी नक्की कोण आहे...

वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का...
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ?
स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा रातराणीच्या श्वासातला गंध ? का...
आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा... ?

किंवा...
ओल्याचिंब धुक्याची जहाल बरसात, चांदण्यांच्या ओठातुन पिऊन झिंगणा-या रात्रीला सावरणारा
स्वच्छंदी ढग आहे मी ?

मी नक्की कोण आहे ?
मनस्वी वणवा... रिमझीम पाऊस.... हळवा प्राजक्त.... की वाद्ळी उन्माद ?

ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते....
आणि मग...
मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो....
थोडक्यात...
'मी कोण' हा प्रश्न अनुत्तरीतच !

वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का...

23

वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का...
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ?
स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा रातराणीच्या श्वासातला गंध ? का...
आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा... ?

वाह वा.

क्या बात है रवी साहब... कमाल कर दिया...आपने...

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

वाह...

24

Grade Grade Grade

अप्रतिम.............

25

<<<मी नक्की कोण आहे ?
मनस्वी वणवा... रिमझीम पाऊस.... हळवा प्राजक्त.... की वाद्ळी उन्माद ?

ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते....
आणि मग...
मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो....
थोडक्यात...
'मी कोण' हा प्रश्न अनुत्तरीतच ! >>>

अप्रतिम............. Grade

परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

छे..

26

पियुजी,

कन्फ्युजन अजुनही तशीच आहे. उलट वाढलिय म्हणायला वाव आहे...

Who am I ? हा प्रश्न चूक असून Whose am I ? हा योग्य प्रश्न आहे असे कुमार केतकर म्हणतात.

http://www.youtube.com/watch?v=rwOq9zNOlxU

---------------------

या पुस्तकाचे शेवटचे (क्र. १७) प्रकरण पण वाचुन झाले. परंतु माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही -

Information Economics by Urs Birchler (Author), Monika Bütler (Author)

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

नवीन प्रश्न शोधून काढा आता...

27

इकडे स्पीकर नाहीत.. त्यामुळे नुसते दृश्य दिसते आहे...

असो... एक वर्ष झालं ज्या प्रश्नच उत्तर तुम्हाला मिळाले नाही त्याच्या मागे लागण्यापेक्षा नवीन प्रश्न शोधून काढा आता...

(अवांतर: मला पियुजी वैगेरे म्हणू नका हो.. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे)

आम्ही सध्या तुम्हाला मी.म. चे

28

आम्ही सध्या तुम्हाला मी.म. चे अमर्त्य सेन म्हणूनच ओळखतो.

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

हा माझा अपमान आहे...

29

हा माझा अपमान आहे. घोर अपमान. हास्य

अमर्त्य सेन हे कल्याणकारी राज्य (Welfare State) या संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. माझा असा दावा आहे की कल्याणकारी राज्य (Welfare State) ही संकल्पना भांडवलवादाच्या थोडीशी विपरित आहे. एकदम परफेक्ट विरुद्धार्थी नाही पण थोडीशी विपरित आहे.

तेव्हा हे बिरूद मला न रुचणारे आहे....

wink

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

बरं तुम्ही हिटलर

30

बरं तुम्ही हिटलर

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तुम्ही मुसोलिनी...

31

राजे, तुम्ही बेनिटो मुसोलिनी...

wink

निवांत पोपट हे बलराज साहनी. wink

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

प्र.का.टा.आ.

32

प्र.का.टा.आ.

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

(निवांत पोपट हे बलराज साहनी.)

33

(निवांत पोपट हे बलराज साहनी.)

हॅ हॅ हॅ Big smile
तुम्ही बलराज सहानींचा पोपट केला राव!

बाकी पियु ह्यांचे उत्खनन आणि त्यासाठीचे श्रम पाहून हातात कुदळ घेतलेल्या मदर ईंडियाची आठवण झाली.

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

:(

34

डोळे भरुन आले...

तुम्ही तुमच्याच मताशी सहमत

35

(हा माझा अपमान आहे. घोर अपमान.

अमर्त्य सेन हे कल्याणकारी राज्य (Welfare State) या संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. माझा असा दावा आहे की कल्याणकारी राज्य (Welfare State) ही संकल्पना भांडवलवादाच्या थोडीशी विपरित आहे. एकदम परफेक्ट विरुद्धार्थी नाही पण थोडीशी विपरित आहे.

तेव्हा हे बिरूद मला न रुचणारे आहे...).

तुम्ही तुमच्या मताशी सहमत नसता म्हणून.....

..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

बुल्ला की जाणा मै कौण. हे गाणे ऐका....

36

आणी सांगा काय अनूभव आहे ते. त्याचा मराठी भावानूवाद इथे आहे.

बाकी मला तरी तूम्ही हि इज द यु इन द आय ऑफ द यु इन विच यु ऑफ द यु अँड आय ऑफ द यु आर यु इन द यु.. वाटता.

And then !

पुलं लिखीत म्हैस मधील यष्टीत

37

पुलं लिखीत म्हैस मधील यष्टीत असलेल्या फणस, सुकी मासळी, बायकांच्या केसातले गजरे, आंबे अशा सर्व गोष्टींचा जसा यष्टीत एक सामायिक वास तयार होतो तशी तुमची आयडेंटीटी देखील उपरोल्लिखीत सर्व गोष्टींची सामायिक आयडेंटिटी असते.

-पुण्याचे पेशवे

अगदी...

38

अगदी... मस्त लिहिलेत पेशवे साहेब.

अगदी चपखल उदाहरण...

----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

+१

39

.

And then !

प्रतिसाद

40

आपली ओळख गब्बर सिंग हीच आहे असं मला वाटतं. बाकीच्या ओळखी लोकांनी ठरवलेल्या मापदंडाच्या आहेत. असो. आपण लिहिलेलं पटलं. हे लेखन माझ्या वाचनात फार
उशिरा आलं. म्हणून आत्ता प्रतिसाद देत आहे.

अरूण कोर्डे.

ये तुम्हे क्या हो गया

41

ये तुम्हे क्या हो गया गब्बर...
भुल गया वो दिन जब पचास-पचास कोसतक बच्चे तेरे नामसे डरा करते थे...
जब बसंती तेरे इशारोंपे नाचा करती थी....
(आता वीरु तुला कुत्ता-कमिना काय काय म्हणाला होता, पण जावुदे तो बच्चा होता तेव्हा)
You need a break Gabbar !! Evil

*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन