श्री अरुण मनोहर यांच्या कथा वाचुन मलाही दोन कथा आठवल्या, त्या ईथे देत आहे. 
ह्या कथा कुणाच्या आहेत, कुठे प्रकाशित आहेत की नाहीत याबद्दल काहीही माहिती नाही. अशाच कधीतरी ऐकलेल्या आहेत, पण माझ्या जीवन मुल्यांपैकी एक नक्की आहेत. कुणाला या कथा माहित असतील तर कृपया माहिती द्यावी.
कथा - १
एक तरुण मुलगा असतो. त्याला चित्रकारीचे फार वेड असते. तो एका दुर गावात मोठा प्रसिद्ध चित्रकार रहात असतो त्याच्याकडे शिष्यत्व पत्करतो. बरेच वर्षे साधना केल्यावर त्याचा गुरु त्याला म्हणतो, "तुझे शिक्षण आता पुर्ण झाले, आता तु तुझ्या जगात परत जा आणी तुझे पुढचे आयुष्य जग. लोकांना तुझ्या कलेचा आनंद घेऊ दे."
"पण तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला माझ्याकडे काहीही नाही गुरुदेव." - शिष्य.
"तु मोठा चित्रकार झालास की मला माझी दक्षिणा आपोआपच मिळेल. तु आता त्याची काळजी करु नकोस" - गुरुदेव.
शिष्य गुरुच्या आज्ञेनुसार शहरात येतो बरेच महिने कष्ट करुन एक कलाकृती बनवतो. पण विचार करतो की हे चित्र चांगले आहे की नाही कसे कळणार, गुरुदेव तर माझ्याबरोबर नाहीत. मग तो जनतेलाच विचारायचे ठरवतो. ते चित्र तो एका रहदारीच्या चौकात लावतो आणी त्याखाली एक टीप लिहितो. - "ह्या चित्रात जे काही आवडले नसेल त्यावर फुली मारावी." चित्र लावुन तो निघुन जातो.
दुसर्या दिवशी आनंदाने परत येऊन चित्र पहातो आणी त्याला अपार दु:ख होते. पुर्ण चित्र फुल्यांनी भरुन गेलेले असते. तो फार दु:खी होतो, पण मग याचं उत्तर गुरुदेवांना विचारायचे ठरवतो.
"गुरुदेव, माझ्या साधनेत कुठे कमी राहिली होती की मला आज हा दिवस पहावा लागला. जनता जनार्दनाला माझ्या कलेत एक सुद्धा चांगली गोष्ट न दिसावी." - शिष्य.
हे ऐकुन गुरुदेव त्याच्याबरोबर शहरात येतात, फुल्यांनी भरलेलं ते चित्र पहातात आणी त्याला म्हणतात, "तु हे चित्र पुन्हा एका दिवसात बनव, पुन्हा याच चौकात लाव, पण फक्त खालची टीप बदल. त्यात लिही - "या चित्रात जे आवडलं असेल त्यावर फुली मारावी."
"त्याने काय होणार गुरुदेव, लोकांना जे नाही आवडलं ते पुन्हा कसं आवडेल गुरुदेव." - शिष्य म्हणतो पण गुरुदेवांची आज्ञा म्हणुन ते म्हणतात तसं करतो.
पुन्हा चित्र चौकात लावतो आणी गुरुदेवांच्या म्हणण्यानुसार टीप बदलतो.
दुसर्या दिवशी शिष्य आणी गुरुदेव पुन्हा त्याच चौकात जातात आणी शिष्याच्या आनंदाला पारावार उरत नाही.
पुन्हा चित्र पुर्ण फुल्यांनी भरुन गेलेले असते.
*********************************************************************************************************
कथा - २
बाप बेटा दोघं चोर असतात. एकदा रात्री दोघे चोरी करायला बाहेर पडतात. चालता चालता अचानक बेटा बापाला म्हणतो, "बापु, ते बघ, पाच्व्या मजल्यावर त्या फ्लॅटमधे लाईट जळतोय तो. तिथे आपण मागच्या महिन्यात चोरी केली होती, काय तगडा माल हाती लागला होता."
बाप बघतो आणी नि:श्वास टाकुन मुलाला म्हणतो, "हो बेटा, हो खरयं. पण एक गोष्ट लक्षात घे. आपण चोरी केली त्या दिवशी सुद्धा तिथे लाईट जळत होती आणी आजही लाईट जळतेय, आणी आपल्या घरात त्या दिवशीही लाईट नव्हती आणी आजही नाही.
***********************************************************************************************************
कुणी दोन्ही कथांमधील बोध शोधुन दाखवेल काय? 
जो अचुक शोधेल त्याला बक्षिस देण्यात येईल. 
आपला,
मराठमोळा
चांगल्या कथा. ते बक्षीस ठेवा
चांगल्या कथा.
ते बक्षीस ठेवा तुमच्याकडेच आमच्या कडुन
आणि बोध सांगा पटदिशी !
बोध
मला जाणवलेले बोध असे-
कथा १-
कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना
जो पुछोंगे वह पाओगे, मिट्टी या फिर सोना
कथा-२
कुकर्मामधून मिळालेले सोने चमकत नसते.
वाह. धन्यवाद अरुणशेठ, दोन्ही
वाह.
धन्यवाद अरुणशेठ,
दोन्ही कथांमधले बोध तुम्ही नेमक्य शब्दात अचुक टिपलेत.
बक्षीस
माझे बक्षीस-- आणखी नितीकथा येउ देत.