फ़िताधारी कुत्री
फ़िताधारी कुत्री
एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची. काम संपल्यावर देखील ती फ़िता सगळ्यांना गर्वाने दाखवित मिरवायची. ज्यांना रंगीत फ़िता मिळाल्या नाही, ती कुत्री ईतरांचा हेवा करायची आणि आपल्यालाही फ़ीत मिळावी म्हणून जोमाने काम करीत. गळ्यात फ़ीत असणे ही जणू सामाजीक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.
शेतकऱ्याला फ़ितांमधील घंटांच्या आवाजाने, कुत्र्यांवर चोवीस तास नजर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे फ़ार थोड्या खर्चात त्याला चोवीस तासांचे गुलाम मिळाले. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.
एकदा विश्रांतीच्या वेळात माळरानावर जमून कुत्री मौजमजा करीत होती. त्यात एकच फ़िताधारी होता. तो अर्थातच आपल्या फ़ितेचे प्रदर्शन करीत इतरांना जळवीत होता. आपल्या फ़ितेमधून कसे वेगवेगळे मधूर आवाज निघतात, ती फ़ीत वजनाला किती हलकी आहे इत्यादी अप्रुप ऐकून कुत्री मनामधे त्याचा हेवा करीत, वरवर "कित्ती छान, कित्ती आधुनिक" वगैरे म्हणत जिभल्या चाटीत होती. सर्वांची गाणी, गप्पा, खेळणे रंगात आले होते. इतक्यात शेतकऱ्याचा नोकर घंटेच्या आवाजाने माग काढीत तिथे आला. काहितरी महत्वाचे काम ह्या फ़िताधारी कडून करवून घ्यायचे होते, कारण तो एक उत्तम कामगार म्हणून माहिती होता. नोकर फ़िताधारीला साखळीला पकडून आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला.
खरं तर इतकी मौज मजा सोडून कामासाठी जाणे फ़िताधारीच्या अगदी जिवावर आले होते. पण तसे न दाखवता, शेतकऱ्याच्या साम्राज्यात आपण किती महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकिच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणून ऐटीत तो तिथून जाऊ लागला. तेव्हा त्यातली काही बिनफ़िताधारी कुत्री त्याच्याकडे मत्सराने पाहू लागली. त्यानंतर आजुबाजुला चाललेल्या दंगामस्तीचा आस्वाद घेणे देखील त्यांना जमले नाही.
बोध-
१) चैनीचा आभास आणि आभासाची तृष्णा निर्माण करून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
२) निर्भेळ सुख व्यावहारीक जीवनात क्वचितच लाभते. प्रत्येक सुखासोबत काही दु:खे देखील स्विकारावी लागतात.

.jpg)
खरं आहे, छान लेखमाला चालू
खरं आहे, छान लेखमाला चालू केली आहे तुम्ही.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तचं अरुणराव. राजे ह्या
मस्तचं अरुणराव.
राजे ह्या सगळ्या बोधकथांना एकत्र गुंफता येईल का?
म्हणजे नंतर शोधायला त्रास होणार नाही.
लेक नेहमी नविन गोष्ट सांगा म्हणुन घोशा लावुन असते.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हो, ह्या बोधकथा, मायाने
हो, ह्या बोधकथा, मायाने अनुवाद केलेल्या डच लोककथा/ बालकथा.. अजूनही कोणाला ठाऊक असतील तर. असा एक वेगळा विभाग बनवला तर छान होईल.
वास्तवदर्शी बोधकथा आवडली. (
वास्तवदर्शी बोधकथा आवडली.
( अवांतर : हा प्रकार भारतासारख्या देशात जास्त पाहिला जातो. जो घरादारापेक्षा, वैयक्तीक जीवनापेक्षा कामाला जास्त महत्व देतो तो श्रेष्ठ समजला जातो.
याउलट पाश्चिमात्य देशात वैयक्तीक जीवनाला जास्त महत्व देण्यात येते. अर्थात ते देश तेवढे प्रगत आहेत म्हणुनच.
आपल्यालाही कदचित हे सुख बघण्याचं भाग्य लाभेल भविष्यात. कथेचा अर्थ थोड्या वेगळ्या अर्थाने घेतला आहे. )
मस्त
मस्त आहे बोधकथा.
खरं आहे, छान लेखमाला चालू
खरं आहे, छान लेखमाला चालू केली आहे तुम्ही. >>>>
अगदी असेच म्हणतो !!
मस्त आहे..........
मस्त आहे..........
काका
बोध कथा अवडली.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त कथा
मस्त कथा
झकास जमली आहे.. आता लक्षात
झकास जमली आहे..
आता लक्षात आले.. कंपनी मधे सॉफ्ट्वेर ईंजी., सिनीयर सॉफ्ट्वेर ईंजी., सॉफ्ट्वेर स्पेशालिस्ट, सिनीयर सॉफ्ट्वेर स्पेशालिस्ट .. हे सगळे एकच काम करत्तात पण खालचा वरची पोस्ट पाहुन जळत असतो
सुरेख
मधे जॅक लंडनच्या 'व्हाईट फँग' चा अनंत सामंतांनी 'लांडगा' या नावाने केलेला अनुवाद वाचण्यात आला होता. त्यात एक गंमतीशीर गोष्ट वाचण्यात आली. क्लॉनडाईक भागातील मूळ रहिवासी त्यांच्याकडील कुत्र्यांचा नेता/म्होरक्या जो असतो त्याचे सर्वात जास्त लाड करतात, त्याला इतरांपेक्षा अधिक नि चांगले खाणे देतात, आधी खाणे देतात, त्याला आपल्या तंबूजवळ वेगळे बांधतात. यामुळे इतर कुत्र्यांच्या मनात त्याच्याविषयी अधिकच द्वेष निर्माण होतो. त्यानंतर स्लेड जुंपताना झाल्यावर त्याला सर्वात पुढे ठेवतात नि त्याच्या मागे जपानी पंख्यासारख्या रचनेत इतर कुत्र्यांना जुंपतात. एरवी त्या म्होरक्याकडून मार खाणारी कुत्री - बळी तो कान पिळी या न्यायानेच तो ही म्होरक्या बनलेला असतो ना - त्याचा पार्श्वभाग बघून तो घाबरून आपल्यापासून दूर पळू पाहतो आहे असे समजून चेकाळतात नि त्याला पकडण्यासाठी त्वेषाने धावतात. तो नेताही - मागे वळता येत नसल्याने - त्यांचे चावे चुकवण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवावे म्हणून जिवाच्या आकांताने धावत राहतो. या त्यांच्या स्पर्धेत स्लेड आपोआपच वेगात जात रहाते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
खूप सुंदर लिहीलय
खूप सुंदर लिहीलय