बटाट्याची भाजी

0
0

तो-: आज काय जेवणात?
ती-: बटाट्याची भाजी.
तो-: काय्!...आज परत?
ती-: आज परत्.....कसं काय?
तो-: अगं...काल सुद्धा बटाट्याचिच भाजी होती.
ती-: अहो..आज वेगळं आहे.
तो-: वेगळं?..वेगळं म्हणजे काय?
ती-: म्हणजे कालच्याच बटाट्यांची नाही केली.
तो-: ते कसं? ...म्हणजे तु नवीन बटाटे खरेदी केलेस?
ती-: नाही. मी कालच ५ किलो खरेदी केले होते.
तो-: मग हे कालचेच बटाटे कसे नाहीत?
ती-: कारण हे वेगळे आहेत.
तो-: ऐक्...तु बटाट्याची भाजी केलीस. हो की नाही?
ती-: हो.
तो-: बटाट्याची भाजी बटाट्यांनिच केली. हो की नाही?
ती-: सहाजिकच! त्याशिवाय बटाट्याची भाजी कशी होइल?
तो-: बरोबर! आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे हे काल खरेदी केलेल्या बटाट्यातूनच घेतलेस. हो की नाही?
ती-: हो.
तो-: म्हणजे ही अगदी कालच्याच भाजीसारखी आहे.
ती-: अशक्य.
तो-: का बरं अशक्य?
ती-: कारण कालची बटाट्याची भाजी आपण खाऊन संपवली.
तो-: आणि?
ती-: म्हणजे ही कालचिच बटाट्याची भाजी असणे शक्य नाही.
तो-: अरे देवा.......!

(जर्मन कथेवरून भाषांतरीत)

(विषय दिलेला नाही)

1

Laughing out loud Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

2

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

आयला डोक्यात बटाटे झाले !!

3

Laughing out loud

आयला डोक्यात बटाटे झाले !!

आज नवर्‍याला हा लेख सप्रेम

4

आज नवर्‍याला हा लेख सप्रेम भेट दयावा म्हणते Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

आजकाल कुठ्ल्याश्या चॅनलवर मि.

5

आजकाल कुठ्ल्याश्या चॅनलवर मि. अँड मिसेस शर्मा नावाची सिरिअल येते, त्यात असलेच काहीसे विनोद असतात.
नवर्‍याला (म्हणजे ते नवरा बायको असतील तर, जर्मनी आहे ना म्हणून म्हंटलं) चांगलच वेड्यात काढतेय ही बाई.

असली बायको नको रे बाब्बो. नवर्‍याचा बटाटा करुन ठेवेल आणी एक दिवस त्याची पण भाजी करुन खाईल. Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

6

Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

7

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हे असले बटाटे खावुन खावुन

8

हे असले बटाटे खावुन खावुन बटाटे झालेले नवरे किंवा नवरा स्वयंपाक करत असेल तर बायका किंवा ... (उरलेल्या शक्यता तुम्ही टाका) आंतरजालावर विचारवंत म्हणुन मान मिळवुन असतात; त्यांना परत बटाटेच मारावे लागतात असा आमचा अनुभव आहे.

ढेकर

9

जर्मन बटाट्यांची मराठी भाजी चविने खाऊन
ढेकर दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार.

मला आधी वाटले की काचर्‍या

10

मला आधी वाटले की काचर्‍या किंवा किमान उपासाची वगैरे शेंगदाणा कुट घातलेली असेल...

ही लागलेली भाजी खायला घालता होय Laughing out loud Laughing out loud

निषेध निषेध निषेध

पचनशक्ती

11

लगलेली भाजी सुद्धा पचवली. काय पचन शक्ती आहे राव तुम्ची!

प्रसन्न

12

वाटल चावुन वाचुन sfss


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अरेच्च्चा ही तर बटाट्याच्या

13

अरेच्च्चा ही तर बटाट्याच्या भाजीची भलतीच रेसिपी आहे Big smile

(विषय दिलेला नाही)

14

Laughing out loud

हे वाचून घरच्या बटाटे भाजीची

15

हे वाचून घरच्या बटाटे भाजीची (कडू) गोड आठवण मनी दाटली.
हास्य


___________________________________
योगेश नाईक

काय हो

16

पुन्हा एकदा 'बायको गेली माहेरी..' स्टेटस् का? नाही म्हणजे एवढे धाडसी प्रतिसाद देताय म्हणून विचारलं हो.

उप्प्प्स ! वरचे म्हातारं एक

17

उप्प्प्स !

वरचे म्हातारं एक तर लै म्हणजे लै विटलं आहे... जगण्यापासून... नाही तर...... चुकून मिस्टेक झाली असावी त्याच्या कडून wink

> >'बायको गेली माहेरी..' स्टेटस् का? नाही म्हणजे एवढे धाडसी प्रतिसाद देताय म्हणून विचारलं हो.

किती भोचकपणा म्हणतो मी हा... जरा जरा... स्वातंत्र्य म्हणतात ते उपभोग घेऊ देऊ नका तुम्ही कोणाला Crying


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

(विषय दिलेला नाही)

18

Laughing out loud Laughing out loud


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

हा हा हा

19

हा हा हा


----निवेदिता--------

(विषय दिलेला नाही)

20

Laughing out loud


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

हा हा हा....

21

Laughing out loud

हा हा हा....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धत तेरे की

22

म्हट्लं इत्की बेसीक पाकृ कुणी टाक्लीये? म्हणून पहायला आलो होतो


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

हा हा हा...

23

बटाटा खावो, खुद जान जावो...


--------------------
सिद्धार्थ
माझ्या गजाल्या