'मिश्किली'


भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्‍या/ लिहिणाऱ्‍यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...
तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंका पिटावा तितका कमीच ठरेल. आता जे काही लिहायचे उरलेय ते वाचक-लेखकांच्या हाती सोपवितो...
- डॉ.श्रीराम दिवटे.


राजे's picture
धन्यवाद डॉ.श्रीराम दिवटे !

धन्यवाद डॉ.श्रीराम दिवटे !


आदि's picture
क्या बात है काका ! मस्त्च आहे

क्या बात है काका !
मस्त्च आहे


चित्रविचित्र's picture
काल वाचले होते सगळे लेख, वेळे

काल वाचले होते सगळे लेख, वेळे अभावी प्रतिसाद देऊ शकलो नव्हतो.

आयुष्याचा 'अर्धा' प्याला

खास करुन आवडले.


पुण्याचे पेशवे's picture
मस्तंच सगळे लेख वाचले.

मस्तंच सगळे लेख वाचले. मुख्यत्वे छोटेखानी असल्याने सगळे एका दमात वाचून झाले. छान आहे ... संकर, स्त्रीयांची मक्तेदारी विषेश आवडले.


-पुण्याचे पेशवे

राजे's picture
असेच म्हणतो..

असेच म्हणतो..


पवन शिन्दे's picture
धन्यवाद डॉ.श्रीराम दिवटे

धन्यवाद डॉ.श्रीराम दिवटे

सगळे लेख छान आहे म्हणुनच मीम चे वेगळे मह्त्व वाटते.मीम ला ही धन्यवाद


डॉ.श्रीराम दिवटे's picture
'मिश्किली'ला भेट दिल्याबद्दल

'मिश्किली'ला भेट दिल्याबद्दल सर्व नेटकरांना धन्यवाद!
मीमच्या व्यवस्थापकांचे विशेष आभार.


***********************************************************************************
माझे 'पुस्तक' माझा 'ब्लॉग'