मुस्लिम धर्म,, धार्मिकता ,आधुनिकता, आणि आजचि पिढि

0
0

डीसक्लेमरः या चर्चाप्रस्तावात धर्मांचि तुलना करण्याचा किंवा कमि लेखण्याचा हेतु नाहि

सर्व धर्मांचे तत्वज्ञान हे शेकडो वर्षांपुवि लिहिले गेले आहे. पण आजच्या काळात सर्व धर्म आधुनिकता अंगिकारत आहेत. शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक, प्रशासन या बाबतित धर्माचा प्रभाव कमि होत आहे

या बाबतित मुस्लिम समाज आद्यापहि धार्मिक आणि कट्टर आहे आसे चित्र माध्यमांद्वारे मांड्ले जाते. आपल्याकडे वाइट/ सवंग गोष्टींना प्रथम प्रसिद्धि मिळते. त्यामुळे ते किति बरोबर आहे हा या चर्चेचा विषय आहे

या बाबतित मला फारशि माहिति नाहि. माझ्या मध्यमवर्गिय मुस्लिम मित्र व सहकार्यांकडुन मिळालेल्या माहितिनुसार

१. मागचि पिढि हे जास्त धार्मिक होति. आजच्या पिढिला ध्रर्माबद्दल श्रद्धा आहे. पण आजचि तरुण पिढि स्वतंत्रपणे विचार करते. शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक या बाबतित ते धार्मिक नियमांचा फारसा विचार करत नाहित.

२. शिक्षणासाठि शाळा निवडताना स्थानिक/ इंग्रजि माध्यमाला पसंति दिलि जाते. उर्दु माध्यम / मदरसा यांचे महत्व कमि आहे

३. एकापेक्शा जास्त विवाहांना परवानगि असलि तरिहि तसे फारसे होत नाहि. फंमिलि प्लॅनिंग केले जाते. घट्स्पोटाचे प्रमाण कमि आहे

४. आधुनिक पेहेराव(धार्मिक स्थळे व कार्यक्रम सोड्ल्यास) वापरले जातात. स्त्रियांच्या बाबतित बुरखा क्वचित वापरला जातो

५. फतव्यांना फारसे महत्व दिले जात नाहि.

६. होम लोन , शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक (फक्त इस्लामिक गुंतवणुक नव्हे) याचा वापर होतो

अर्थात हि माहिति पुण्यातिल नोकरदार मध्यमवर्गातिल आहे. ति छोट्या सँपल वर आधारित आहे.माझि माहिति चुकिचि आसु शकते. ठिकाण व वर्ग यानुसार(उच्च, मध्य्म, गरिब) चित्र कदाचित वेगेळे आसेल. ति कोणताहि निष्कर्ष काढ्ण्यासाठि पुरेशि नाहि. याचि मला पुर्ण जाणिव आहे.

म्हणुनच हा चर्चाप्रस्ताव आहे

चर्चेचे मुद्दे
१. आपल्या पहाण्यात मुस्लिम समाजात शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक या बाबतित आधुनिकता दिसते का?
२. या बाबतित मोठ्या व छोट्या शहरांमध्ये परिस्थिति वेगळि आहे का?

ह्याच विषयावर " तमन्नाकिंत "

1

ह्याच विषयावर " तमन्नाकिंत " नावाचा लेख लवकरच..........

आपल्या प्रतिक्रीयेत कोदा

2

आपल्या प्रतिक्रीयेत कोदा दिसले.

स्वगत :- मारतय आता कॅफेत येउन.

आपल्या प्रतिक्रीयेत कोदा

3

आपल्या प्रतिक्रीयेत कोदा दिसले. Laughing out loud

स्वगत :- मारतय आता कॅफेत येउन.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

बर गोदा आय मिन गोदाक्का नाय दिसली !!

पण आजच्या काळात सर्व धर्म

4

पण आजच्या काळात सर्व धर्म आधुनिकता अंगिकारत आहेत. शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक, प्रशासन या बाबतित धर्माचा प्रभाव कमि होत आहे
मुस्लीम धर्माबाबर हा लेख असेल तर, हे वाक्य पटले नाही. Perticularly,ठळक केलेले वाक्यातील भाग. गुंतवणूकीबद्दल काही कल्पना नाही. सर्व धर्म आधुनिक होत आहेत म्हणजे काय? जरा विस्ताराने सांगितले तर काय म्हणायचे आहे ते कळेल.

मुद्दे क्र. १, २, ४ आणि ५ मुळीचच पटलेले नाहीत. बाकीच्या मुद्द्यांबद्दल कल्पना नाही.

सहमत १,२ आणि ४ मुद्दे अजिबात

5

सहमत

१,२ आणि ४ मुद्दे अजिबात पटले नाहीत. मी जिथे रहात होते आणि सध्या जिथे राहतीय या दोन्ही ठिकाणची परिस्थिती आपण म्हण्ता ( लेखक ) त्यापेक्षा बरीच वेगळी आहे


पुष्करिणी

यावरुन एकच समजले

6

यावरुन एकच समजले मुसलमानांबद्दल ब-याच लोकांना माहिती नसते. असो.

यावरुन म्हणजे ? लेखावरुन का

7

यावरुन म्हणजे ? लेखावरुन का प्रतिसादांवरुन ??

आगलाविया

अर्थात लेखावरुन.

8

अर्थात लेखावरुन.

--खुलासाकेलिया

लेख वाचला आणि पहिलाच प्रतिसाद

9

लेख वाचला आणि पहिलाच प्रतिसाद परागलाविया ह्यांचा पाहिली, तेह्वाच लेखाचा उद्देश आग लावियाचा आणि मजा पाहवियाचा आहे की काय असे वाटून गेले होते खरे!

परागलाविया, ह्यापे़क्षा तुम्ही चंद्राचे तुकडे का लवकर जोडत नाही? लोड शेडींग आहे आणि त्यात चंद्रप्रकाशही नसेल तर त्रासदायक होते की!

निर्मयी आणि पुष्करिणीशी

10

निर्मयी आणि पुष्करिणीशी सहमत.

या विषयावर गमतीजमतीत गप्पा मारायच्यात की खरंच नीट चर्चा करायची आहे हे अजून समजू न शकल्यामुळे लिहायची थांबत आहे.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

चर्चा

11

मि प्रथमच स्पश्ट केले आहे कि

"या बाबतित मला फारशि माहिति नाहि"
"अर्थात हे माहिति पुण्यातिल मध्यमवर्गातिल आहे. इतर ठिकाणि चित्र कदाचित वेगेळे आसेल"

माझि माहिति ४-५ पुण्यातिल मध्यमवर्गिय नोकरदार मुस्लिम मित्र व सहकारि यांच्याकडुन मिळालि आहे. ति कोणताहि निष्कर्ष काढ्ण्यासाठि पुरेशि नाहि. याचि मला पुर्ण जाणिव आहे

सर्व धर्म आधुनिक होत आहेत म्हणजे काय?

माझ्या मते- धर्माच्या बाबतित आधुनिकता म्हणजे समाज व विद्यानाच्या प्रगतिशि समतोल राखत.. काळाशि सुसंगत धर्माचरण करणे. कालबाह्य रुढि सोडुन देणे.

धर्म जेव्हा सुरु झाले. तेव्हा "शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक, प्रशासन,श्रद्धा, कर्मकांड " या गोष्टि त्याचा भाग होत्या. जशि जशि प्रगति झालि तश्या ""शिक्षण, पेहेराव, व्यवसाय, गुतवणुक, प्रशासन" या गोश्टि धर्मापेक्श्या राज्य व समाज व्यवस्थेचा भाग होत आहेत. त्यांचि धर्मावर डीपेंडन्सि कमि/ नष्ट होत आहे


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

हं.

12

हं.

..

13

आजच्या काळात ज्याला/ जिला नोकरि करुन भविष्य उज्वल करायचे आहे त्यासाठि चांगले महाविद्यालयिन शिक्षण आणि चांगला परतावा देणारि गुंतवणुक (शेअर मार्केट मध्ये असणे जरुरिचे नाहि. पण फायद्याच्वे ठरु शकते) याला पर्याय नाहि. नोकरिच्या ठिकाणि तुमचा पेहराव प्रोफेशनल असला पाहिजे.

सारंश हा कि प्रगतिसाठि समाजात मिसळणॅ आणि इतरांशि स्पर्धा करणे आवश्यक आहे.

प्रसार माध्यमात जेव्हा चर्चा एकल्या तेव्हा त्या फतव्या / आयोगांचे आहवाल याबद्द्ल आसत. तेव्हा मला प्रश्न पडला कि हा समज कोशात आहे का? हा प्रगतिच्या संधि डावलत आहे का? . मुस्लिम मित्र व सहकार्यांशि बोलल्यावर कळले कि नोकरदार मुस्लिम मध्यमवर्ग बदललेला आहे. माध्यमांचे चित्र आणि प्रत्यक्श्य चित्र वेगळे आहे

अर्थात माझि माहिति कोणताहि निष्कर्ष काढ्ण्यासाठि पुरेशि नाहि. याचि मला पुर्ण जाणिव आहे. म्हणुनच हा चर्चाप्रस्ताव आहे


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

जुनी पिढी नाही आजची पिढीहि

14

जुनी पिढी नाही आजची पिढीहि तितकीच कट्टर आहे. आमच्या हापिसातले मुसलमान कडक रोजे ठेवतात. दर शुक्रवारी दुपारी नमाजाला बाहेर जातात (मशिदीत). अर्थात त्यांचा धर्म पाळण्यात गैर काहीच नाहीये. गैर आहे या गोष्टींचा वापर करोन समाज तोडणे.


-पुण्याचे पेशवे

अर्थात त्यांचा धर्म पाळण्यात

15

अर्थात त्यांचा धर्म पाळण्यात गैर काहीच नाहीये. गैर आहे या गोष्टींचा वापर करोन समाज तोडणे. >>>>

टाळ्या !!

धार्मिक वर्तन

16

धार्मिक वर्तन हा वैयक्तिक विष्य आहे. पण शिक्षण, पेहेराव, गुतवणुक या बाबतित आधुनिकता दिसते का? समाजात मिसळण्याचि प्रव्रुत्ति दिसते का?


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

नाही

17

पेहरावाबाबत आधुनिकता दिसत नाही.

माझ्या ओळखीचे तीन मुसलमान पूर्वी सर्रास शर्ट पॅण्ट घालीत असत. ते आता गोल जाळीची टोपी आणि लांब सदरा/सुरवार घालतात. तसेच पूर्वी साधी मिशी असे ती आता मिशी कापलेली आणि दाढी वाढलेली असते. अर्थात हा समाजांतर्गत दिखाऊपणा असतो का हे माहिती नाही. (पिवळसर पांढरे सोवळे घालून मंदिरात जाणारे जैन लोक फार पूर्वी- २५-३० वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवत नाही).

मुस्लिम मनाचा शोध - शेषराव

18

मुस्लिम मनाचा शोध - शेषराव मोरे हे पुस्तक पहिले वाचा
त्यानंतर इस्लामिक पब्लिकेशन्सचे दिव्य कुराण म्हणुन मराठी भाषांतर (रु १०० ) आहे ते वाचा
त्यानंतर कुराणाचे देवनागरी लिपीतील उर्दु भाषांतर वाचा (हे तुम्हाला तुमच्या मुसलमान मित्राकडुनच मिळवावे लागेल)
यानंतर जे काही वाचले ते आणि आजुबाजुला दिसणारे याचा स्वतःच्या बुद्धीने मेळ घालायचा प्रयत्न करा

तुमचे सर्व प्रश्न सुटले असतील हास्य

शुभेच्छा !

(मी मुद्दाम मराठी आणि उर्दु (मुसलमानांकडचीच प्रत) असे दोन्ही वाचायला लावले. त्याचे कारण वाचल्यावर कळेल)

मुस्लिम मनाचा शोध - शेषराव

19

धन्यवद. "मुस्लिम मनाचा शोध" वाचेन


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

पूर्वी आम्ही जिथे रहायचो तिथे

20

पूर्वी आम्ही जिथे रहायचो तिथे आमचे शेजारी मुस्लीम होते. या बाई ( सगळे त्यांना भाबी म्हणायचे ) भजनी मंडळाच्या कायमस्वरूपी अध्यक्षा होत्या. त्यांच सोशल सर्कल दुपारी १२ ते ५ समोरच्या देवीच्या देवळात बसून विविध सामाजिक कामं करत. त्यांच्या घरी एक फकीर नियमित येत असे. अत्यंत करारी होत्या आणि आम्ही सगळे त्यांना घाबरायचो. त्यांची सक्त ताकीद होती की आमच्या दारासमोर रांगोळी काढून झाली की त्यांच्या दारासमोर काढलीच पाहिजे.

दुसर्‍या ओळखीच्या मुस्लीम बाई, आम्च्याकडे पूजा-हलदीकुंकू कार्यक्रमानिमित्त निमंत्रित होत्या. आम्ही मुलं-मुलीच पुढं पुढं करून सगळी कामं करत होतो. त्या मुस्लीम होत्या आणि मुसलमान बायका कुंकू लावत नाहित इतकच माझं ज्ञान होतं. माझ्या भावानं त्यांना प्रसाद दिला, मैत्रिणीन अत्तर लावलं, आइन फराळ दिला, पण मी त्यांना कुंकू न लावता पुढच्या बाइंकडे गेले. त्यांनी रडायला सुरूवात केली, कुणालाच काही कळेना, मग त्यांनी मी त्यांचा अप्मान केला असं म्हटलं...मला खूप बोलणी बसली, मार मिळाला. मग घरमालिकिण बाइ आनी त्यांनीच सांगितलं की मुसल्मान बायकांच्या मंगळ्सूत्राला कुंकू लावायचं अशी पद्ध्त आहे.

माझ्या शेजारी एकाच बाकावर नर्गिस नावाची मुलगी ३ वर्ष बसायची, माझी चांगली मैत्रिण होती.
कॉलेजपासून माझी अगदी घट्ट मैत्रिण मुस्लीम आहे, त्यांच्या कुटूंबात बुरखा पद्धत निषिद्ध आहे.

आता त्याच ठिकाणी उर्दू शाळांच प्रचंड स्तोम माजलं आहे. जवळ्जवळ सगळ्या तरूण मुस्लीम तरूणी हिजाब वापरतात, त्यांच्या आया/मावश्या/आज्ज्या बरेच आधुनिक कपडे वापरायच्या. पुपे म्हणतात त्याप्रमाणे ऑफिसात रोज ५ वेळा नमाजाला जाउ का विचारणारे महाभाग आहेत. मशिदीत जाउद्या नाहीतर इथेच कोपर्‍यात नमाज पढतो असंही आहे...

परदेशातही जे पाकिस्तानी / बांग्लादेशी मुस्लीम आहेत त्यांची आधीची पिढी आत्ताच्या पिढीपेक्षा बरीच आधुनिक आहे.
आर्थिक गुंतवणूकीबद्द्ल फारशी माहिती नाही.


पुष्करिणी

वातावरण

21

माझ्या एका कोलेजमित्राच्या घरि मि आधुनिक वातावरण पाहिले आहे. त्याचि आइ बाहेर जाताना हिजाब वापरायचि.पण ते सोड्ल्यास पन त्याच्या घरि त्याच्या भाउ बहिणि पारंपारिक पोशाख वापरताना दिसले नाहित. प्रत्येकजण दिवसातुन एकदा नमाज करत नसे.

ओफिसमध्ये मुस्लिम सहकार्यांनि नमाजाचि सुट्टि धेतल्याचे पहाण्यात नाहि. पण असे काहि ओफीसमध्ये होते, हे मात्र एकले आहे


जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे

ओफिसमध्ये मुस्लिम सहकार्यांनि

22

ओफिसमध्ये मुस्लिम सहकार्यांनि नमाजाचि सुट्टि धेतल्याचे पहाण्यात नाहि. पण असे काहि ओफीसमध्ये होते, हे मात्र एकले आहे

९०% ऑफिसेसमध्ये नमाजाचि सुट्टि घेतलि जाते.
मुस्लिम सणांना १००% सुट्टि असते.
त्यांना स्वताच्या धर्माचा व नको त्या शीस्तिचा नको तेवढा गर्व (आदर नव्हे)असतो.
दुस-या धर्माला ते लोक कमि लेखतात.
(अनुभवाचे बोल)


जय हो

त्यांना स्वताच्या धर्माचा व

23

त्यांना स्वताच्या धर्माचा व नको त्या शीस्तिचा नको तेवढा गर्व (आदर नव्हे)असतो.

माझाही असाच अनुभव आहे.

दोउग्लस नोर्थ आनि ओलिवेर विल्लिअम्सोन चे साहित्य वाचा

24

Institutions, Institutional Change and Economic Performance - Douglass C. North (Author)

The Economic Institutions of Capitalism by Oliver E. Williamson

The Economics of Transaction Costs (Elgar Critical Writings Reader) by Oliver E. Williamson and Scott E. Masten

You will come to know why religion exists in the first place. It will also explain why does morality exist, why law exists, why teamwork, ethics, religion, legislature, judiciary exist.

This material assumes, what they call, "bounded rationality" and NOT full-form rationality. It will take time for you to understand it and digest it. But once you understand it you will be able to analyze any religion.

(The 3 authors, Ronald coase, Oliver williamson and Douglass North, all of them got Nobel memorial prize.)

The following 2 articles will provide brief introduction to transaction cost literature (the basics) -

http://www.sfu.ca/~allen/CoaseJLE1960.pdf (Slightly difficult to read and understand because of his vrbose english)

http://people.ischool.berkeley.edu/~hal/people/hal/NYTimes/2002-01-17.html

शेवटची लिंक खास आवडली. मूळ

25

शेवटची लिंक खास आवडली. मूळ लेखहि छान आहे. हास्य


-पुण्याचे पेशवे