कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी
मागच्या शनिवार - रविवार कोकणात जाण्याचा योग आला..... हो नाही करता करता एकदा जायचं पक्कं केलं आणि शनिवारी रजा टाकुन निघालो....सकाळी ६.०० ला घर सोडलं...जायचं होतं हर्णे गावात....आणि २ दिवसात हर्णे, केळशी आणि अंजर्ले फिरुन आम्ही महाबळेश्वर मार्गे पुण्यात यायचं असं प्लॅनिंग होतं......जाताना भोरमार्गे वरंध घाटातुन जाऊयात असं ठरलं....साधारणतः १२.०० ला हर्णेला पोचलो.... हर्णे बंदर असल्यानी गेल्या बरोबर लगेच भरपुर बोटी दिसायला लागल्या.... हर्णेला फिश मार्केटमधे चालणारा लिलाव खुप फेमस आहे....रोज संध्याकाळी असतो हा लिलाव...आम्ही गेलो त्यावेळी भरपुर गर्दी असल्यानी फोटो नाही काढता आले.असो.
पहिल्यांदा आम्ही अंजर्ले गावात जायचं ठरवलं.अंजर्ले गावाचा कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. कड्यावरच्या गणपतीला जायचा रस्ता पण फार सुरेख आहे

अंजर्लेला जाताना खाडी पुल ओलांडावा लागतो....

अंजर्लेचं प्रसिध्द मंदिर :

कड्यावरचा गणपती :

अंजर्ले गावातुन आम्ही केळशीला निघालो.केळशीला जाणारा हा रस्ता पुर्णपणे समुद्रकिनार्यालगत जातो.......ईथुन दिसणारा हा नजारा :-

अंजर्ले - केळशी अंतर तसं फक्त २५ किलोमिटर आहे....पण अरूंद रस्ते असल्यानी जायला वेळ लागतो. केळशीच समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि जास्त पर्यटक नसल्यानी प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.आम्ही पोचलो त्यावेळी तर किनार्यावर कोणीच नव्हतं.....
हा केळशीचा समुद्र किनारा:

केळशीचा सनसेट :



मावळत्या दिनकराला नमस्कार करुन आम्ही परत हर्णेला यायला निघालो. 
टिपः लेख इतरत्र पुर्वप्रकाशीत
.jpg)
जळवा कोकणाचे फटू टाकुन
जळवा कोकणाचे फटू टाकुन
+ १
असेच म्हणतो.
मस्त फोटो
सुर्यास्ताचे फोटो एकदम सुरेख..सुपर्ब..!
आवडले.
सुंदर :)
सह्ही
एकदम मस्त
सगळे फोटो मस्त आहेत...आणि पहिला तर अप्रतिम
कड्यावरचा गणपती देखणा दिसतो
कड्यावरचा गणपती देखणा दिसतो आहे.
कोकणात जाउन यायला हवे पुन्हा
कोकणात जाउन यायला हवे पुन्हा एकदा.
फोटो झकास आलेत. सुरेख
मस्त ग मिंटे तो शेवटचा
मस्त ग मिंटे
तो शेवटचा सुरुच्या झाडाआडचा दिनकर गावची आठवण करुन गेला उगाच
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
गेलाच होतात तर थोडं पुढे जाऊन
गेलाच होतात तर थोडं पुढे जाऊन मुरुडच्या दुर्गेला पण जाऊन यायचं होतंत. केळशीच्या महालक्ष्मीला गेलात का नाही?
-पुण्याचे पेशवे
नाही रे माहित
नाही रे माहित नव्हतं.............
आणि गेलो होतो त्यावेळी तुझ्याशी ओळख पण नव्हती....
असो. एकदा मस्त कोकण ट्रिप ठरवुयात
:-)
झकास!
सूर्यास्त
सूर्यास्ताच्या प्रकाशचित्रातील रंगसंगती मनोहारी आहे.
वाव
वाव
फोटो छानच! आंजर्ले ट्रिप च्या
फोटो छानच!
आंजर्ले ट्रिप च्या आठवणी ताज्या झाल्या... तो आंजर्लेचा समुद्र किनारा, त्या फटकळ दांडेकर आज्जी, त्या निजसुर्यांचे उकडिचे मोदक, कड्यावरचा गणपती... मस्त मस्त मस्त !!!
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
छान आले आहेत फोटो.
छान आले आहेत फोटो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लई भारी!!
लई भारी!!
छान फोटो
आंर्जले कोकणात रहाण्यासाठि मस्त आहे. सहलिच्या आठवणि जाग्या झाल्या.
आंर्जल्याचि खाडि, शांत समुद्रकिनारा अजुनहि खुणावतो
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे