काल दिवसभर टंकाळा केल्याने रात्री स्वतः काहीतरी बनवून खायचा मूड आला.. बरेच दिवसात सुधारस खाल्ला नव्हता, बनवायला ही सोपा म्हणून बनवला आणी फस्त केला. त्याचीच ही पाकृ.
कच्चा मालः
१. अर्धी वाटी साखर
२. ३-४ चमचे लिंबाचा रस
३. पाण्यात भिजवलेलं केशर अथवा जिलेबीचा रंग
४. वेलदोडे (३-४)
५. सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे आणी चारोळे)

एका पातेल्यात साखर आणी समान पातळीत पाणी घ्या. त्याचा पाक बनवा. साखर विरघळत आल्यावर त्यात वेलदोडे टाका.

पाक थोडा घट्ट झाल्यावर थंड व्हायला ठेवा.त्यात पाण्यात भिजवलेले केशर / रंग घाला. थोडा थंड झाला की त्यात ३-४ चमचे लिंबाचा रस घालून ढवळा.

त्यात सुका मेवा टाका. आणी थंड होऊ द्या.

वाढायच्या वेळेस बाउल मधे काढा आणी सर्व करा.

गरम गरम पोळीसोबत हादडा...
*लेखन इतरत्र पुर्वप्रकाशीत.
आज दोघे प्रतीक पेटलेत
आज दोघे प्रतीक पेटलेत तिच्यायला.. सह्हीच!
+१
अगदी हाच विचार आला..
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
प्रभो
आमच्या कडे अशी म्हण आहे की चिक्कूपणाबद्दल बदनाम असलेल्या विशिष्ट जातीमध्ये (इथे त्यावरून दंगा नको) दिवाळीच्या शेवटच्या दिवशी हा पदार्थ करतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाकातले गुलाबजाम करायचे. गुलाबजाम खाऊन पाक शिल्लक राहतो. त्यात दुसर्या दिवशी पाकातल्या पुर्या कराव्यात (तळलेल्या पुर्या पाकात टाकायच्या असल्याने पाक गरम केल्याने घट्ट होण्याच धोका टळतो). त्यातील पुर्या खाऊन उरलेला पाक तिसर्या दिवशी सुधारस करायला वापरायचा. अशी इकॉनॉमिकल दिवाळी साजरी करायची. है की नै आयडिया.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
निशब्द !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
प्रभो, गणपा को कांपिटीशनवा
प्रभो, गणपा को कांपिटीशनवा देत रहे का?
गन्पा हमार गुरू है, कैसनबा??
गन्पा हमार गुरू है, कैसनबा??
कोई हरज नाही.. हमको का, हमको
कोई हरज नाही.. हमको का, हमको रेसिपीसेही मतलब. एकसे भले दो!
यांत केळ्याचे तुकडे पण टाकतात
यांत केळ्याचे तुकडे पण टाकतात आमच्याकडे
पुष्करिणी
करेक्ट बघा ! आम्ही
करेक्ट बघा !
आम्ही सफरचंदाच्या चकत्या पण टाकतो...
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
मला गोड तेवढं आवडत नाही. पण
मला गोड तेवढं आवडत नाही. पण फोटो आणी पाकृ पाहुन नक्की खावसं वाटतय.
मस्त पाकृ प्रभो.
सुधारस म्हणजे ममत्व, सुधारस
सुधारस म्हणजे ममत्व, सुधारस म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद, सुधारस म्हणजे सात्त्विकता, सुधारस म्हणजे शुचिर्भूतता, सुधारस म्हणजे पंचपक्वान्नं, सुधारस म्हणजे समाधान, सुधारस म्हणजे तृप्ती.. सुधारस म्हणजे देवत्व, सुधारस म्हणजे साधेपणातला गोडवा..!
सुधारस-पोळीचा घास म्हणजे अमृताचा घास..!
प्रभोसाहेब, अत्यंत आभारी आहे मी आपला..
हम्म
सुधारस म्हणजे साखर, साखर म्हणजे डायबेटिस (हो आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना हेच इक्वेशन समजते, काय करणार), डायबेटिस म्हणजे पथ्य, पथ्य म्हणजे वैताग, काय रे देवा! (संदीप खरेंची क्षमा मागून)
(ह. घ्या हो तात्या)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सर्वांना धन्यवाद..तात्या आणी
सर्वांना धन्यवाद..तात्या आणी ररांचा प्रतिसाद आवडला.
(विषय दिलेला नाही)
सुधार
'सुधारस' रे प्रभो
बघुनच जीव गेला राव निम्मा.
बाकी सुक्यामेव्याच्या प्रमाणातुन हिरवा माज भयंकर टपकत आहे.