शाही कुल्फी

0
0

लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत गावालाच मुक्काम असायचा. दुपारी उकाड्याने जिवाची नुसती काहीली काहीली व्हायची (फ्रिज वगैरे लाड तेव्हा गावाला नव्हते) आणि तेव्हा तो देवदुता सारखा यायचा. मगन आईस्फ्रुटवाला. त्याच्या कडे १० पैश्यांपासुन ते १ रुपया पर्यंतची वेगवेगळी आईस्पृटं/ कुल्फ्या असायच्या. लांबुनच त्याच्या सायकलची घंटी (देवळात असते ना तशी घंटा) कानी आली की आम्ही धुम घरात पळायचो. आजीच्या मागे कटकट करुन शेवटी २०-२५ पैसे पदरात पाडुन घ्यायचो. पण तो वर तो पठ्या पुढे निगुन हेलेला असायचा. मग माकडा सारख्या उड्या मारत आम्ही त्याच्या मागावर जात असु. पण एवढ्या कडक उन्हात फक्त एक कुल्फी खाउन कुणाच भागतय. उगाच रसना चाळवायची आपली झालं. परत आजी कडे जायची सोय नसायची. मग मोर्चा मामाच्या घरी (आजोळपण त्याच गावात आहे.) मग आईच्या आईला मस्का मारायचो wink. दुधापेक्षा दुधावरची साय प्रिय असल्याने आजी जास्त आढेवेढे न करता पैसे द्यायची. मग आमची स्वारी थेट मगनभाईच्या पुढ्यात. तो मस्त पैकी पळसाच्या पानावर कुल्फीचे तुकडे कापुन द्यायचा. आहा हा हा काय सुख असायच ते काय सांगु?
बालपण सरलं. जस जसे मोठे होत गेलो तस तसं त्या आईस्फ्रुटाची जागा पेप्सीकोलाने घेतली. कुल्फी मात्र अजुन तग धरुन होती. पुढे पुढे मगनभाईपन यायचा बंद झाला, दुसरा कोणी तरी यायचा पण मगनभाईच्या कुल्फीची सर त्याला नव्हती.

हल्ली बाजारात तर रेडिमेड कुल्फी मिळते, कुल्फी मिक्स् पण मिळते.

तर मग काय करायची का आज कुल्फी wink
एकदम सोप्पी आणि झटपट कृती आहे. प्रयत्न करुन पहा.

साहित्यः


१५० ग्रॅम कंडेंस मिल्क.
१५० ग्रॅम क्रिम.
१२० ग्रॅम दुधाची भुकटी (मिल्क पावडर).
५० ग्रॅम साखर.
सुका मेवा (काजु बदाम पिस्ता मनुका)
केशर.

कृती:

सुक्या मेव्याचे बारीक तुकडे करुन घ्यावे.
साखर आणि केशर मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे.


एका मोठ्या भांड्यात कंडेंस मिल्क+ भुकटी + क्रिम + साखर एकत्र करुन चमच्याने फेटुन घ्यावे.


मग त्यात सुका मेवा टाकावा. आणि परत एकदा फेटावं.


तयार मिश्रण लहान कप मध्ये ओतुन वरुन अ‍ॅल्युमिनियमच्या कादगाने बंद करावं.
आणि मग ते कप फ्रिजर मध्ये किमान ४ तास थंड करत ठेवावं.

सर्व्ह करताना वरुन परत थोडासा सुका मेवा टाकावा.

काय मग? करतायना आज हास्य

ह्म्म्म्म

1

का रे असा अत्याचार कर्तोस Crazy

कुल्फी मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्च आहे

गणप्या मस्तच आहे..केळीच्या

2

गणप्या मस्तच आहे..केळीच्या बागा अहेत का आफ्रिकेत

वॉव!!

3

वॉव!!

गणा

4

आत्माराम थंडावला


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

(विषय दिलेला नाही)

5

Angry

राजे, मीमतर्फे मला

6

राजे, मीमतर्फे मला नायजेरियाला जायचे तिकिट द्या. Cool तिथेच असतो ना हा गणपा?

मीमातर्फे ???? असं मिळणार

7

मीमातर्फे ???? असं मिळणार असेल तर सर्वांना मिळावं....

मला सगळ्यात पयल्यांदा. मी

8

मला सगळ्यात पयल्यांदा. मी सुचवलं की नै? म्हणून . Big smile

सहमत

9

पहिला डाव भुताचा

हो मी भूत आहे असं म्हणालात

10

हो मी भूत आहे असं म्हणालात तरी चालेल. तरीही मलाच हवं पहिलं तिकिट. Evil

वावा अस कस नाही चाल्णार अस

11

वावा अस कस
नाही चाल्णार अस
आम्हाला प्ण पाहीजे तिकीट

घ्या की! नंतर.. ?

12

घ्या की! नंतर.. सगळेच आले की काय thinking?

लै भारी रे गणपा..

13

लै भारी रे गणपा.. Grade


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मला खायला मनाइ आहे....असले

14

मला खायला मनाइ आहे....असले फोटोस टाकु नका हो.........

तुम्हा सर्वांचा खर्च

15

तुम्हा सर्वांचा खर्च करण्यापेक्षा मला एकट्याला टिकिट द्या. मीच येतो;)
काय म्हणता मालक ?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

राजे, अजुन दोन महिन्यानंतरचे

16

राजे, अजुन दोन महिन्यानंतरचे द्या म्हणजे माझं पण जमेल भारतात यायचं wink

फक्त येण्याचे तिकीट मिळेल.

17

फक्त येण्याचे तिकीट मिळेल. परत जाता येणार नाही. चालेल?

+१

18

तेच बरं रे बाबा. नाहीतर इकडे रांग लावून उभे करावे लागतील सगळे. त्यात 'रूपा फ्रंटलाईन' वापरणार्‍यांना राजे पुढे घुसवेल ते वेगळंच. wink
असो.
कुल्फी नि कुल्फिवाल्याच्या आठवणी आमच्याही बालपणच्या रम्य आठवणी. हल्लीच्या शुचिर्भूत कुल्फीला त्या कुल्फिवाल्याकडील कुल्फीची सर नाही.
पण कुल्फीचा स्वाद काही औरच. अगदी बॉस्टनभेटीतसुद्धा (कधी कधी आम्ही पण गोर्‍या सायबाच्या देशात जातो हे हळुच सांगतोय बरं का.)देशी कुल्फीचे दुकान शोधले नि तीन महिने त्याचे खाते चालू ठेवले. साला मस्त वेगवेगळ्या स्वादांच्या कुल्फी बनवून पैसे उकळायचा आमच्या कडून. शुं मज्जानु लाईफ.

राजेनी सोयीस्क्र मौन पत्करलं

19

राजेनी सोयीस्कर मौन पत्करलं आहे! निषेध! angery

कसं गार गार वाटलं.... नक्की

20

कसं गार गार वाटलं....
नक्की करणार Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

घ्या टिकिट. नंतर रडायचे काम

21

1

घ्या टिकिट.

नंतर रडायचे काम नाय समजलं angery

वाटा मिर्‍या एअर इंडियावर


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कुल्फीत मिर्‍या कुठे घालतात?

22

कुल्फीत मिर्‍या कुठे घालतात?

वा झक्कास...

23

वा झक्कास...


पुष्करिणी

झक्कास !!!!!!!!!!! आता या

24

झक्कास !!!!!!!!!!!

आता या रविवारीच करुन बघते. हास्य

मी हा धागा उघड्ला नाही आणी

25

मी हा धागा उघड्ला नाही आणी काही पाहिले सुद्धा नाही.
Sick

( अवांतरः जीवघेण्या पाकृ असतात रे बाबा तुझ्या. )

आपण एमिरेट्सच एक बोइन्गच बुक

26

आपण एमिरेट्सच एक बोइन्गच बुक करुयात Big smile सगळे मिमकर जाउयात..
ए पण जाताना मला घ्यायला विसरु नका Oups . पेट्रोल भरायला उतरालच ना माझ्या गावात..

य्य्य्य्य्य्य्य्य्य्म्म्म्म्म

27

य्य्य्य्य्य्य्य्य्य्म्म्म्म्म्म्म्म्म्म्मीईईईईई !!!

मस्त आहे कुल्फी

मस्त रेसिपी

28

मस्त रेसिपी

कुल्फी पाहून जीव थंडगार झाला.

29

कुल्फी पाहून जीव थंडगार झाला.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही