तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.
सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.
हिंदुस्थानच्या किनार्याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.
काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.
रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.
पहाट होत होती, पहार्यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.
बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.
त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्याकडे जाऊ लागले.
बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.
आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.
ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्यालाच कुणी जाळू शकेल काय...
तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “
या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”
यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्याबरोबर हात बांधूनच.
अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्यात
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
>>>रात्र उलटून चालली, सावरकर
>>>रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.
हे वाचताना अक्षरशः रोमांच उभे राहिले..!!!!
" या फेनमिषे हससि निर्दया कैसा..." या ओळी इथल्याच असतील का ??
स्वातंत्र्यलक्ष्मी की जय !
अर्धवटदादा लेखाबद्दल
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
मायातै.. धन्यवाद राजेंना
मायातै.. धन्यवाद राजेंना द्या.. त्यांनी आज सकाळी सकाळी उद्युक्त केलं नसतं लिहायला तर आज कदाचीत काही कारणामुळे लिहायचा राहीलं असतं.. आजच्या दिवसाचं औचित्य साधता आलं नसतं.
राजे धन्यवाद हो..
"या फेनमिषे हससि निर्दया कैसा..." या ओळी इथल्या नाहीत, ब्रायटनच्या किनार्यावरच्या आहेत.. पुढच्या लेखात हेच काव्य घ्यायचा विचार आहे, तेव्हा सविस्तर लिहेनच.
स्वातंत्रलक्ष्मी की
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
सुन्दर लिहिलय .. धन्यवाद
मस्त
सुरेख लिहलयं!!!
जबरा!
प्रणाम
आज फ्रान्सच्या मार्सेलिसच्या समुद्रात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी मारिया बोटीतून मारलेल्या उडीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत
त्यांच्या धाड्साला आणि देशप्रेमाला लक्ष लक्ष प्रणाम
अर्धवटरावांना धन्यवाद!
जय हिंद!
छान लेख. सारवरकरांच्या या
छान लेख. सारवरकरांच्या या उडीचे एक मुख्य उद्दीष्ट आपल्या इतर सहकार्यांना प्रेरीत करणे हे ही होते. १-२ फूट व्यासाच्या खिडकीतून जाताना अंगभर खरचटले होते. त्यात खारे थंड पाणी.मार्सेलिसचा बोचरा वारा. या सर्वातून पुढे जाऊन त्यांनी पोहत किनारा गाठला होता. खरोखर त्रिखंडात गाजलेली उडी होती.
-पुण्याचे पेशवे
सुरेख लेखमाला सुरु आहे
सुरेख लेखमाला सुरु आहे अरुदादा. ग्रेट!
ग्रे ट च
ऊत्तम वर्णन!!!
माझे लिखाण
नंमन त्या राष्ट्रपुरुषाला....
नंमन त्या राष्ट्रपुरुषाला....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
भारत माता की जय !
भारत माता की जय !
सुरेख लेखमाला सुरु आहे ,
सुरेख लेखमाला सुरु आहे , आवडले.
हा दुवा डकवावासा वाटला
हा दुवा डकवावासा वाटला इथे..
थेट फ्रान्सच्या त्याच किनार्यावर १०० वर्षानंतर या ऐतिहासिक प्रसंगाचा गौरवसमारंभ रंगला..
http://72.78.249.107/esakal/20100710/5625339008938543091.htm
वा छान...!!
काटा आणला म्हणलं अंगावर ....
"जिवंत प्रसंग" च उभा टाकला डोळ्याफुडे..वा छान वाखाणण्याजोगे लिखाण बर का..
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
सुरेखलिहिलेस
सुरेखलिहिलेस
जेव्हा पहिल्यांदा अंदमानला
जेव्हा पहिल्यांदा अंदमानला गेलो तेव्हा रस्त्यावरची माती उचलून माथ्याला लावली, माझ्याबरोबर असलेल्या एका विदेशी पाहूण्याने ( इंग्रज... कंपनीतर्फे मला पाठवले होते ह्याच्याबरोबर) मला का असे विचारले... मी एक जळजळीत कटाक्ष टाकला व मला माहित असलेले सावरकर त्याच्यासमोर उभे केले ! स्वारी ! एवढच म्हणाला !
बाकीचे दहा दिवस तो जेथे जेथे तात्यासाहेबांचे जे जे पुस्तक मिळेल (इंग्रजी मध्ये) ते ते विकत घेत होता...
जाता ना मला एवढचं म्हणाला " राज, थॅन्क्स ! तुझ्यामुळे एका हिर्याची ओळख झाली !"
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
काय आठवण काढलिये मालक.. त्या
काय आठवण काढलिये मालक..
त्या खोलीत गेल्यावर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं.. खाली बसुन आम्ही 'ने मजसी ने' म्हणलं होतं, बाबुजींच्या चालीवर.. उठावसंच वाटत नव्ह्तं.. त्या जेलमधे फिरताना सतत शहारत होतो.. लिहीन पुन्हा केव्हातरी त्यावर..आणि त्या खोलीत बुट घालुन शिरलेल्या भो*** बरोबर झालेल्या भांडणावरपण..
लिहा मालक लिहा... !
लिहा मालक लिहा... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+ १
लौकर लिहा! सुरेख लेखमाला चालू आहे!
एकदा त्या @$*#(# मणिशंकर
एकदा त्या @$*#(# मणिशंकर अय्यरला आणि त्याला मम म्हणणार्या षंढ मराठी नेत्यांना तिथे १ दिवस ठेवावे.
विमो शुद्धलेखनाची घोडचुक आहे
विमो शुद्धलेखनाची घोडचुक आहे इथे..
एकदा त्या @$*#(# मणिशंकर अय्यरला आणि त्याला मम म्हणणार्या षंढ मराठी नेत्यांना तिथे १ दिवस ठेवावे.
इथे वस्तुतः मण्या मा**** अय्यर अस हवं.. इथुन पुढं लक्षात ठेवा..
या घोडचुकी बद्दल कान पकडुन
या घोडचुकी बद्दल कान पकडुन माफी मागतो.
स्वप्नाळू
स्वप्नाळू लोकांचे स्वप्नाळू जग ?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
आमचं गाव तसं चांगल हाय
आमचं गाव तसं चांगल हाय मंडळी.. ह्या एका सातारकरावर जाउ नका..
सगळ्या गावाचा कुजकटपणा एका माणसात भरलाय
.. त्यामुळे आख्खं गाव गोड आहे..
च्यायला लिवल्यावर प्रतिक्रिया द्यायला येत नाही.. तेव्हा नुसता वाचनमात्र.. काड्या सारायला पुढं.
अप्रतिम लेखन
अप्रतिम लेखन
सुरेख लिहीले आहे .... या
सुरेख लिहीले आहे .... या प्रसंगाचे स्मरण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आभार..........!!!
पण सावरकरांनी तुम्हा आम्हाला जमेल असे ४-८ तासाचे उपोषण केले काय....???
असते तर आम्ही पण झालो असतो त्यांचे फ्यान......
उगाच समुद्रात उड्या काय मारतात, हिंसाचाराला पाठिंबा काय देतात, सैन्यात भरती व्हा काय म्हणतात........ छ्या!!!
म्हणा रे सगळ्यानी, वैष्णव जन तो....
(उपोषण आणि सत्याग्रह यामुळे इंग्रज देश सोडून गेले असे म्हणणारे कोणी दुसर्या महायुद्धानंतर किती देश स्वतंत्र झाले याची यादी तपासतील काय....???)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी देशासाठी खूप काही सहन केले, ह्यात कोणाचेच दुमत नसावे.
मला वैयक्तिकरीत्या गांधीवाद पटत नाही वा गांधींनी जे राजकारण केले, ते अतिशय घृणास्पद वाटते, पण ही अशी टिंगलीवजा भाषा वापरुन काय साध्य होते? कोणी मानो वा न मानो, भारतीय समाजाला - ज्यात मुले व स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता - अशी काही आंदोलने गांधींनीच उभी केली आणि काही न काही प्रमाणात ब्रिटीश राजसत्तेवर त्याचे परिणामही झाले असतीलच.
सावरकरांना श्रेष्ठ वा लोकोत्तर ठरवण्यासाठी गांधीबद्दल अशी भाषा वापरण्याची जरुर आहे का? त्याने काय राष्ट्रभक्ती सिद्ध होते का?
खुद्द सावरकर असे बोलले असते का?
@निर्मयी.......
भारतीय समाजाला - ज्यात मुले व स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता - अशी काही आंदोलने गांधींनीच उभी केली आणि काही न काही प्रमाणात ब्रिटीश राजसत्तेवर त्याचे परिणामही झाले असतीलच.>>>>
उदाहरणार्थ....???
तुम्ही इंग्रज सरकारच्या प्रतिनिधी आहात असे मानून विचार करुन काय परिणाम होऊ शकला असता ते सांगा......
गांधीजींनी केलेल्या/मांडलेल्या 'काही' विचारांबद्दल आदर आहे. ग्रामस्वराज्य सारखी योजना अफलातून आहे पण जिथे पूर्ण समाज आणि त्याच्या वर्तमान-भविष्याचा विचार होणे अपेक्षित होते तिथे 'मी सांगतो म्हणून असेच झाले पाहिजे' हा हट्ट चुकिचा'च' होता. ज्यामुळे भारताचे अपरिमित नुकसान झाले आहे....
एकाच वेळी 'संत' आणि 'राजकिय गुरु' होण्याचा हा प्रयत्न होता असे मला मनापासून वाटते. 'अनाठायी' करुणा, दया, क्षमा राजकारणात चालत नाही,चालू नये.
बाकी टिंगलवजा लिहून काही होणार नाही हे ठाऊक आहे आणि सावरकरांना मोठे ठरवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरजही नाही.
(नथुराम गोडसेने केलेली प्रचंड मोठी चूक आपल्याला भोवते आहे. गांधींचे 'नैसर्गिक' मरण पुढचा पूर्ण राजकिय आणि सामाजिक पट बदलून गेले असते.....वैयक्तिक मत.
)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
>>भारतीय समाजाला - ज्यात मुले
>>भारतीय समाजाला - ज्यात मुले व स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता - अशी काही आंदोलने गांधींनीच उभी केली आणि काही न काही प्रमाणात ब्रिटीश राजसत्तेवर त्याचे परिणामही झाले असतीलच.
संपुर्ण मान्य.
>>सावरकरांना श्रेष्ठ वा लोकोत्तर ठरवण्यासाठी गांधीबद्दल अशी भाषा वापरण्याची जरुर आहे का? त्याने काय राष्ट्रभक्ती सिद्ध होते का?
ठरवण्याची गरज काय, तात्याराव मोठे होतेच त्याला बाकिच्या फुटपट्ट्या कशाला..
भाषेबद्दल म्हणाल तर, सध्याच्या एकंदरीत परिस्थीतीत ह्या महापुरुषांच विटंबन, विडंबन होत असलेलं पाहुन कधितरी अनावर होत असेल संताप एखाद्याचा.. पण तरीही हे निषिद्धच.. आणि मण्या मा**** अय्यर काहीही बोलला तर त्यावर कुणि आक्षेप घेत नाही, सगळिकडेच भाषाशुचिता हवी ना.. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी..
असो.. माझा वैयक्तीक तरी निषेध आहे अशी भाषा वापरायला पण तरीही प्रामाणिकपणे विचाराल तर अशी भाषा वापरणार्याला मनापासुन थांबवावसं वाटत नाही,..अर्थात हे चुकतच माझं हेही मान्य आहेच.
>>खुद्द सावरकर असे बोलले असते का?
कधिही नाही.. पण सगळेच सावरकर कसे होतील,
एकदा एका फुटकळ संपादकानं महात्माजींबद्दल काहीतरी छापलं होतं तेव्हा तात्यारावांनी त्याला काय खडसावुन उत्तर दिलय हे लिहिन कधीतरी. (स्वगत :अर्ध्या भा*.. इतकी तोंडभरुन आश्वासनं देतोयस.. आधिचे पेंडींग लेख कोण तुझा बाप लिवनार का.)
अरुदादा, मणिशंकर अय्यर ही
अरुदादा, मणिशंकर अय्यर ही व्यक्ती नालायक आहेच, ह्याबद्दल काही शंकाच नाही. गैरसमज नसावा.
माझे म्हणणे इतकेच आहे, ताडफाड भाषा वापरण्याव्यतिरिक्त आपण काय योगदान देतो हो? अशी भाषा वापरतो आणि मग पुढे विसरुन जातो... प्रत्यक्ष काही काम (थोड्या प्रमाणात का होईना) करतो का? करु का? असो.
खुप गोलगोल लिवता येइल
खुप गोलगोल लिवता येइल निर्मयीतै.. पण उगाच झाडमारा (कसा वाटला शब्द, beeting around bush ला) कशाला.
माझं कन्फेषन - जितकं करायला हवं आणि जे करायला हवं ते अजिबात करत नाही.. काहीच करत नाही म्हणलात तरी चालेल.
खरं सांगु. इथं गांधीजी मोठे वाटतात हो. सगळ्यांना एक छोटासा कार्यक्रम दिला, सहजशक्य. प्रत्येकाला वाटायला लागलं आपण काहीतरी करतोय. (इथं त्या कार्यक्रमाच्या फायद्यातोट्यांवर चर्चा अपेक्षित नाहिये.)
अरुदादा, झाडमारा शब्द मस्त
अरुदादा, झाडमारा शब्द मस्त
खरं आहे तुम्ही म्हणताय ते. स्वातंत्र्यवीर व इतर क्रांतिकारकांनी जे केलं ते प्रत्येक सामान्य माणसाला शक्य नव्हतं. तीच पोकळी गांधींच्या आंदोलनांनी भरुन काढली, असं मला वाटत. तेच त्यांचं यश. भारतीय समाजमनाचा विचार करता, त्यांना दिशा दाखवणारा हवा होता, तो मिळाला. पडद्यामागचं राजकारण लोकांना त्या वेळी ल़क्षात आलं नसेल, वा कळालंही नसावं, कारण आपल्याकडे माणसाचा देव पटकन बनवला जातो, मग त्याच्या काही चुकाच दिसत नाहीत...
>>स्वातंत्र्यवीर व इतर
>>स्वातंत्र्यवीर व इतर क्रांतिकारकांनी जे केलं ते प्रत्येक सामान्य माणसाला शक्य नव्हतं.
अमान्य.. त्यांच्या आजुबाजुचे बहुतेक सर्वजण आधी सामान्यच होते, एका धेययपथावर चालायला लागल्यावर ताकद आली. आणि तात्यारावांनी निखारे फुलवुन अमोघ ताकद दिली..
>>तीच पोकळी गांधींच्या आंदोलनांनी भरुन काढली, असं मला वाटत. तेच त्यांचं यश.
माहित नाही.. आत्यंतीक मवाळ आंदोलनांनी, आक्रमक मार्गांचं आणि अनुयायांच खच्चीकरण झालं असेल तर तो तोटा जास्तच की.
>>भारतीय समाजमनाचा विचार करता, त्यांना दिशा दाखवणारा हवा होता
आपल्याला देव, बाबा, बुवा हवा असतो, सगळ्या चिंता मिटण्याची ग्यारंटी देणारा.. मग चिंता स्वराज्याची असो वा मुलीच्या लग्नाची.., तो नक्की मिळाला, अजुनही मिळतो, रोज नवा. नाहीतर भगतगण किती, आणि महात्माजींचे शिष्यांमधे बाबा आमटे किती!!
अशा समाजात, काही हवं असेल तर कष्ट करुनच, रक्त ओकुनच मिळवावं लागेल, हिसकावुनच घ्यावं लागेल, अस म्हणणारे तात्याराव तेव्हा वेगळे पडले, अजुन पडतात यात नवल काय.
>>पडद्यामागचं राजकारण लोकांना त्या वेळी ल़क्षात आलं नसेल, वा कळालंही नसावं, कारण आपल्याकडे माणसाचा देव पटकन बनवला जातो, मग त्याच्या काही चुकाच दिसत नाहीत...
सहमत.
>>अमान्य.. त्यांच्या
>>अमान्य.. त्यांच्या आजुबाजुचे बहुतेक सर्वजण आधी सामान्यच होते, >> मान्य, पण तरीही ज्यांना हा मार्ग झेपणारा नव्हता, अश्या सामान्यांपेक्षा क्रांतिकारकांचा पिंड वेगळा होता. त्याविना ते जीवावर उदार होऊच शकले नसते. हा फरक मला म्हणायचा आहे. काहीजणांना ते धैर्य जमले नाही, असे लोक फितूर वा माफीचे साक्षीदार बनलेच ना?
>>आत्यंतीक मवाळ आंदोलनांनी, आक्रमक मार्गांचं आणि अनुयायांच खच्चीकरण झालं असेल >>> सर्वसामान्य माणसांचं तेह्वा लगेच मानसिक खच्चीकरण झालं असेल, असं वाटत नाही. नपेक्षा, आंदोलनांना एवढे भरभरुन प्रतिसाद मिळते ना. आक्रमक मार्गांचं खच्चीकरण गांधींनी निश्चितच केलं असं माझंही मत आहे आणि ती चूक खूप महागातही पडली. क्रांतिकारकांच्या मार्गाचं त्यांनी जे अवमूल्यन केलं ते चुकीचचं आहे. कदाचित त्या वेळी मोठेपणा बाजूला ठेवून गांधींनी क्रांतिकारक, नंतर सुभाषबाबूजी वगै९रे प्रभृतींना पाठींबा दिला असता, तर पूर्ण स्वातंत्र्य कदाचित "अखंड भारताला" मिळू शकले असतेही...
>> अशा समाजात, काही हवं असेल तर कष्ट करुनच, रक्त ओकुनच मिळवावं लागेल, हिसकावुनच घ्यावं लागेल, अस म्हणणारे तात्याराव तेव्हा वेगळे पडले, अजुन पडतात यात नवल काय. >> स्पष्ट आणि खरं बोलणारी व्यक्ती नेहमीच वेगळी पडते. आजतागायत हाच न्याय नाहीये का?