पंचामृत

0
0

पेश करतोय गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत

कच्चा मालः

१. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्‍याचे पातळ काप (१५-२०)
२. भाजलेले शेंगादाणे (१५-२०)
३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०)
४. कोथिंबीर
५. कडीपत्ता
६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी)
७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी)
८. मीठ
९. चिंच
१०.गुळ
११. जिरे
१२. मोहरी
१३. तिखट

स्टेप १: वाटीभर पाण्यात चिंच भिजवत ठेवणे..साधारण एक तास

स्टेप २: एका छोट्या पतेल्यात जिर्‍या मोहरीची फोडणी करावी.

स्टेप ३: फोडणीत कोथिंबीर, कडीपत्ता, खोबर्‍याचे पातळ काप, शेंगादाणे , हिरव्या मिरचीचे तुकडे, तिळाचे कूट, शेंगदाणा कूट घालून थोडा वेळ परतावे.

स्टेप ४: वरच्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणी तिखट घालावे.

स्टेप ५: आता त्यात एक वाटी बनवलेला चिंचेचा कोळ टाकावा. अर्धा वाटी साधं पाणी पण टाकावं.

स्टेप ६: त्यात गुळाचा एक छोटा तुकडा घालावा. आणी त्यास १०-१५ मिनिटे उकळू द्यावे. (घट्टपणा कसा हवाय त्यानुसार)

तायार आहे नैवेद्याचे पंचामृत....वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.

आज जर्मनीची मॅच असल्याने

1

आज जर्मनीची मॅच असल्याने आम्ही तीर्थप्राशन करणार आहोत, तेव्हा हे पंचामृत उद्या! wink

अगदी हे आणि असेच करते मी हे

2

अगदी हे आणि असेच करते मी Big smile
हे पंचामृत दुसर्‍या दिवशी गरम भातासोबत खायला लै म्हणजे लैच भारी लागते


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

जबरा !

3

जबरा !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त रेसिपी

4

मस्त.
हास्य

सर्व वाचकांना धन्यवाद.

5

सर्व वाचकांना धन्यवाद.

गेले ३-४ वर्शे हा पदार्थ

6

हास्य गेले ३-४ वर्शे हा पदार्थ अस्तित्वात आहे हेच विसरुन गेले होते...
अश्या किति गोष्टी असतिल देवच जाणे..
थन्क्स प्र्भो..आठवण करुन दिलिस्..मन भुतकाळात गेले..

मस्त, टेम्प्टींग आहे

7

मस्त, टेम्प्टींग आहे

+१

8

सहमत.
बोट बुडवायचा मोह होतोय


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

मस्त...

9

पंचामृत मलाही फार आवडते,छान दिसते आहे.

स्वगत- हे सगळे 'प्रतीक' उत्तम बल्लवाचार्य दिसतात..

स्वाती

आवडले मला ही खुप हे, करेन मी

10

आवडले मला ही खुप हे, करेन मी तयार.

झालं की प्रभोला नैवेद्य

11

झालं की प्रभोला नैवेद्य दाखवायला विसरू नका हं! wink

नाय

12

अरे हा देवीचा नैवेद्य आहे. गणपतीसाठी आम्ही जे पंचामृत करायचो ते दुधाचे पदार्थ (दूध, तूप, दही, लोणी) नि साखर समभाग मिसळून. प्रतिष्ठापना नि विसर्जनावेळी हा नैवेद्य हवाच.

दुग्ध-दधि-घृत-मधु-शर्करा एतै:

13

दुग्ध-दधि-घृत-मधु-शर्करा एतै: पञ्चै: द्रव्यैर्यत्कृतं तत्पञ्चामृतमिति। हास्य

बरोबर रे

14

चौथा मध, लोणी नाही. चुकीच्या दुरूस्तीबद्दल सादर प्रणाम.

कारल्याचे तुकडेही

15

ह्यात थोडे कारल्याचे तुकडेही टाकतात ना...


पुष्करिणी