स्वरालयीची दुनिया..८

0
0

स्वरालयीची दुनिया..१
स्वरालयीची दुनिया..२
स्वरालयीची दुनिया..३
स्वरालयीची दुनिया..४
स्वरालयीची दुनिया..५
स्वरालयीची दुनिया..६
स्वरालयीची दुनिया..७

दो नैना और एक कहानी..(येथे ऐका)

पंचमदांचं एका सहज सुंदर चालीतलं परंतु एक वेगळंच गाणं..आरती मुखर्जीने म्हटलंयही अगदी छान..

दो नैना और एक कहानी
थोडासा बादल, थोडासा पानी
और एक कहानी!

गाण्याची चाल अगदी कुणी सहज बोलल्यासारखी-गप्पा मारल्यासारखी, सुलझी हुई, समजावणीची, मर्मबंधातल्या ठेवीची! 'और' शब्दावरचं मिंडकाम सुरेख..! 'एक कहानी' ची 'पप ध म'प..' ही स्वरसंगती अगदी भाबडी, निरलस.. हास्य

थोडीसी है जानी हुई, थोडीसी नयी
जहा रुके आसू वही पुरी हो गई
है तो नयी फिर भी है पुरानी..!

गुलजार साहेबांनी सुंदर लिहिलंय गाणं..

केवळ त्या कहानी करताच नव्हे, तर ह्या गाण्याच्या चालीकरताही 'थोडीसी है जानी हुई, थोडीसी नयी' किंवा 'है तो नयी फिर भी है पुरानी' हे शब्द अगदी फिट्ट बसतात..'थोडीसी नयी' आणि 'पुरी हो गई' ची स्वरसंगती अगदी कॉन्ट्रास्ट तरीही अनोखी.. आणि हीच पंचमदांची खासियत..! आणि अश्या काहीश्या वैचित्र्यपूर्ण स्वरसंगतीतूनही अगदी नैसर्गिक वाटणारं, स्वाभाविक वाटणारं गाणं बांधणं हीच पंचमदांची प्रतिभा..!

सलाम..

-- तात्या अभ्यंकर.

छान !

1

छान !

तात्या साब एकदम मस्त लिखाण

2

तात्या साब एकदम मस्त लिखाण हो, अगदी पंचमदा सारखे सहज सुंदर चालीतले हास्य

राग, सुर वगैरेचे आपल्याला काही ज्ञान नाही पण सोप्या भाषेत तुम्ही सांगीतलेली माहिती खुप ज्ञान देउन जाते. गाण्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघता येते आणि बर्‍याचद आधी न कळले सौंदर्य टिपता येते.

+१

3

>>राग, सुर वगैरेचे आपल्याला काही ज्ञान नाही पण सोप्या भाषेत तुम्ही सांगीतलेली माहिती खुप ज्ञान देउन जाते. गाण्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघता येते आणि बर्‍याचद आधी न कळले सौंदर्य टिपता येते.

पुर्णपणे सहमत आहे. हास्य

सुंदर !

4

सुंदर !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त!!

5

मस्त!!

छान!!!!!

6

छान!!!!!


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सर्व प्रतिसादक रसिकवरांचा मी

7

सर्व प्रतिसादक रसिकवरांचा मी ऋणी आहे..