सोसायटी आणि बॅचलर

0
0

शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.

घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???
मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.
घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.
मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.
घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा

माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला. ह्या फोन मधे झालेला संवाद खालील प्रमाणे

मी:- नमस्कार सर, आताच घरी आलो, तुम्हाला करणारच होतो फोन
घरमालक:- ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.
मी: कशा संदर्भात???बोला ना???
घरमालकः- सोसायटी मधे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले.
मी:- अच्छा (स्वगत :- आता बहुतेक हा घर सोडायला सांगणार)
घरमालक:- तुमच्या खाली राहाणार्‍या लोकांनी सांगितले आहे की काल तुमच्या कडे पण मुली आल्या होत्या.
मी:- तुमच्याशी मी ह्या विषयावर सोमवारी आल्या नंतर बोललेले चालेल का??? ह्या गोष्टी फोन वर बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष बोललेले चांगले असे मला वाटते.
घरमालकः- ठीक आहे.

खरे तर मी कधिच माझ्या कुठल्याही मैत्रीणिला माझ्या रुमवर घेउन गेलो नाहिये. माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी त्याला फोन लावला असता कळले. काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते. त्यावर मित्राला मी घरमालकांसोबत झालेले बोलणे सांगितले. त्यानंतर तो आमच्या घरमालकांना भेटायला गेला. तेव्हा त्याने सर्व परिस्थीती त्यांना समजावुन सांगितली.

माझा ह्या मित्राचे लग्न ठरले आहे, रीतसर घरच्यांनी साखरपुडा करुन दिलेला आहे. आता त्याची होणारी बायको आमच्या घरापासुन जवळच राहते. त्यामुळे सहाजिकच शनिवार्-रविवार ते बराच वेळ सोबतच घालवतात. कधी तिच्या रुमवर तर कधी आमच्या. बरेच वेळेस मी पण घरी असतो. मला त्यांच्या वागण्यात काहिच वावगे वाटत नाही. साधारणता सर्वसाधारण सभ्यतेचे नियम पाळुन तो किंवा ती कधिच एकमेकांकडे रात्री ९ नंतर थांबत नाहित. आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा.

ह्या सगळ्यावर विचार करत असताना मला आठवले मि पा वरचा परा चा प्लेटॉनिक मैत्रीचा धागा. अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का??? एक बॅचलर मुलगा आणि एक मुलगी सोबत आल्यावर नेहमी नको ते चाळेच करतात का??? आता माझ्या मित्राने काय करावे??? नेहमी भेटायला बाहेर कुठेतरी जाणे हे शक्य होत नाही. सार्वजनिक ठिकाणी ह्यांना प्रेमीयुगुल म्हणुन पोलिस त्रास देणार नाही कश्यावरुन??? एका व्यक्तिच्या बेजवाबदार वागण्यामुळे सर्वांना त्रास का???

असो तर आज रात्री मालकांना भेटायला जात आहे. त्यांना वरिल व अजुन काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. बघा तुम्हाला काय वाटते. मी फक्त हे प्रश्न विचारुन घर बदलावे लागणार नाही अशी आशा करतो.

एकांताचा मग उपयोग काय?

अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का??? एक बॅचलर मुलगा आणि एक मुलगी सोबत आल्यावर नेहमी नको ते चाळेच करतात का???

तुमचा हा प्रश्न मलातरी अगदीच भोळाभाबडा वाटला. लग्नासाठी ईच्छुक जोडपं लग्नाआधि भेटताना एकमेकांपासून लांब बसून अशा कोणत्या विशयावर चर्चा करणार? माझं लग्न अजून झालेलं नाही. मला तरी एवढी विशुद्ध मैत्री ती देखील होणार्‍या बायकोशी जमेल असे वाटत नाही. एक तर लग्ना आधी असं एकांतात भेटणार नाही. व भेटलोच तर.....!

माझं लग्न

माझं लग्न अजून झालेलं नाही. मला तरी एवढी विशुद्ध मैत्री ती देखील होणार्‍या बायकोशी जमेल असे वाटत नाही

एक तर लग्ना आधी असं एकांतात भेटणार नाही. व भेटलोच तर.....!

ह्या नंतर मला तुम्हाला काहिच उत्तर द्याय्ची इच्छा उरली नाहिये. ठिक आहे.



-निखिल

लोकांचा

हास्य

लोकांचा दृष्टीकोन !
जो ज्या नजरेने पाहील त्याला तेच दिसेल.

बाकी खरं तर विशुध्द मैत्री आहे ह्या जगात..



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बाकी खरं

बाकी खरं तर विशुध्द मैत्री आहे ह्या जगात..

शाहरुख आणी करन जोहर सारखी?

(विषय दिलेला नाही)



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शहारुख आणी

शहारुख आणी करण
मस्तच रे परा



-निखिल

हाहाहा !

हाहाहा !

जो ज्या

जो ज्या नजरेने पाहील त्याला तेच दिसेल.

असेच म्हणतो.

नाहि पटत...

हा प्रोब्लेम येतो ज्या लोकान्ना काहि कामे नसतात आणि जे दुपारच्या वेळेत घरी बसुन असतात त्यान्च्या बाबतीत. म्हनजे हेच लोक असतात की जे आक्षेप घेतात मुली आल्या की. यान्चे बाकिच्या सदनिकान्वर लक्ष नसते, पन बॅचलर जेथे रहातात तेथे मात्र डोळे लाउन बसलेले असतात हे लोक (जास्त करुन लग्न झालेल्या स्त्रिया, अणि मी हे खरे बोलतो आहे). मग या आपल्या नवरा घरी आला कि त्यान्च्या कानावर ही गोष्ट घालनार, तेव्हा बकिच्यान्ना समझनार. तोपर्यन्त कोणाला काहि त्रास् नसतो.
बॅचलर लोकन्निच का सगळी बन्धने का पाळावित ? सगळ्यान्ना एक नियम अनि यान्ना वेगळा का ? हा त्यान्ना बाहेर काढा पन त्यान्नि काहि गोन्धळ घातला तर...

+१

.

अरे

निखिल, अरे मैत्री एवढीच शुद्ध आहे तर बागेत बसून,सोसायटीच्या दरवाजात खुर्च्या टाकून चर्चा करा ना. रुमवर बसून नक्की काय चर्चा करणार? तो आणि ती कशावर चर्चा करतात म्हणे? भूगर्भशास्त्र की जागतिक बॅन्केची दक्षिण अमेरिकेतली धोरणे? असो, आम्हाला त्यातले काही कळत नाही म्हणा. आमचा काळ जुना. ह्यांना लग्नाच्या आदल्या दिवशी बघितले. काळ बदलला, तरी संस्कार जास्त बदलू नयेत अशा मताची मी.
रमाबाई