जिवन

0
0

"राज अरे आज जरा मदत करतोस का ?" - सिंघल साहेब.
"काय काम आहे काका ?" - मी.
" अरे काही नाही माझी काही बिले भरायची होती तसेच जरा दवाखान्यातून माझे रिपोर्ट आणायचे होते, जर तुला त्रास होत नसेल तर कृपया माझे काम करतोस का ? "

हा सिंघल साहेब व माझा दर महीन्याच्या ५ तारखेला ठरलेला व्यवहार... बातचीत.

सिंघल साहेब हे सरकारी दरबारी कधी काळी मोठे व्यक्ती होते, आता राजकारण व प्रसाशकीयसेवा ह्यातुन निवृत झाले आहेत मागील सहा वर्षापुर्वी. ह्यांना मी जास्त नाही एक वर्षापासून ओळखतो आहे अथवा ओळखत होतो. जिवन कसे जगावे व कसे जगू नये ह्याचे उदाहरण त्यांनी माझ्या समोर घालून दिले व त्या दिवसापासून त्यांचे व माझे काही वेगळेच नाते जूळत आले व त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते जुळलेलेच राहीले.
सरकारी दरबारी पहील्यापासूनच नोकरी केली, आई वडीलांनी अपार कष्ट घेऊन ह्यांना शिकवले व ह्यांना सरकारी नोकरी पर्यंत पोहचवले, पण कधी नोकरीचे कारण पुढे तर कधी बायको-मुलांचे कारण ह्यामुळे आपल्या जिवनातील काही स्वप्ने ते नेहमीच मागे ठेऊ लागले व आपल्या मुला बाळांसाठी माया गोळा करु लागले, मोठा मुलगा तर काही मागण्याआधीच प्रत्येक ईच्छा त्याची पुर्ण होत असे व मधल्या मुलीची तर ईच्छा व्यक्त देखील होऊ देत नव्हे ते , ती काही विचार करण्याआधीच तीचे प्रत्येक स्वप्न पुर्ण व लहान शेंडफळ तर विचार करुच नका, वयाच्या १२ व्या वर्षी फक्त त्याच्या साठी म्हणून सिंघल साहेब ह्यांनी गाडी खरेदी केली होती फक्त त्याच्यासाठीच, त्या गाडीत फक्त तो व त्याचा चालक, दुसरे कोणी त्या गाडीला कधी ना हात लावला ना बसून पाहीले.
तीन राजकीय केसेस व पाच एक भ्रष्ट्राचाराच्या केसेस ह्यातून फक्त पैश्याच्या जोरावर बाहेर पडले पण जे सरळ मार्गाने अथवा वाईट मार्गाने कमवले ते आपल्या मुला बाळांसाठी स्वतःचा एक बिमा नाही पण मुलांच्या नावाने लाखोचा बिमा.

पहीला मुलगा अमेरीकेत स्वतःची कंपनी, दोन गोड मुले व पत्नी. , मुलगी वयाच्या १९ व्याच वर्षी एका मुलाबरोबर पळून गेली व तीला परत आणले ते देखील लाखो खर्च करुन जावईला दुकान व घर करुन दिले ते देखील बेंगलोर येथे, तिसरा मुलगा सिंगापूर मध्ये एका नोकरी मध्ये त्याला ती नोकरी व डीग्री मिळावी ह्यासाठी देखील ह्यांनी लाखो खर्च केले .

२० मार्च २००२ सकाळी ७ च्या आसपास कधी तरी वयाच्या ६३ व्या वर्षी अत्यंत कळत नकळत मरणाच्यादारी गेले ह्दय बंद पडून. जवळचे असे नातेवाईक असे नव्हते अथवा आम्हाला माहीत नव्हते, मी व माझे काही मित्र आपल्या रुम मध्ये बसलो होतो व कार्यालयात जाण्याची तयारी करत होतो तेव्हा त्यांच्या घरीकाम करणारा घरगडी येऊन आम्हाला निरोप देऊन गेला.

त्याच्या मोठ्या मुलाला शेजारच्याच अंकलनी फोन लावून सुचना दिली होती पण त्यांच्या चेह-यावर काही वेगळेच भाव होते आम्ही विचारल्यावर ते म्हणाले " ओ साला, म्हणतो आहे की लहान भावाला व बहीणीला बोलवून घ्या आम्ही दुर आहोत, समजा पोहचलोच तरी देखील काही फायदा नाही आहे, फायदा ? साले उसका बाप यहा मरा पडा है, यह फायदा देख रहा है, यह तो कुछ नही, छोटा देख.. कह रहा है... तुम्हीच संपवा हो सगळे काही, आम्ही आलो म्हणून काही वडील परत येणार नाहीत, जो खर्च येईल मी तेथे आल्यावर देईन... माझ्या कार्यालयात सध्या माझ्यावर नोकरी जाण्याची वेळ आली आहे जर मी सुट्टी मागीतली तर माझी नोकरी जाईल...... तथा उन्ह की लाडली बेटी कह रही थी की आपने लेट बता या फिर भी में पोहच जाऊंगी... देख बता के भी ८ घंटे हो गये अभी भी नही आयी है..... अब फोन भी नहीं उठा रही है.. रिंग जा रही है.... प्ल्रेन से आने में तो ती घंटे काफी है यार, बता राज क्या है यह सब, यही लडके है यह सिंघल साब सच्च कहते थे कोई नही आयेगा ! "
मी चमकलो व म्हणालो " उन्हे पता था, उन्ह के लडके नही आयेंगे ?" अंकल म्हणाले " हां यार, उन्हे अछी तरह पता था, लास्ट टाईम आये थे तभी सब जमीन जायदाद का बटवारा कर के गये थे... यहा तक की उन्ह के अपने फंड को भी नही छोडा उन्होनें .. बस मुझे ८ हजार दीये थे, अंतिमक्रिया के लिये वही बचे रह गये थे, आज वही काम आ रहे है.... " असे म्हणून अंकल आपले डोळे फुसू लागले व मी......... एकदम विचित्र अवस्थेत पोहचलो.

मला एकच ओळ आठवत होती.....
काय होतास तु,
काय झालास तु !!!!
कधी काळचा एक राजा माणूस .... छे !!!!

वाईट

Sad

वाईट वाटले वाचून.

राजे वाईट

राजे वाईट वाचले वाचुन!!!! कसे कसे लोक असतात जगात.



-निखिल