इंद्रधनुष्य - ई-अंक

0
-2

सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच. तसाच प्रकारे हा ई-अंक देखील फिरेल व ज्यांना अजून आपले संकेतस्थळ व येथे लेखन माहिती नाही त्यांना आपल्या येथील ३०००+ असलेल्या लेखांची एक झलक मिळेल हा सरळ व साधा उद्देश ह्या अंकाचा आहे.

आपण प्रयत्न करुन प्रत्येक महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्ये असा अंक नियमित काढू व आपले लेखन त्या ९५% मराठी बांधवाजवळ पोहचवण्याचा प्रयत्न करु. ह्या कार्यासाठी ई-मासिकाच्या जून महिन्याच्या समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.

१. रमताराम
२. निर्मयी
३. डॉ. अशोक कुलकर्णी
४. सागर
५. विसुनाना
६. माया
७. पुष्करणी
८. सोना

_____

अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.

  • कोकणसय - शैलजा
  • अद्वितीय - विशाल कुलकर्णी
  • बाबा हरवलाय – अनुराग
  • मात्रा – गणपा
  • कोहम ! – अवलिया
  • शहीद दिवस - पुणेरी ( प्रसन्न कुमार केसकर )
  • मृत्यू आणि मी - पुण्याचे पेशवे
  • रेजकुत्रे – मधुकर
  • दहा वर्ष - ३_१४ अदिती
  • सिडनीपुराणम्॥ - मेघवेडा
  • सहज सुचल म्हणुन – जयपाल
  • जन्मा येण्या कारण तू.. – प्राजु
  • हताश औदुंबर - गंगाधर मुटे
  • उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी - आदिजोशी
  • मिल्कः एक चळवळ – ऋषिकेश
  • लेमन केक - स्वाती दिनेश
  • चिकन साते – गणपा
  • स्पर्श – सागर

काही चुका राहिल्या असतील तर त्या दाखवून द्या योग्य ते बदल लगेच केले जातील.

धन्यवाद.

व्यवस्थापक
मीमराठी.नेट

{अभिनंदन}

1

अभिनंदन हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{एक नंबर! मस्त मस्त मस्त! आता}

2

एक नंबर! मस्त मस्त मस्त! आता याचे प्रिंटआऊट्स काढून वितरण वगैरे करण्याचा विचार करायला हरकत नाही! मी तरी माझ्या संग्रही हार्ड कॉपीज् ठेवणारच!

ही कल्पना पुढे आणून ती तडीस नेण्यास हातभार लावणार्‍या प्रत्येकाचे, सर्वच मीमकरांचे हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा! हास्य

{सर्व लेखक, कवी आणि}

3

सर्व लेखक, कवी आणि व्यवस्थापक्-मालकांचे अभिनंदन..
उत्तम.


पुष्करिणी

{सर्वांगसुंदर अंक काढल्याबद्दल....}

4

संपादक समितीचे हार्दिक अभिनंदन. असा अंक काढण्याचे काम हाती घेऊन तडीस नेल्याबद्दल मालकांचेही अभिनंदन.

अंकाची मांडणी अप्रतिमच आहे. साधारणतः आपण नेटकर व्याकरणाला, वाक्यरचनेच्या नियमांना, भाषाशुद्धीला फाट्यावर मारतो आणि अभिव्यक्तीला महत्व देतो. परंतु अंकामधे व्याकरणाच्या चुका नाहीत. यावरुन अंकासाठी घेतलेले कष्ट लक्षात येतात. ज्यांनी ते कष्ट घेतले, मुळ लिखाणाच्या सौंदर्याला भाषाशुद्धीचे कोंदण दिले, त्यांना शतशः धन्यवाद.

या अंकाचे महत्व नक्कीच मोठे आहे. मराठी साहित्य सृष्टीत नियतकालिके हा प्रकार बंद होत असतानाच सुरु झालेल्या या उपक्रमामुळे वाचकांची बौद्धीक भुक अन रंजनाची गरज भागेल हे नक्कीच.

काही सूचना:
१) याच संस्थळावर वेगळा विभाग करुन इंद्रधनुष्यच्या सर्व अंकांचे पीडीएफ स्वरुपात जतन करता आल्यास नविन येणार्‍या वाचकांना तर ते उपयुक्त ठरेलच पण जुन्या वाचकांसाठीही ते संदर्भ विदागार/ ग्रंथालय म्हणुन उपयोगी पडेल.
२) अंक डाऊनलोडेबल असल्याने त्याचा प्रसार होऊ शकतो हे ध्यानात घेऊन भविष्यात खोडसाळ लोकांचा उपद्रव टा़ळण्यास प्रत्येक पानावर, छायाचित्रावर, चित्रांवर वॉटर मार्क देखील करता येतील.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{+१ सहमत}

5

पुणेरी यांच्या सूचना खरोखर खूप विचारात घेण्याजोग्या आहेत.
राजे पुढच्या अंकापासून या दोन सूचना अंमलात आणुयात.. (१ आधीच आली आहे...डाऊनलोडची.. पण एक वेगळा विभाग करुन त्यात हवा असलेला अंक निवडून उतरवून घेण्याची सोय करुयात)

पुणेरी भाऊ मनापासून धन्यवाद हास्य

(एक पुणेकर) सागर


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{अगदी सप्तरंगी...}

6

अभिनंदन...!
अगदी सप्तरंगी अंक जालावर प्रकाशित केल्याबद्दल सर्व मीम करांचे अभिनंदन.


*****

{सुरेख !!! आप्ल्या सगळ्यांचे}

7

सुरेख !!! आप्ल्या सगळ्यांचे अभिनंदन Big smile

{छान आहे अंक. अभिनंदन!}

8

छान आहे अंक.
अभिनंदन!

{अभिनंदन}

9

अभिनंदन


आपला स्नेहांकित...
-अशोक

{उत्तम दर्जाचा अंक }

10

वाचला. आवडला. काही लेख जे आधी वाचले नव्हते ते या निमीत्ताने वाचले गेले.पुढचा अंकासाठी शुभेच्छा.
सर्व सहभागी सदस्य आणि निर्मीती चमूचे अभिनंदन.

{मीमच्या शिरपेचात अजुन एक}

11

मीमच्या शिरपेचात अजुन एक मानाच पीस हास्य
उपक्रम स्तुत्य आहे.
मीमची अशीच भरभराट होत राहो.

यादित चक्क माझे नाव पाहुन चकित झालो. धन्यवाद


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{एक सूचना अंक तयार करताना एक}

12

एक सूचना अंक तयार करताना एक लेख एखाद्या पानावर संपला तर दुसरा लेख नवीन पानावर सुरु करावा. छपाईचे बंधन नसल्याने ते सहज करता येईल. अंक छान. जरा उशीराच पाहीला.


-पुण्याचे पेशवे

{सुरेख. व्यवस्थापक तसेच}

13

सुरेख. व्यवस्थापक तसेच संपादकांचे अभिनंदन

{ई-अंक अतिशय उत्कृष्ठ झाला आहे.}

14

राजे, ई-अंक अतिशय उत्कृष्ठ झाला आहे. संपादक समितीचे आणि मालकाचेही हार्दिक अभिनंदन तसेच पुणेरी यांच्या सुचनांचाही विचार करावा.

-- श्रीवर्धन --


श्रीवर्धन

{मीमराठी सदस्यांचे हार्दिक}

15

मीमराठी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
अंकाच्या नविन कल्पनेबद्दल समितीचे आभार आणी अभिनंदन. हास्य

{अभिनंदन ! छान झाला आहे अंक मी}

16

अभिनंदन !
छान झाला आहे अंक मी पाठवला आहे अंक मित्रांना.

{सुरेख !!}

17

सुरेख !!

{अरे वा! फारच सुंदर अंक}

18

अरे वा! फारच सुंदर अंक आहे
कल्पनाही लै भारी!
आणि पहिल्या अंकात माझे नाव बसून खूपच बरे वाटले.. मनापासून अनेक आभार!!


-ऋ

{अरे वा..}

19

अभिनंदन!
अंक छान झाला आहे आणि कल्पनाही आवडली!
स्वाती

{मस्त मस्त}

20

मस्त मस्त मस्त................

{अरे वाह ! २०० डाऊनलोड ! एका}

21

अरे वाह !

२०० डाऊनलोड !
एका दिवसामध्ये !
धन्यवाद सर्वांचे !

पुढील अंक नक्कीच ह्यापेक्षा सरस असेल हास्य


Hope is a good thing...

{३०० + डाऊनलोड झाली अंकाची }

22

३०० + डाऊनलोड झाली अंकाची हास्य

अभिनंदन सर्वांचे व धन्यवाद.


Hope is a good thing...

{मस्त्..सुंदर्..झकास}

23

इ-अ

मीमचे अभिनंदन.. इ-अंक सुरेख आणि वाचनिय झालाय..
अंकातील सर्व सहभागींचे अभिनंदन..
कोकणसय,जन्मा येण्या..मस्तच

{अभिनंदन!}

24

कल्पना चांगलीच आहे. अंक पण तात्काळ डाऊनलोड केला. सजावट, वर्गिकरण वगैरे उत्कृष्ठ! मालक आणि संपादकांचे अभिनंदन!

पुणेरी आणि पुपे यांनी केलेल्या सुचनांशी सहमत. सहज आमलात आणता येतील अशा सुचना आहेत. अजून एक भर wink :- अनुक्रमणिकेत जर प्रत्येक लेखास दुवा देता आला तर चांगले होईल. हे देखील सहज करता येण्यासारखे आहे.


विकास देशपांडे

{बेष्ट}

25

बेष्ट आहे अंक

{नमस्कार, मी सलिल चौधरी.}

26

नमस्कार,

मी सलिल चौधरी. नेटभेट.कॉम ही मराठी वेबसाईट चालवतो. त्याचसोबत ebooks.netbhet.com ही मराठी ई-पुस्तकांची ई-लायब्ररी देखिल चालावतो. आपण प्रकाशित केलेला इंद्रधनुष्य हे नियतकालिक खुप आवडले. अंक अतिशय देखणा झाला आहे. आपण प्रकाशित केलेले हे नियतकालिक आणि इतर ई-पुस्तके नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररी मध्ये समाविष्ट करण्याची इच्छा आहे. यासंबंधी आपली परवानगी मागण्यासाठी हा कमेंटप्रपंच.

गुगलवर "Marathi ebooks" असे सर्च केल्यास पहिलाच रीझल्ट ebooks.netbhet.com चा येतो. येथे ई-पुस्तके प्रकाशित केल्यास येणार्‍या ट्रॅफिकचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

Memarathi.net ला अनेक शुभेच्छा !

धन्यवाद,

सलिल चौधरी

salil@netbhet.com

{हरकत नाही आहे, हा अंक}

27

हरकत नाही आहे, हा अंक लोकांच्या पर्यंत पोहचण्यासाठीच तयार केला आहे.

आपले मी मराठीवर स्वागत आहे !

आपलाच,

राजे
( व्यवस्थापक )


Hope is a good thing...

{सर्वांगसुंदर अतिशय}

28

सर्वांगसुंदर अतिशय अभिरूचिपूर्ण वाचनीय अंक ! हास्य


प्रभा.

{इंद्रधनुष्य - ई.अंक}

29

हा अंक दर महिन्याला काढला जातो. यातले लेख्/कथा मी मराठीवर आलेल्या लेखातून संपादक समिती निवडते कां? की यासाठी लिखाण स्वतंत्रपणे पाठवावे लागते? दर महिन्याला प्रसिद्ध होणा-या अंकाची तसेच त्यात प्रसिद्ध झालेल्या साहित्याची माहीती दर महिन्याला एक नविन धागा काढून दिली तर्.....सगळ्या सदस्यांना याची माहीती होईल.


दिप्ती जोशी

{टेक्निकल अडचणी मुळे अंक काढणे}

30

टेक्निकल अडचणी मुळे अंक काढणे बंद केले होते..
पण कोणी मदत करणार असेल तर अंक काढणे चालू करू शकतो आपण परत.


Hope is a good thing...

{नक्की काय तांत्रिक अडचणी आहेत}

31

नक्की काय तांत्रिक अडचणी आहेत ते कळेल काय?


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{पिडीफ मध्ये डिझाईन करणार कोणी}

32

पिडीफ मध्ये डिझाईन करणार कोणी नाही आहे Sad


Hope is a good thing...