

मेडीकलच्या परिक्षेतील गंमती-जमती
मी ३४ वर्षे मेडीकल कॉलेजात अध्यापन केले. माझा विषय "रोगप्रतिबंधक आणि सामाजिक औषधवैद्यकशास्त्र". इंग्रजीत Preventive & Social Medicine किंवा PSM. परिक्षेच्या निमित्ताने भारतभ्रमण झाले आणि एक लक्षात आले की या बाबतीत अवघा भारत एक. ट्यालंट सगळीकडेच जवळस सारखेच. गंमती जंमतीही सगळीकडेच होतात. परिक्षेत परिक्षार्थी टेंन्शन मधे असतात आणि त्यामुळे काय धमाल उडते ते पहाण्यासारखे.
सगळ्याच सगळ्यांना समजणार नाहीत, कारण त्यात वैद्यकिय शब्द येणार. पण वानगीदाखल काही नमूने देत आहे.
१. परिक्षकानं "अड्लेल्या प्रसूतीची (Obstructed Labour) कारणे काय?" असा प्रश्न विचारला. उत्तर देणारी मुलगी स्वत:ला खूप हुशार समजत असे. तिने खूप विचार केल्याचे नाटक केले आणि पहिले कारण सांगितले: " Enlarged prostate" (!!!!) (उद्गारचिन्हे माझी! प्रोस्टेट ग्रंथी या फक्त पुरुषातच असतात आणि त्यामुळे पुरुषांना म्हातारपणी urinary obstruction चा त्रास होवू शकतो हे सांगणे आवश्यक आहे. म्हणून या उत्तरावर परिक्षक चकित न होते तरच नवल.) परिक्षेत परिक्षार्थ्याने कितीही चुकीचे उत्तर दिले तरी ते तसे जाणवू द्यायचे नसते हे अनुभवी परिक्षक जाणतात. तसं ते जाणवू न देता परिक्षकांनी विचारलं " यस डॉक्टर, व्हॉट डीड यू से?" आपली चूक झाली हे त्या मुलीच्या लक्षात आले आणि आपली चूक सावरत असल्याच्या अविर्भावात ती म्हणाली: "सॉरी सर" . ती आपली चूक सुधारणार आणि बरोबर कारणे सांगणार या अपेक्षेने परिक्षक म्हणाले: "येस! गो अहेड" आपली चूक सुधारण्याच्या प्रयत्नात तिनं आणखी खोल खड्ड्यात उडी घेतली आणि म्हणाली: "सॉरी सर! मला एन्लार्ज्ड प्रोस्टेट ऑफ फीटस (पोटातलं बाळ) असं म्हणायचं होतं!" या उत्तरानंतर उडालेल्या हंशा मात्र छ्प्पर फाडके असाच होता!
२. जागतिक आरोग्यसंघटना (WHO) दरवर्षी महत्वाच्या आरोग्यसमस्यांकडे लक्ष्य वेधावे म्हणून एक घोषवाक्य देत असते. त्या-त्या वर्षी त्या-त्या घोषवाक्यावर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रश्न येणार हे अपेक्षीत्च असते. त्यानुसार त्या वर्षी लेखी परिक्षेत शॉर्ट नोट (टीपा लिहा) आली: "Smoking or health choice is yours". आता हे त्या वर्षीचे घोषवाक्य होते आणि त्यावर लिहिणे अपेक्षीत होते हे स्पष्टच दिसत होते.. मी त्यावर्षी पर्यपेक्षक होतो. परिक्षा संपली आणि जिन्यावरून उतरतांना दोघा विद्यार्थ्यांचा संवाद कानावर आला. पहिला: "ती शॉर्ट नोट खास होती नाही? Smoking or health वाली?" दुसरा: "कसं काय?’ पहिला: "यार, आपण तर health वरच लिहिलं फक्त." दुसरा: "अरे काय सांगतोस? कां रे बाबा?" पहिला: "अरे, प्रश्नातच नव्ह्तं कां म्ह्टलं? Smoking or health choice is yours ? मग. आपल्याला choice दिला होता Smoking वर लिहा किंवा health वर लिहा. मी health वर लिहिलं झालं, काय चुकलं माझं? " मी हंसून विचार केला, त्याचं चुकलेलं नव्हतं. चूक होती ती जागतिक आरोग्यसंघटनेची! असलं घोष्वाक्य देतात म्हणजे काय!
३. आमच्याच विषयाची तोंडी परिक्षा चालू होती. मी परिक्षेत मदतनीस म्हणून श्रवणभक्ती करत होतो. माझे गुरू डॉक्टर साठे, आणखी एक सर डॉक्टर मुजुमदार आणि दोन महिला परिक्षक. प्रश्नाचा विषय होता "ऑक्यूपेशनल हेल्थ" आपल्या व्यवसायात आपण ज्या भौतिक वातावरणात काम करतो त्याचा तसेच या व्यवसायामुळे जी जीवनशैली बनते तिचा आणि आरोग्याचा संबंधाचा अभ्यास असे हे एकुण प्रकरण. साठे सरांनी परिक्षार्थी मुलीला विचारलं " व्हॉट आर द ऑक्यूपेशनल हजार्डस ऑफ़ अ डॉक्टर" व्यवसायामुळे डॉक्टरला ज्या काही आरोग्यविषयक समस्यांना स्वत:ला सामोरं जावं लागतं त्याचा पाढा विद्यार्थी या प्रश्नानंतर मांडतात हा सर्वसाधारण अनुभव. पण ही मुलगी गप्पच! आपला प्रश्न कदाचित हिला कळला नसावा म्हणून मग सर म्हणाले: (ते म्हणाले ते इंग्रजीत, पण मराठी भावानुवाद असा:) "हे पहा मुली. मी डॉक्टर आहे. हे मुजुमदार डॉक्टर आहेत. ह्या आपल्या दोन्ही म्याडम, त्या पण डॉक्टर आहेत. उद्या तू ही डॉक्टर होशील. होणार ना?" तिनं मान डोलावली. "मग मला सांग बरं एक डॉक्टर म्हणून आपल्याला इतरांच्या तुलनेत कोणत्या रोगांचा धोका जास्त आहे?" आता त्या मुलीनं प्रश्न समजल्याचा अविर्भाव केला, डोळे मिटून घेत अंतिम सत्य सांगावं त्या अविर्भावात ती उत्तरली: "Sexually Transmitted Disesaese !!" (लैंगिक आजार!)
४ आमच्याच विषयाचा पेपर तपासतांना आलेला हा अनुभव. तेंव्हा तोंडी परिक्षेच्या आधी लेखी पेपर तपासले जात अणि ते पेपर समोर ठेवूनच विद्यार्थ्याची "हजेरी" घेतली जात असे. एका प्रश्नाच्या उत्तरात एक चिरंजीव लिहिते झाले: "This is a very good question. Examiners deserve congratulations for having asked this question!" त्याच्या या चापलूसीचा उलटाच परिणाम झाल्याचं तोंडी परिक्षेच्या वेळी त्याच्या लक्षात आलं.
५. आरोग्यसेवेत Multipurpose Worker" (MPW) नावाचा एक कर्मचारी वर्ग असतो. हिंवतापाचा/ रोगी शोधून त्याला उपचार करणे, क्षयाचे संशयित हुडकून त्यांना आरोग्यकेंद्रात पाठवणे, कुष्टरोगाचे संशयित हुडकणे, शालेय मुलांची आरोग्यतपासणी अशा बहुविध जवाबदा-या पार पाडत असल्याने त्यांना हे नाव आहे. त्यांच्यावर एकदा "MPW" अशी शॉर्ट् नोट आली असता एका मुलीने "MPW" म्हणजे
"Multipurpose Wife" असा अर्थ लावून "आदर्श गृहीणीची कौटुंबिक आरोग्यात भूमिका" असा निबंध सादर केला होता. तसंच "Septic tank" वर लिहितांना एकानं "हे पिण्याचे पाणी सांठवण्या साठी शहरी भागात वापरात असलेले आदर्शवत असे साधन असून ग्रामीण भागात त्याचा अत्यल्प वापर असल्याने तिथे पटकी, हगवण, कावीळ हे रोग थैमान घालीत आहेत " असं लिहून चिंता व्यक्त केली होती!
मस्तच
छान लिहले आहे, अजून लिहा असेच म्हणतो.
वा....छान..
विकी.....मनाचा राजा.
डॉक.. अवचटांखेरीज इतर कुणाचे काही या विषयावर वाचलेलं नाहिये.. लिहित रहा.. आवडताय..
लेख वाचुनंही , आणि लेखावरच्या प्रतिक्रीया वाचुनही
ह ह पु वा....
-पुण्याचे पेशवे
टारझनजी..
कोणत्या प्रतिक्रिया वाचून तुम्हाला ह ह पु वा झाली ते कळले तर आम्ही ही हंसून घ्यावे म्हणतो. आमच्या कडे जरा लोडशेडींग असते, त्यामुळे त्यूब उशीराच पेटते आमची !
आपला स्नेहांकित...
-अशोक
आहो तुम्ही जे विनोद सांगितलेत ... ते पब्लिकला झेपले नसावेत ... ते आपले सरळसोट बाकी लेखांना देतात तशा " अजुन लिहा ' वगैर कमेंट देत आहेत
आता तुम्ही विचारलंत म्हणुन सांगितलं 
आमचे मित्र डॉक्टर्स आहेत , त्यांच्याकडुन मी असले विनोद आधीपासुन ऐकत आलोय
डॉक. मस्तच. अजून लिहा असे नुसते म्हणत नाही. एक सूचना करतो (वाचकाच्या भूमिकेतून) - इथं पुस्तक बांधलं जातं. त्या दृष्टीने या विषयाची मांडणी करा. एक पुस्तक होईल मस्तपैकी.
तुमचे हे लेखन वाचून एका जुन्या अनुभवातील एक किस्सा आठवला.
एका सरकारी मेडिकल कॉलेजचा पीएसएम विभाग तेथील पत्रकार भवनाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर होता. त्यावरून त्या महाविद्यालयाच्या वार्षिकांकात टिप्पणी झाली होती. त्या विनोदी टिप्पणीत "आपल्या महाविद्यालयाचा पीएसएम विभाग पत्रकार भवनावर का आहे," असा प्रश्न होता. त्यावर उत्तर दिलं होतं, "सरकारला योग्य सुरवात करावयाची असते. पुढं वाटोळं झालं तरी हरकत नाही."
डॉक. मस्तच. अजून लिहा असे नुसते म्हणत नाही. एक सूचना करतो (वाचकाच्या भूमिकेतून) - इथं पुस्तक बांधलं जातं. त्या दृष्टीने या विषयाची मांडणी करा. एक पुस्तक होईल मस्तपैकी.
>> +१
डॉ. दाढेंच्या वडीलाचे पण असल्यास एका विषयावर पुस्तक आहे. त्यात डॉक्टर म्हणुन ग्रामीण भागात काम करताना आलेल्या अनुभवाचे वर्णन आहे,
मस्त लिहीले आहे. अजुन येउदे.
सगळेच किस्से भारी आहेत डाक्टर साहेब. खरं ज्यांना "Septic tank" म्हणजे काय माहीत नाहे असे पण शिकाउ डॉक्टर असतात या वर विश्वासच बसत नाही. ही मंडळी बविष्यात कशी उपचार करत अस्तिल कोण जाणे?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
शेवटचा अनुभव जास्त समजला आणी आवडला.
अबब! किती या प्रतिक्रिया!
अवलिया, पुणेरी, विकी, टर्झन, जय्पाल आणि म्मो : धन्यवाद!
राजे, अर्धवट, निर्मयी, श्रामो, नवीन पुणेरी आणि भाग्यश्री: आपलेही धन्यवाद. आप्ण मला आण्खी लिहाय्ची विनंती केलीत. पण इतरांचा काही विचार? त्यांची दुष्मनी घेतलीत की तुम्ही!
आपला स्नेहांकित...
-अशोक
आवडलं!
मस्त.