नमस्कार मित्रहो,
खालील पाककृती आहे एन्जेल (मराठी शब्द- संत??) चा केक, आणि अजून एक असतो तो सैतानाचा केक (डेव्हील्स फूड केक..)..
मी जेव्हा हे दोन्ही केक पाहीले तेव्हा मला वाटलं एन्जेल फूड केक पांढरा असतो म्हणून त्याला एन्जेल चा केक म्हणतात आणि डेव्हील्स फूड केक काळा (चॉकलेटचा) असतो म्हणून त्याला सैतानाचा केक म्हणतात पण खरं कारण असं आहे की एन्जेल फूड केक मध्ये कॅलरिज फार कमी असतात म्हणजे बटर/लोणी नसतं,तो फक्त अंड्याच्या पांढर्या बलकापासून बनतो आणि रंगालाही पांढरा असतो. सैतानाच्या केक मध्ये साहीत्य म्हणजे चॉकलेट्, बटर,मैदा म्हणजे भरपूर कॅलरिज....
तर आज संताचा केक पाहूया...

साहीत्यः
६ अंड्यांचा फक्त पांढरा बलक
३/४ कप पीठीसाखर
१/२ कप मैदा
२ चमचे वॅनिला अर्क
१/४ टीस्पू मीठ
२ टेस्पू लिंबाचा रस
१ टीस्पू लिंबाची किसलेली साल (ऐच्छीक)
ग्लेझिंगः
२ चमचे दही
२ चमचे मध
३ चमचे साखर
१ चमचा लिंबाचा रस
हे सगळं नीट घोटावे आणि थंड करून केकवर ओतावे.

कृती:
१) एका मोठ्या वाडग्यात अंड्याचा बलक घेऊन त्याला इलेक्ट्रिक रवीने किंवा व्हिस्कने पांढराशुभ्र फेस होइपर्यंत घुसळावे.
२) त्यात मीठ्,लिंबाचा रस, किसलेली साल आणि वॅनिला अर्क टाकून अजून २ मिनीटे घुसळावे.
३) आता पिठीसाखर घालून २-४ मिनीटे घुसळावे जेणेकरून स्टिफ पीक्स (मराठी शब्द??) तयार होतील.
४) ओव्हन ३५० डिग्री फॅ. ला प्रीहीट करून घ्या.
५) आता या मिश्रणात मैदा हळूहळून भुरभूरत चमच्याने हळूवार मिक्स करावा...
६) नॉनस्टीक पॅनमध्ये ३५-४० मिनीटे बेक करावा.
७) बेक झाल्यावर एखाद तास थंड होऊ द्यावा मग ग्लेझिंग टाकून सर्व्ह करावा.
टीपा: यात अंड्याचा बलक मैद्यापेक्षा जास्त प्रमाणात असल्याने काही लोकांना अंड्याचा वास येऊ शकतो, त्यासाठी वॅनिला अर्क जास्त टाकावा लागतो.
अंड्याचा बलक उगाचच जास्त घुसळू नये नाहीतर केक फुगत नाही.
फोटो लै भारी.... रेसिपी
फोटो लै भारी....

रेसिपी करायला कोण येणार माझ्याकडे ??
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
दिपाली केक एक्दम झकास, पाहूनच
दिपाली केक एक्दम झकास, पाहूनच तोंडाला पाणी सुटल
>>>रेसिपी करायला
खायला कोण येणार माझ्याकडे ??
मी येणार.
सोना गं, घरात शुद्ध
सोना गं,
( सासूला - आईला तेवढंच समाधान..मी शाकाहारी अस्ल्याचा त्यांचा समज कायम राहो )
घरात शुद्ध शाकाहारी वातावारण असल्याने अंडी आणायाला जमत नाही
दुसर्या कुणी केलेले मात्र मी खाऊ शकते
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
काकूंना एकदा भेटावे म्हणते
(विषय दिलेला नाही)
सहीच!!!
दिपालीताई, आम्हाला काय इतके
दिपालीताई, आम्हाला काय इतके करायला जमणार नाही. तुम्ही परत हा केक कधी करताय ते सांगा, आम्ही थेट तुमच्याकडेच धडकतो
अग्गग्गा ! फोटो पाहूनच खपलो !
अग्गग्गा !
फोटो पाहूनच खपलो !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सकाळीच रिकाम्या पोटी उगाच हा
फोटो न. १ मस्त आहे..
अवांतर : ह्यी दिपाली ...दिपाली पाटिल आहे का?
मस्त केक
कोणीतरी द्यावा आत्ताच्या आत्ता
मस्त
फोटो मस्तच आहे.
रेसिपी सुध्दा मस्त.
कोण करणार बरे? वाटल्यास मदतीला येईन खायच्या.
दिपाली तै एकदम फक्कड दिसतोय
दिपाली तै एकदम फक्कड दिसतोय केक.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+ १ गणपाचा रिप्लाय म्हणजे
+ १
गणपाचा रिप्लाय म्हणजे फायनल !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त..
केक मस्तच आहे, पण नाव वाचून संताबंता आठवले,
स्वाती