स्वरालयीची दुनिया..७
स्वरालयीची दुनिया..१
स्वरालयीची दुनिया..२
स्वरालयीची दुनिया..३
स्वरालयीची दुनिया..४
स्वरालयीची दुनिया..५
स्वरालयीची दुनिया..६
![]() |
'एकवार पंखावरुनी..' (येथे ऐका)
पुन्हा एकवार एक सुंदर यमन..!
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात..! किती सुंदर, चित्रदर्शी कल्पना आहे!
एक साधं, सुरेख गाणं.. भजनी ठेका, यमनातली चाल.. गदिमांचे शब्द, वसंत पवारांचं संगीत, बाबूजींचा स्वर...अजून काय पाहिजे?
वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात..
'वने माळरानी राई..' तल्या शुद्ध गंधाराबाबत, बाबूजींच्या आवाजातल्या गोडव्याबद्दल, स्वरातल्या भावाबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल काय बोलावं? 'ठायी ठायी केले स्नेही..' - म'धनिध पगपप संगती किती हळवी गेली आहे! सारे शब्द तोकडे पडतात..!
पंखावरून हात फिरणं, पाठीवरून हात फिरणं हाच खरा तर ओलावा..हेच खरं तर माणूसपण..!
असो.. इतकी साधी, परंतु तितकीच सुंदर गाणी कुठे गेली आता?
-- तात्या अभ्यंकर.
.jpg)

खरंय...
बाबूजींच्या आवाजातल्या गोडव्याबद्दल, स्वरातल्या भावाबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल काय बोलावं?
खरंय...
म'धनिध पगपप संगती किती हळवी गेली आहे! सारे शब्द तोकडे पडतात..!
हेही खरंच...
हे आणि हेच. असेच म्हणायचे आहे!!!
एक जपानी झेन कथा आठवली - तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि एक झेन साधू. साधूची कीर्ती ऐकून प्राध्यापक त्याच्याकडे चर्चेसाठी येतात. साधू तयार होतो. म्हणतो, "आपण आधी चहा घेऊ मग चर्चा करू." साधू चहाची तयारी करू लागतो. प्राध्यापक आपले गोडवे गाऊ लागतात. आपला अभ्यास, आपलं लेखन, आपल्या विषयांची व्याप्ती वगैरे... साधू कपबशीत चहा ओतू लागतो. तो ओतत जातो. कप भरतो, बशीत चहा उतरतो, बशी भरते, चहा आता सांडणार जमिनीवर ही स्थिती येते. प्राध्यापक म्हणतात, "अहो, काय करताय. चहा आता बशीतून सांडू लागेल." साधू म्हणतो, "हो. तेच सांगायचा प्रयत्न करतोय."
हे कधीतरी या मालिकेवर लिहायचं होतं. आज लिहितो.
घरात बाप जेऊ देई ना व गावात
घरात बाप जेऊ देई ना व गावात कुत्रं देखील विचारे ना अशी अवस्था !
तात्या.. मस्त सुरुवात केलीत
तात्या.. मस्त सुरुवात केलीत दिवसाची.. तुम्ही रॉयल्टी घेता का हो दिवस चांगला गेल्याची.
मस्त तात्या आपल्याला जे आवडतं
मस्त तात्या
आपल्याला जे आवडतं त्याबद्दल माणसाने भरभरुन बोलावं
ज्याला ऐकायचे असेल तो ऐकेल बाकीचे नाही ऐकणार..
कुणी ऐकत नसेल तर तो आहेच सर्वांच्या मनात असलेले ऐकणारा
काळजी नसावी.. लिहित रहावे.
+१
+१
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+२
+२
सकारात्मक प्रतिसाद व दाद
सकारात्मक प्रतिसाद व दाद देणार्या सर्व रसिकवरांचे आभार..
तात्या.
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.
तुम्ही प्रत्येक लेखाला
तुम्ही प्रत्येक लेखाला आर्जवून प्रतिसाद देता ह्याचे खरोखर कौतुक वाटते
धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बाबूजींच्या आवाजातल्या
बाबूजींच्या आवाजातल्या गोडव्याबद्दल, स्वरातल्या भावाबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल काय बोलावं? >>>
ह्या पलीकडे जर काही लिहायसारख आणी बोलायसारख रहात का ? असा एक प्रश्न पडला होता खरा !!
पण तात्या आमच्या आधीच्या फरमाईश तर आपण नेहमीप्रमाणे ...... ठिकाणी मारल्या ...तरीही आम्ही काही नवीन फरमाईश देत आहोत ....
१ ) कुठलही ह्रदयनाथांनी गायलेले गाण !!
२ ) अनिल - अरुण ह्या संगीतकार जोडगोळीच कुठलही गाण !!
३) अशोक पत्कींच कुठलही गाण !! (एक उनाड दिवस मधल " हुरहुर असते तिच उरी " असेल तर आपल्याकडुन एक शिवास रिगल
!!)
४) डॉ. सलील कुलकर्णींच काहीही,त्यात जर कुसुमाग्रजांचे गीत असेल तर ..अहाहा !!! ...(मग शिवास बरोबर चकणाही !
)
प्रतिसाद संपादित करुन लिहायची दोन कारणे
१ _ श्रींकात ठाकरेंनी संगीतमय केलेले कुठलेही गाणे ...
२ _ तात्या अभ्यंकरांच्या लेखी "मराठी " संगीतात काही दम नाही का ?? की स्वरालियाया गाण्याचा अंर्तभेद करणे जड जातय ????????????????????????????????????????????????????????????????????
+ १ सहमत आहे. थोडी मराठीगाणी
+ १
सहमत आहे.
थोडी मराठीगाणी पण येऊ देत तात्या.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+ १
सुहासशी बाडीस!
मराठी संगीताबद्दल पण लिहिलेलं आवडेल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)