प्रेरणा: रिकामा वेळ
डिस्क्लेमरः यातुन कोणत्याही सदस्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न नाही. केवळ मनोरंजन म्हणुन हा उद्योग. 
साहीत्य : -
१ बलदंड आणी धिप्पाड शरीरयष्टी
१-२ तुमच्या वाहनाला मागुन धडकलेली घाबरट माणसं
२-४ किलो राग
चवीपुरत्या शिव्या
४/५ हिरव्या/तांबड्या/काळ्या कोणत्याही माजाची पेस्ट
१ मोठा कडक तळहात
कृती :-
१) प्रथम तुम्हाला धडक देणार्या व्यक्तीकडे वळुन खुन्नस देउन पहावे
२) त्यानंतर गाडीवरुन उतरावे.
३) नंतर एका व्यक्तीची कॉलर धरुन त्याला काठी हलवल्यासारखे हलवावे
४) नंतर त्याच्या बरोबरच्या व्यक्तीला शिव्या देउन त्याची व्यवस्थित खरड्पट्टी काढवी
५) नंतर दोघांना तुटलेली मागची हेडलाईट व्यवस्थित दाखवावी.
६) त्यांची जिरेपर्यंत हिरव्या/तांबड्या माजाची पेस्ट थोड्याशा रागावर गरम करून दोघांकडे एक कडकडीत नजर टाकावी.
७) नंतर सर्कशीला येतात एवढे लोकं गोळा करावेत.
८) त्यानंतर तळहाताला सळसळ लावून चापटी देण्याच्या आवेशात आणावा.
९) नंतर ह्या चापट्या होल्डवर ठेवुन १५/२० मि. पुन्हा चांगली खरडपट्टी काढावी.
१०) चापट्या मारताना चुकु नये म्हणून एका हाताने त्याची कॉलर घट्ट धरुन ठेवावी.
११) मग ह्या गरमा गरम सणसणीत चापट्या समोरचा लालबुंद होईपर्यंत द्याव्यात.
उम्म्म्म्म्म...........
माझ्यातर हाताला आत्ताच सळसळ सुटलीय.
चु.भु.दे.घे.
आपला,
मराठमोळा
(विषय दिलेला नाही)
तांबडा माज
चुचे स्वतः बद्दल बोलतेयस का ग
चुचे स्वतः बद्दल बोलतेयस का ग
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
चुचे स्वतः बद्दल बोलतेयस का ग
चुचे स्वतः बद्दल बोलतेयस का ग
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
(विषय दिलेला नाही)
आगायायाया /... बाजार उठला
मेलो खपलो चचलो वारलो
अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे लय भारी
अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे लय भारी
मीच तो
हा हा हा. मस्तं रे ममो.
हा हा हा.
मस्तं रे ममो. यावरून आठवलं. आमचा एक अंमळ खुजा(६ फूट ३ इंच) आणि हलकासा(१०२ कि.ग्रा) मित्र आहे. एकदा नळस्टॉपच्या सिग्नलवर एका इंडीकावाल्याला सिग्नल तोडून पुढे जायचे होते. त्याच्या पुढे अॅक्टिवा नावाच्या अशक्त गाडीवर पुढे तो आणि मागे मी असे होतो. इंडीकावाला जोरात हॉर्न मारत होता. आम्ही हललो नाही. इंडीकावाल्याने गाडी हळू हळू पुढे आणून हळूच धक्का दिला गाडीला. हा हिरो झटकन उतरला. बाजूची एक फरशी उचलून इंडिकाच्या काचेवर आपटली. परत एकदा बॉनेटवर आपटली. बॉनेटला मस्तपैकी पोचा आला. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. आम्ही गाडी काढून पसार.
-पुण्याचे पेशवे
कट्टा
>डिस्क्लेमरः यातुन कोणत्याही सदस्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न नाही.
नुकताच कट्टा झाला की काय?
ठ्ठो
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>ममो अलिकडे काय खाताय अलिकडे
>>ममो अलिकडे काय खाताय
अलिकडे थापट्या आणी पलिकडे गणपाच्या बनविलेल्या डिशेस
नाही हो ररा, रिकामा वेळ असला की असं सुचतं बाकी काय नाय बगा.
ममो
ममो
राक्या पेटलाय !!!
राक्या पेटलाय !!!
काय हो
काय हो? काय झालंय अलीकडे? पलीकडेही काही झालं असेल तर सांगा. भेटूया एकदा निवांत.
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
ममो.तुमचे पाय कुठेयत???
ममो.तुमचे पाय कुठेयत??? चरणतीर्थ घेईन म्हणते.
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
धमाल पाकृ
धमाल पाकृ
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही