भारतीय तत्वज्ञान - भाग ३

0
0

मागचा भाग

मागील भागात आपण शब्द आणि अर्थ यांची सांगड का हवी ते पाहिले. कुठलेही शास्त्र वा तत्वज्ञान समजुन घेतांना त्यात वापरल्या जाणा-या संज्ञा, परिभाषा आधी समजुन घेणे गरजेचे असते. ते न समजता अभ्यास केल्यास पदरी निराशा येवु शकते अथवा हे तत्वज्ञान नसुन केवळ शब्दप्रभुत्व दाखवण्यासाठी केलेली पोकळ बडबड आहे असा ग्रह होवु शकतो. त्यामुळेच अशा संज्ञा समजुन घेणे तसेच काळाच्या ओघात किंवा वेगवेगळ्या पंडीतांनी समान संज्ञा वापरल्या असल्या तरी त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ हे भिन्न असु शकतात हे लक्षात ठेवुन, ज्या मताचा आपण आकलन करुन घेण्याचा प्रयत्न करुन घेत आहोत, त्या मताला अभिप्रेत असलेलाच अर्थ घेतला जात आहे की नाही हे पहाणे आवश्यक असते.

या भागात आपण काही अशाच संज्ञा, आणि त्यांचे अभिप्रेत असलेले अर्थ यांचा विचार करु.

ज्ञानेंद्रिये - डोळे, कान, त्वचा, जीभ, नाक (५)

कर्मेंद्रिये - वाणी, हात, पाय, जननेंद्रिये, गुद (५)

शम - मनावरील संयम

दम - इंद्रियांचा संयम

तितिक्षा - आयुष्यातील परस्पर विरोधी घटना सहन करण्याची क्षमता

मुमुक्षुत्व - मोक्ष मिळावा अशी तळमळ किंवा इच्छा होणे

जागृतावस्था - ज्या अवस्थेत ज्ञानेंद्रियांचे कार्य घडुन शब्द, स्पर्श इत्यादि विषयामचे ज्ञान होते

स्वप्नावस्था - झोपेमधे जागृत असतांना पाहिलेल्या गोष्टी, स्मृती आणि कल्पना यामधुन स्वप्न जगत निर्माण होते

सुषुप्तावस्था - ह्या अवस्थेबद्दल ठामपणे सांगता येत नाही. फक्त अशा अवस्थेतुन बाहेर आल्यावर मनुष्य गाढ झोप लागली होती येवढंच सांगु शकतो. बाकी काही सांगता येत नाही.

सत् - जे तिन्ही काळात अबाधित असते. बदलत नाही.

चित् - अनुभवाच्या सर्व अवस्थांमधे स्थित असलेले जाणीव तत्व

आनंद - स्वतःमधे आत्मनिर्भरतेचा येणारा अनुभव.

ब्रह्म - बृहृ म्हणजे वाढणे या धातुपासुन हा शब्द बनला असुन या शब्दाने मोठे, विशालत्व, अमर्यादित्व निर्देशित केले जाते.

मन - अनिश्चितता किंवा संशय म्हणजे मन

बुद्धि - निर्णय किंवा निर्णय शक्ती म्हणजे बुद्धि

अहंकार - 'मी आहे' अशी जाणीव

चित्त - स्मरण ठेवण्याची शक्ती

अंतःकरण - मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त यांचे मिळुन अंतःकरण (अंतर्गत साधन) बनते. विचार करतांना मन, बुद्धि आणि चित्त एकमेकांची जागा घेतात, एकमेकांना पुरक ठरतात, अहंकार हा सदैव मी पणाची जाणीव अशा स्वरुपात असतो. मी संशयी असतो, मी निर्णय घेतो, मी लक्षात ठेवतो.

क्रमशः

लेख वाचून आनंद मिळाला

1

लेख वाचून आनंद मिळाला हास्य

कॉलेजात तत्त्वज्ञान विषय खूप आवडीने निवडला होता. पण मास्तर शिकवताना " हा स्कोअरिंग सब्जेक्ट आहे " एवढंच शिकवायचे. मग पुढे तत्त्वज्ञानाच्याच उपशाखेत मानसशास्त्रात शिरले.
तुमच्या लेखातून भारतीय तत्त्वज्ञानाबरोबर भारतीय मानसशास्त्राचेही संदर्भ मिळत आहेत.
धन्यवाद ! हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

खूप आवडला लेख.

2

खूप आवडला लेख.

छान लेखन करतो आहेस

3

छान लेखन करतो आहेस नाना...

उत्तम विषय व तेवढीच उत्तम मांडणी !

आवडला लेख !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त

4

खरच उत्तम मांडणी...!
सूंदर लिहलायस लेख.
आवडला.
हास्य

अप्रतिम लेखन

5

अप्रतिम लेखन

छान माहिती......

6

थोडी अ‍ॅडिशन....

मन म्हणजे संकल्प विकल्प. विचार आला की करु की नको ही अवस्था म्हणजे मन.
बुद्धी- काय करायचे हे ठरवणारी. त्या त्या व्यक्तिच्या वासनांनुसार(बर्‍याचदा)निर्णय होतो. इथेच शम दमाचे कार्य सुरु होते.(मनात निषिद्ध विचार आला तो झिडकारला-शम.कृती करावीशी वाटते पण करायचे नाही-दम)
चित्त- झालेला निर्णय साठवून ठेवण्याचे काम.

शम, दमाबरोबरच उपरम,श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान आले की त्याला शमादिषट्क म्हणतात.
या बरोबरच विवेक, वैराग्य आणि वर सांगितलेले मुमुक्षत्व ह्या मो़क्षासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत.

@नाना :डॉ.श्री.द.देशमुख यांच्या साधकसोपान नावाच्या पुस्तकात अत्यंत सुंदर पद्धतीने हे सर्व विवेचन आहे.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

हम्म. डोक्यावरचा विषय.. पण

7

हम्म. डोक्यावरचा विषय.. पण वाचतो आहे. पाहू डोक्यात काही शिरले तर.


-पुण्याचे पेशवे

+ १

8

हम्म. डोक्यावरचा विषय.. पण वाचतो आहे. पाहू डोक्यात काही शिरले तर.

तंतोतंत असेच म्हणतो.

ए नाना, आता सा. कॅ. बंद

9

ए नाना, आता सा. कॅ. बंद व्हायची वेळ आली.. उद्या सवडीने वाचतो रे..

तात्या.


वाचतोय.

10

भाषा सोपी असल्यामुळे आणिक आवडतंय. हास्य
एक दोन शंका -
मुमुक्षु - मोक्षाची ईच्छा असणारा कि मोक्षाशिवाय दुसरी कसलीही ईच्छा नसणारा?
चित्त - साठवून ठेवण्याची शक्ती कि निरनिराळे संस्कार साठून त्याच्या अनुषंगाने बनणारा आंतरिक स्वभाव?
आनंद - स्वतःमधे आत्मनिर्भरतेचा येणारा अनुभव; यात अहंकार येत असेल तर तो शाश्वत आनंद असेल? मला वाटते आनंदाची सुरुवात शरणागतीमधे असावी.

(कच्चं मडकं असलेला) राघव

सहमत, असेच काही प्रश्न मलापण

11

सहमत, असेच काही प्रश्न मलापण पडत आहेत पण मी पुढील भागाची वाट पाहतो आहे व एकत्रच सर्व प्रश्न विचारीन म्हणतो आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."