जूनीच कथा ...... पण नविन ढंगात

0
0

कावळा आणि चिमणी

कावळा आणि चिमणी
रहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी
कावळ्याचं घर होतं शेणाचे
चिमणीचं घर होतं मेणाचे
एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरुन गेला
कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून
"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिल्लू आहे छोटं वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला
कावळा बिचारा गेला निघून
पावसाच्या पाण्यात राहिला भिजून
चिमणी मात्र होती
तिच्या पिल्लात व्यस्त
पिलासवे तिचा
दिवस जाई मस्त
दिवसामागे दिवस गेले
चिमणीचे पिल्लू मोठे झाले
पिलाला उडायची
हौस होती भारी
उंच आकाशात
त्याने मारली भरारी
मोकळ्या आकाशी ते गेले उडून
चिमणीच्या घरट्यात नाही आले परतून
चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशाची पाठवण
चिमणी झाली होती खूप म्हातरी
म्हातारपणाने पडली आजारी
"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐनवेळी मदतीला
कावळाच धावून आला
पिलू होते दूर
त्याने केला फोन
औषधांसाठी म्हणे
पाठवतो पैसे दोन
चिमणी म्हणे पिलाला, पैसे नको..
माझी थोडीही काळजी करु नको
कावळ्याने चिमणीची केली खूप सेवा
खायला तिच्यासाठी आणला त्याने मेवा
कावळ्याच्या मदतीने
चिमणी झाली बरी
त्याची तिने मागीतली
माफी खरी खरी
कावळा म्हणाला विचार नको करु फार
घरासोबत जोडावेत मित्रही चार!
कावळा अन् चिमणी आता
झाले मित्र पक्के
एकमेकांच्या मदतीने
काढले आयुष्य आख्खे !

क्या बात है !

1

मस्त ! छान !!
आवडली.. हास्य


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

सुरेख

2

सोप्याराव एकदम दणक्याक आगमन.

चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशाची पाठवण

अगदी कालसुसंगत...

कावळा म्हणाला विचार नको करु फार
घरासोबत जोडावेत मित्रही चार!

खरं आहे हो. अगदी स्वानुभव.

नातेवाइ़कपण मनमोकळे वागत

3

हास्य नातेवाइ़कपण मनमोकळे वागत नाहित एवढे मित्र्-मैत्रिणी वागतात.
ऑनलाइन मैत्री पण छान असते.. आपंण ओफ्लाइन मित्रांशी काही गोष्टी डिस्कस केल्या तरी त्याना इन्तर्‍एस्त असेलच असे नाही. ऑनलाइन मैत्रीत मनातले काहीही बोलता येते व प्र्श्न सुटतात आजचेच उदाहरण म्हणजे सहजचे उपयुक्त धागे....

+ १ सहमत आहे चुचुशी.

4

+ १

सहमत आहे चुचुशी.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कावळा चिमणी ची आधुनिक कहाणी.

5

कावळा चिमणी ची आधुनिक कहाणी. आवडली.

भारी....................आवडली

6

भारी....................आवडली १दम....................

(विषय दिलेला नाही)

7

हास्य

(कावळा) अवलिया

8

हास्य

(कावळा) अवलिया

छान!

9

छान! हास्य

छान

10

मस्त आहे.
हास्य

मस्तच !

11

मस्तच !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

काउ चिउ ची गोष्ट आवडली

12

काउ चिउ ची गोष्ट आवडली हास्य

भारी

13

और भी आने दो!

एकदम मस्त...

14

छान... हास्य