पुर्वेतिहास :
दि. २१.०८.२००९ . श्रावण कालच संपलेला....विकांताचा बेत असा ठरलेला की राजेंच्या राजधानीस भेट द्यावी. थोडक्यात ठरलेला बेत असा....भाड्याने रथ (पक्षी चारचाकी) घेउन सकाळ सकाळ (पहाटेचे ५.३०) राजेंच्या राजधानी साठी कूच करायचे. राजेंचे दर्शन घेउन संध्याकाळी घरी परत.
पुर्वेतिहास समाप्त
दि. २२.०८.२००९
पहाटेचे ५.३०
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी घोरत...
पहाटेचे ६.३०
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी घोरत...
पहाटेचे ८.३० (आमची पहाटच हो..)
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी शुचिर्भूत स्नान करून रथाच झोल न झाल्याने घोड्यांवरून रपेटीस तयार.
हे आमचे तयार घोडे (पक्षी दुचाकी)

अशा या घोड्यांवर स्वार होउन आम्ही अगेकूच चालू केली राजेंच्या राजधानी कडे..... आहो दिल्ली नाही काही आमचं जायचं ठिकाण होतं.................................... किल्ले रायगड ...(गेल्यावर्षीच्या एका भटकंतीचे वर्णन्/फोटो.)
सकाळचे १०.००
स्थळ : श्री दत्त गुरू स्नॅक्स, पनवेल
येथे न्याहारी उरकुन रायगडी प्रस्थान केले. येथे पवसाने आमची साथ द्यायला सुरुवात केली जी घरी परत येइ पर्यन्त सोडली नाही.
सकाळचे १०.३०
रस्त्यातून दिसणारा कर्नाळा

दुपारचे १२.३०
पायथ्याहून दिसणारा रायगड....पूर्ण धुक्यात बुडालेला.. डाव्या कोपर्यामधे टकमक टोक..

दुपारचे १३.००
घोरण्यात २ तास घालवल्याने गडावर रोप वे ने जाय्चे ठरवले... हाच तो ढगात गायब होणारा रोप वे..

दुपारचे १३.०५
लगेचच गडावर पोहोचलो..त्याचीच काही क्षणचित्रे.
महाराजंचा राजवाडा

नगारखाना आणी धुके

नगारखाना आणी त्यावर तळपणारा सूर्य (दरवाज्यातून दिसणारी मेघडंबरी)

II राजेII
शिवरायांचे आठवावे रूप !!
शिवरायांचा आठवावा प्रताप!!

होळीच्या माळाजवळील एक झाड

जगदिश्वराच्या मदिराचा कळस

महाराजंच्या समाधी जवळील एक शिलालेख

शिलालेख क्र. २

धुक्यात बुडालेला सह्याद्री

सूर्यदर्शन

निवेदन : रायगडाविशयी सर्वांना माहिती असल्याने जास्त महिती दिली नहिये. शिलालेखांचे अर्थ कोणाला माहित असल्यास क्रुपया प्रकाश टाकावा.माझ्या माहिती प्रमाणे ते मोडी लिपीत आहेत.
* लेखन इतरत्र पुर्वप्रकाशीत.
फोटूज आर रिडिक्युलसली
फोटूज आर रिडिक्युलसली झंट्याम्याटिक
बाकी प्रभ्या ... त्या १००सीसी बाईक वर काही दया ? रायगड चढवला लेका त्यांना ? आगायाया !!
हॅहॅहॅ..बाबांसाठी घेतली
हॅहॅहॅ..बाबांसाठी घेतली होती.....वापरायला तयार नव्हते...मी घेतली मग दामटून सहा महिने...
सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर
शिलालेख क्रमांक २ ची एक कथा आहे. अनेकांना ती आधीच माहित असेल.
हिरोजी इंदुलकर हा रायगडाचा आर्कीटेक्ट. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. गड पाहिल्यावर राजे बेहद्द खुश झाले आणि त्यांनी हिरोजीला सांगितले की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तू तुझे नाव लिही. (जुनी भारतीय परंपरा शक्यतो नाव न लिहिण्याची आहे). हिरोजी आपले नाव गडाच्या प्रवेशद्वारावरही लिहू शकला असता, मोठ्या अक्षरातही लिहू शकला असता. पण त्याने जागा निवडली ती गडावरील मंदिराच्या पायरीची. हेतू का की राजे जेव्हा जेव्हा देवळात दर्शनासाठी येतील, त्यांना आपले नाव दिसावे, ते ही पायरीसारख्या विनम्र ठिकाणी. हा शिलालेख खालील प्रमाणे आहे "सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर"
(लिपी मोडी वाटत नाही, देवनागरीच दिसते आहे)
शिलालेखातील मजकूर आणि त्याची जागा हिरोजी बद्दल बरेच काही सांगते. शिवाजी महाराजांसारखा नेता होता म्हणून अशी माणसे घडली आणि अशी माणसे होती म्हणून स्वराज्य घडले.
चू.भू.द्या.घ्या.
विश्वनाथ मेहेंदळे
>>शिवाजी महाराजांसारखा नेता
>>शिवाजी महाराजांसारखा नेता होता म्हणून अशी माणसे घडली आणि अशी माणसे होती म्हणून स्वराज्य घडले.
खरे आहे.
फोटॉज अप्रतिम........
शिवाजी महाराजांसारखा नेता
शिवाजी महाराजांसारखा नेता होता म्हणून अशी माणसे घडली आणि अशी माणसे होती म्हणून स्वराज्य घडले.
+१११११११११११११११११११
१०० % सहमत.
बाकी फोटॉ अप्रतिम .............. धुक्यात हरवलेला रोप वे खासकरुन आवडला.
अफाट सुंदर फोटो रे.....
अफाट सुंदर फोटो रे..... !
ग्रेट !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तच फोटो आणि हिरोजींची
मस्तच फोटो आणि हिरोजींची कथाही हॄद्य आहे!
झकास
मस्त हो देवा. अशा दाट धुक्यात वा पावसाळी ढगात गडावर जाणे एक मस्त अनुभव असतो (फक्त विजा चमकू लागल्या तर लै टरकते आपली. आता माणूस आता कोळसा अशी गत व्हायची.) अशा हवेत मस्त भट्टी पेटवून दोन तीन कप चा हाणायचा आणि त्या जाळात मक्याची कणसं टाकून आपण सृष्टीचा लुत्फ घेत निवांत पथारी पसरायची. खालची हिरवीगार दरी पाहून एकदोनदा उडी मारण्याची उर्मी दाटून आलेली. ओ हो, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच हो देवा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्त
मस्त फोटो.
रायगडाला जेव्हा जाग येते
अक्षरशः रायगड समोर उभा केलास रे प्रतिक
धन्यु वेरी मच
धुक्यांतला रोपवे अतिसुंदर
महाराजांनीदेखील कधी कल्पना केली नसेन की अतिदुर्गम असणार्या त्यांच्या रायगडावर कधीकाळी असे रोप-वे ने सहजपणे येऊ शकतील
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
फोटो केवळ अप्रतिम..........
फोटो केवळ अप्रतिम..........
फोटो
आवडले
क्या बात है!
झकास फोटू!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सर्व वाचक प्रतिसादकांना
सर्व वाचक प्रतिसादकांना धन्यवाद.!!!
सही
फोटो व मेहेंदळे साहेबांचा प्रतिसाद मस्तच!
रायगडाचे फोटो मस्तच. (मागील
रायगडाचे फोटो मस्तच. (मागील प्रतिसादात ही दाद द्यायची राहूनच गेली
) परत एकदा जावेसे वाटले. या आधी गेलो होतो तेव्हा पहाटे ४ वाजता चढाई सुरु केली होती. टोर्च च्या प्रकाशात आम्ही जवळपास १५०-२०० जण होतो. मी आणि माझा मित्र बरेच पुढे होतो. मागे वळून पाहिले तर १५० दिव्यांची रांग आमच्या मागून येताना दिसली होती. रायगडावरून सूर्योदय पहिला तो क्षण तर मस्तच. ते सगळे पुन्हा आठवले. पण तुमच्या फोटोतील रायगड माझ्या आठवणीपेक्षा सुंदर आहे. आम्ही बोंबलायला पाऊस पडायच्या आधी गेलो होतो. हिरवळ अजिबात नव्हती. हा खूप छान दिसतो आहे.
धन्यवाद मेहेंदळे
धन्यवाद मेहेंदळे साहेब.
आतापर्यंत झालेल्या पाच रायगड ट्रीपांत प्रत्येक वेळेस रायगड वेगळा भासत आलाय मला.....
वरील सर्व प्रतिसादाम्शी सहमत
वरील सर्व प्रतिसादाम्शी सहमत आहे! फटू पुन्हा पाहून छान वाटलं.
मस्त
मस्त
मस्त
मस्त
अरे त्या गण्याचासुद्धा फोटो
अरे त्या गण्याचासुद्धा फोटो होता ना रे तुझ्याकडे? तो पण टाकायचा की.. गण्या साला वर्ल्ड फेमस है!
केवळ अप्रतिम ! अर्थात
केवळ अप्रतिम !
अर्थात रायगडाशी संबंधीत कुठलीच गोष्ट कनिष्ठ दर्जाची असुच शकत नाही
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
अप्रतिम !
अप्रतिम !
अप्रतिम
अप्रतिम छायाचित्रे............!
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !