थापट्या

0
0

साहीत्य : -

१/२ कप तांदळाचे पीठ
१/२ कप पाणी
२ चमचे साजूक तूप
चवीपुरते मीठ
४/५ हिरव्या मिरचीची पेस्ट
१ टे.स्पू. जीरे

कृती :-
१) प्रथम पाणी उकळ्ण्यासाठी ठेवावे
२) त्यात नंतर तूप घालावे
३) नंतर त्यात ह्ळू ह्ळू तांदळाचे पीठ घालावे व सतत ढवळत रहावे
४) नंतर त्यात मीठ घालून त्याची व्यवस्थित उकड काढवी
५) नंतर उकड परातीत घेवून व्यवस्थित मळून घ्यावी
६) जिरे व हिरव्या मिरचीची पेस्ट थोड्याशा तूपावर गरम करून उकडीत टाकावे
७) नंतर उकडीचे पुरी एवढे गोळे करावेत
८) त्यानंतर हाताला तूप लावून हे गोळे पुरी एवढ्याच आकाराच्या थापट्या थापून घ्याव्यात
९) नंतर ह्या थापट्या कूकरमध्ये ठेवव्यात व १५/२० मि. ची चांगली वाफ काढावी.
१०) थापट्या कूकरमध्ये चिकटू नये म्हणून चाळणी ठेवून त्याला थोडे तूप लावावे.
११) मग ह्या गरमा गरम थापट्या खायला द्याव्यात.

उम्म्म्म्म्म...........
माझ्यातर तोंडाला आत्ताच पाणी सुटलय.

खमंग वाटतीये रेसिपी पण

1

खमंग वाटतीये रेसिपी

पण सोप्याराव, तुमि फोटोशिवाय नुसती रेसिपी टाकली !
पब्लिक हाणतंय आता तुम्हाला Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

हेच म्हणतो...फोटो नसल्याने

2

हेच म्हणतो...फोटो नसल्याने पाकृ गच्चीवर वाळायला टाकली आहे...

सॉरी माहीतच नव्हत मला

3

ghyaa ya thapaTyaa


मीच तो Cool

ये हुई ना बात!!!!

4

ये हुई ना बात!!!!

हांगाशी आता कसं १६ आने ब्येस

5

हांगाशी आता कसं १६ आने ब्येस झालं.
थापट्या मस्तचं रे भौ.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

कोथिंबीर राहिली

6

फोटोवरुन आठवले कोथिंबीर राहिली..........


मीच तो Cool

आता घाला की वरनं!

7

आता घाला की वरनं! wink

पुप्स आइला विचारा जरा कि

8

पुप्स आइला विचारा जरा कि ह्याला निवगिर्या म्हण तात का?

+ १ बहुतेक असेच काहीसे

9

+ १ Big smile
बहुतेक असेच काहीसे म्ह्ण्तात ग
उद्कडीचे मोदक कर्ताना उकड उरली तर सासुबाई त्यात मिरची कोठिंबीर घालुन कर्तात अस

राइट्...

10

राइट्...

ज्ञानात भर पाड्ल्याबद्द्ल धन्यवाद

11

ज्ञानात भर पाड्ल्याबद्द्ल धन्यवाद


मीच तो Cool

मस्त दिसताहेत थापटया. करून

12

मस्त दिसताहेत थापटया. करून बघायला पाहिजेत.

वाह! नविनच प्रकार माहित

13

वाह! नविनच प्रकार माहित झाला.
फोटोच्या साइझवरुन तर वाटतय की त्या थापटीवर आडवं पडुन मस्त साईडने एकेक तुकडा तोडत खाता येईल. wink

कुणी आहे का रे आयतं करुन द्यायला?

अच्र्त

14

Laughing out loud अच्र्त

अगदी रे

15

फोटोच्या साइझवरुन तर वाटतय की त्या थापटीवर आडवं पडुन मस्त साईडने एकेक तुकडा तोडत खाता येईल.
मलाही अगदी असंच वाटलं होतं. म्हटलं चला चार दिवसाची जेवणाची काळजी मिटली. फक्त प्रश्न एवढाच आहे की एवढ्या मोठ्या थापटया मावतील असा कुकर कुठून आणू?

याला आमच्याकडे निवग्र्या

16

याला आमच्याकडे निवग्र्या म्हणतात. गणपतीच्या पहील्या दिवशी उकडीचे मोदक करून झाले की उरलेल्या उकडीच्या निवग्र्या मस्तं लागतात.


-पुण्याचे पेशवे

पुप्स देअर यु आर...

17

पुप्स देअर यु आर... Big smile

लय भारी.........नक्की करून

18

लय भारी.........नक्की करून पाहिन.
खायला कोण कोण येणार??

छान

19

छान हास्य