तिखटी (फोटोसकट)

0
0

तिखटी हा कोकणात केला जाणारा तोंडीलावण्याचा प्रकार आहे...मोस्टली मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर खाल्ला जातो...

साहित्य :
१ वाटी दही
२-३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
मीठ

साहित्य

दही

कृती :
१.आधी मिरच्या भाजून घ्याव्यात आणि ठेचून घ्याव्यात.
२.दही घुसळून घ्यावे.
३.लसूण सोलून ठेचून घ्यावी.
४.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
५.आता दह्यात ठेचलेली लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालावी.
६.चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले मिक्स करुन घ्यावे.
तय्यार आहे एक चटकदार तोंडीलावणे....हास्य

तिखटी

गरमागरम खिचडी आणि तिखटी

फोटो कुठाय.? निदान बघुन तरी

1

फोटो कुठाय.?

निदान बघुन तरी समाधान करुन घेइन म्हणतो..

फाऊल फाऊल फाऊल! फोटोशिवाय

2

फाऊल फाऊल फाऊल! फोटोशिवाय पाकृ म्हणजे फाऊल!

काय वो अस्मीबै पहिलाच स्ट्राईक मारला तो पण फाऊल? Big smile

फोटो टाकल्यावर प्रतिसाद दिला जाईल. हास्य

पुढच्या वेळी फोटो नक्की

3

Sad

पुढच्या वेळी फोटो नक्की टाकेन... हास्य

फोटो टाकला आहे

4

फोटो टाकले आहेत हास्य

शॉल्लीट! फाऊल कॅन्सल!

5

शॉल्लीट! फाऊल कॅन्सल! फुलमार्क्स! मस्त!
पहिला 'बर्डस आय व्ह्यू' वाला फोटो लैच आवडला! wink

मस्त तिखट असावी पाकृ....

6

मस्त तिखट असावी पाकृ....

छान चटपटी दिसतेय पाकृ. करते

7

छान चटपटी दिसतेय पाकृ. thinking

करते नक्की..


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

छान आहे ! फोटोचे तेवढे जमवा.

8

छान आहे !
फोटोचे तेवढे जमवा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान

9

छान

जबरा ! लै भारी फोटो !

10

जबरा !

लै भारी फोटो !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यु

11

धन्यु हास्य

लै भारी फोटो ही चटणी ब्रेड

12

लै भारी फोटो
ही चटणी ब्रेड सोबतपण छान लागेल असं वाटतंय.. आता खाऊन सांगते Big smile


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

अस्मि अग एव्ढी लसुण खाल्ली तर

13

घाबरगुंडी अस्मि अग एव्ढी लसुण खाल्ली तर उश्णता वाढेल ना

चुचे त्यात थोडा गुलकंद मिसळून

14

चुचे त्यात थोडा गुलकंद मिसळून खा मग Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

:)

15

Laughing out loud

मस्तं. आमच्याकडे तिखटी करतात

16

मस्तं. आमच्याकडे तिखटी करतात तेव्हा त्यात फक्त हिंग आणि मीठ घालून मिरची हातानेच कुस्करतो आणि मग वरून दही घालतो. ही पण पाकृ मस्तं दिसते आहे.


-पुण्याचे पेशवे

मस्त!!

17

मस्त!!

सहीच आहे ग.

18

सहीच आहे ग.

एकदम भारी !!!!!!!! आणि फोटो

19

एकदम भारी !!!!!!!! आणि फोटो पन मस्तच!!!!!!!