मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट
काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक अपत्य याकरता की एका अपत्याचा खर्च निघाला की दोन मुले म्हणजे साधारण ८०% ते १००% तेवढा वाढीव धरता येईल )
सोयी करता आपण या महीन्याच्या खर्चात घरभाडे अथवा घरकर्जाचा हप्ता धरायला नको कारण ज्याचे त्याचे घराचे बजेट. कोणी ५० हजार रुपये होम लोन मासीक हप्ता देत असेल (यांना मुळातच मध्यमवर्गीय म्हणावे का? हा चर्चेचा वेगळा मुद्दा असो.) कोणी १०,००० रु.
बरं शहरात रहाणार्या एका सामान्य कुटुंबाचा खर्च तो नेमका काय असेल याचा अंदाज लावूया. एक यादी देत आहे त्यात काही कमी आहे का सांगा. मी यादीत ज्या गोष्टी लिहीत आहे त्या शक्यतो गरजेच्या व बेताची चैन म्हणता येतील अश्याच आहेत. अर्थात आपल्या मतांचा, सुचनेचा आदर आहेच.
हेतू असा की त्या निमित्ताने
१) आजचा ते म्हणतात ना की आटे-डाल का भाव कळेल.
२) खर्च पाहून सिंगल् इंजीन की डबल इंजीन चैन की गरज अंदाज येईल.
३) पैशाच्या मागे सुसाट पळणार्या मध्यमवर्गियांना एक गोल मिळेल की साधारण कितपत कमावले तर करीयर मधे फार तडजोड करायची गरज नाही किंवा आधी गरज असेल पण मग एकजण कुटुंब संस्था मोडकळीस न येता जीर्णोद्धार करायच्या कर्तव्याकडे वळू शकेल.
त्यामुळे घरात मध्यमवर्गीय घरात महीन्याचा
किराणा व भाजीपाला = महीन्याला किती लागतील तीन जणांच्या कुटुंबाला
दुध = दिवसाला एक लिटर धरले तर महीना ३० लिटर चितळे / कात्रज दुधाची पिशवी??
गॅस सिलिंडर= महीन्याला एक सिलिंडर
वीज बील = १ किंवा २ बी एच के फ्लॅट (ट्युबलाईट्, फ्रीज, टिव्ही, गीझर, पंखा)
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स =
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार =
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) =
वर्तमानपत्र=
केबल टिव्ही =
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) =
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील =
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =
इस्त्री, लॉन्ड्री =
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) = प्रकाशकाका यांच्याकडे चौकशी केली तर हे मोफत देखील होउ शकेल
हाटेलात खाणे पिणे =
ग्रंथालय फी =
सोसायटीची वर्गणी =
काही खर्च अगदी महीन्याचे महीन्याला होत नसले (उदा. सहा महीन्यातुन एकदा कपडे खरेदी) तरी एक महीना सरासरी रक्कम काढता येईल त्यात
कपडेलत्ते खर्च =
एक वार्षीक सहल =
अजुन एक खर्च म्हणजे दुनियादारी. म्हणजे बघा कितीही माणुसघाणे म्हणले तरी किमान काही लोक ओळखीचे असतात त्यामुळे कधी बर्थे डे पार्टी, कधी लग्न इ कार्यक्रम, ऑफीसमधे काही कार्यक्रम असला तर त्याचे कॉंट्रीब्युशन इ. कधी आपल्याकडे कोणी रहायला आले तर त्यांचा पाहुणचार इ.
याला काय व्हेरीयस ऑव्हरहेडस का जे नाव द्याल ते =
जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री, मे महीन्यात असे दर महीन्यात रिपिट न होणारे पण दर महीन्याला यातले कशा न कशावर खर्च होणारे.
जनरल अदर =
अजुन काय आठवत असेल तर सांगा, तसेच प्रत्येक गोष्टीतल्या खर्चाकरता साधारण किती रक्कम एका तुमच्या कल्पनेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबाने खर्च करावी हे लिहा.
शक्यतो कोणाला अर्धपोटी ठेवू नका. मुलाला अति महागड्या किंवा मनपाच्या शाळेत पाठवू नका.
चला सगळे मिळून काय बजेट होते पाहूया!
आणी हो, चुचु ला धागा समर्पीत.
.jpg)
{मी तर अजुन ब्यॅचलर आहे ब्वॉ.}
मी तर अजुन ब्यॅचलर आहे ब्वॉ. फक्त प्यार्टीचे बजेट बघतो.
असो,
माझ्या मते प्रत्येक कुटुंबाच्या गरजा आणी चैनी वेगवेगळ्या आहेत. मध्यमवर्गीयाची कोणतीही संज्ञा उपलब्ध नाही, सतत बदलत असते.
तरी अॅनॅलेसीस करिता २-३ महिने रोजचा खर्च लिहुन ठेवुन त्याचे वर्गीकरण करावे. मग त्यात वार्षिक खर्च अधिक करुन एक ढोबळ आकडा काढावा.
मग आपला पगार, इन्फ्लेशन, भविष्यातील गरजा याचे मोजमाप करावे. एक्सेल शीट फार उपयोगाची प्रणाली आहे.
अजुन एक सुत्रः
उत्पन्न - खर्च = बचत हे सुत्र न ठेवता
उत्पन्न - बचत = खर्च हे सुत्र जमवता येते का पहावे. (दिसायला सोपे असले तरी फारच ईफेक्टीव आहे.)
{बरोबर}
ममो तुमचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. फार छान मुद्दा मांडलात, पगार हातात पडायच्या अगोदर ऑटोमेटीक त्यातुन पैसे बचत म्हणुन गुंतवले तर हातात पडतील तेवढ्यात भागवावे लागेल.
आणि हो ममो आज ना उद्या संसारात पडालच त्याकरता हा धागा तुम्हाला उपयुक्त आहेच. त्यामुळे तुम्ही वर दिलेल्या गोष्टी घेउन तुमच्या मते एक रक्कम लिहाच.
{+१ --> उत्पन्न - बचत = खर्च }
+१ --> उत्पन्न - बचत = खर्च
मला माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षित भविष्यासाठी निव्वळ उत्पन्नापैकी २५% रक्कम बाजूला काढली पाहिजे. उरलेले ७५% कसेही खर्च करा. निव्वळ उत्पन्न म्हणजे (पगार + आधीच्या गुंतवणूकीवरील व्याज - सरकारी कर)
मला आत्तापर्यंत हा कानमंत्र चांगला उपयोगी पडला आहे.
प्रत्येकाने स्वतःची एक ठराविक टक्केवारी ठरवून घ्यावी आणि तेवढी बचत करण्याचा नेहमीच प्रयत्न करावा.
{चांगला धागा आहे. सध्याच्या}
चांगला धागा आहे.
सध्याच्या आटे दाल का भाव कळेल आणि घरातल बेजेट कस असाव नसाव याबद्दल टिप्स मिळतील या उद्देशाने या धाग्यावर नजर ठेवुन आहे.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{ओ मालक}
नुस्ती नजर नको. जरा विचार करा (पक्षी विचारा) व आकडेमोड करा.
लोकहो हा तुमचा खर्च नका समजु हा एक अंदाज आहे तीन जणांच्या शहरी कुटुंबासाठी. वर दिलेल्या गोष्टिंकरता साधारण तुमच्या मते किती लागतील हे लिहा. बर्याच होतकरु तरुण तरुणींना हा धागा उपयुक्त ठरेल.
{अरे हो वरच्या खर्चात}
मी ब्रॉडबँड कनेक्शन लिहले नाही आहे. पण महीना २०० रु मधे मिळत असेल ना बी एस एन एल?
{>>मी ब्रॉडबँड कनेक्शन लिहले}
>>मी ब्रॉडबँड कनेक्शन लिहले नाही आहे. पण महीना २०० रु मधे मिळत असेल ना बी एस एन एल?
मला सगळे इन्टरनेट कनेक्स्न्स १४५० ला पडतात.
{अवघड विषय}
तस पाहिल तर लग्न झालेल्या लोकांना व्यवस्थित मत मांडता येईल.
लोकहो हा तुमचा खर्च नका समजु हा एक अंदाज आहे
पण अंदाज बांधायला प्रत्येकाच्या खर्चाचा अनुभव उपयोगी पडेल अस वाटतं
{असेच नाही}
>तस पाहिल तर लग्न झालेल्या लोकांना व्यवस्थित मत मांडता येईल.
असेच नाही पण बघा तुम्ही सिंगल का मॅरीड मला माहीत नाही पण तुम्ही जर दुचाकीवरुन येजा करत असाल तर तुमचा महीन्याचा पेट्रोल, किंवा एखादी व्यक्ती रोज समजा अंधेरी ते बोरीवली ये जा करत असेल तर रेल्वेचा पास किती, एका लिटर दुधाची पिशवी या खर्चा अंदाज तर लिहू शकाल.
जे लिहत येणार नाही ते नका लिहू पण जे लिहता येते आहे ते तरी लिहा.
{मध्यमवर्गीय घरात महीन्याचा खर्च}
प्रत्येक गोष्टीची अंदाजे किंमत लिहीत आहे
किराणा व भाजीपाला = १०००/-
दुध = ९००/-
गॅस सिलिंडर= ३३५/-
वीज बील = ६५०/-
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स = ३५०/- + ????
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार = ५००/-
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) = १४००/-
वर्तमानपत्र= ११०/-
केबल टिव्ही = ५००/-
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) = ४५०/-
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील = माहीत नाहि
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी = २२००/-
इस्त्री, लॉन्ड्री = ५००/-
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) + हाटेलात खाणे पिणे = २०००/-
ग्रंथालय फी = नाही
सोसायटीची वर्गणी = २००/-
कपडेलत्ते खर्च = ६००/-
एक वार्षीक सहल = १५००/-
दुनियादारी = १२००/-
व्हेरीयस ऑव्हरहेडस = ४००/-
जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री = ५००/-
जनरल अदर = २% वरच्या सगळ्यावर
एकूण = १५६००/-
माझ्या अंदाजे एवढा खर्च येतो.
मीच तो
{धन्यवाद}
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फक्त एक शंका खरच १०००/- रु मधे महिन्याचे किराणा व भाजीपाला येतो?
म्हणजे बघा ४ किलो कणीक, ३ किलो तांदूळ, किमान २ किलो साखर, २ लिटर तेल, अर्धा किलो शेंगादाणे, डाळ, कडधान्य, ब्रेड-बिस्कीट, खाउ, पोहे, रवा, मसाले, सरबत, लोणची, तोंडी लावणी इ शिवाय रोजच्या भाज्या. रविवारी पॅटीस?
{>>खरच १०००/- रु मधे महिन्याचे}
>>खरच १०००/- रु मधे महिन्याचे किराणा व भाजीपाला येतो?
अगदी! मला पण असेच वाटले.
{हो}
पण इतक्यावर प्रतिसाद थांबवू नका हो! प्लीज त्या तीन सदस्यांच्या कुटुंबाकरता एक मॉडेल बजेट बनवा ना.
प्लीज.
{तुमचा धागा असताना तुम्ही का}
तुमचा धागा असताना तुम्ही का नाही बनवलेय ते सांगा आधी
{हे काय}
लिहतो ना. सगळे भाव मला माहीत नाही आहेत.
असे तू तू मै मै नाही करायचे. प्लीज लिहा ना.
{प्लीज... लिहिले नंतर प्रयत्न}
प्लीज... लिहिले
नंतर प्रयत्न करते.
{असेच म्हणतो. माझ्यामते किमान}
असेच म्हणतो. माझ्यामते किमान रु. ४०००/- धरावे.
{महागाई}
गॅसचा दर वाढलाय
३५६ रुपये.
{अंदाज}
अंदाजात सर्वच गोष्टी अंदाजे घेतल्या त्यामूळे जरा घोटाळा झाला वाटत.
मीच तो
{:-)}
बघा सांगा किती घ्यावेत किराणा भाजीपाला = ५०००/- पाच हजार?
{आम्ही जेव्हा धान्य खरेदी केली}
आम्ही जेव्हा धान्य खरेदी केली तेव्हाचे भाव सांगतो. (एप्रिल)
१. तांदूळ ३०-३५ रु/कि
२. डाळ (तूर) ७२ रु/कि
३. गहू २२ रु/कि
सध्याचे काही भाज्यांचे भाव
)
१. कोथिंबीर ८ रु गड्डी
२. पालक ८ रु गड्डी
३. मेथी १५ रु गड्डी (हल्ली शेपू, लालमाठ, पाल्यासकट मूळा दिसला नाही बरेच दिवसात
४. मिरची १० रु/पाव
-पुण्याचे पेशवे
{धन्यु}
पुपे धन्यु. पण एकंदर महीना किराणा-भाजीपाला तीन सदस्यांच्या कुटूंबाकरता किती धरावेत? ५०००/-?
शिवाय बाकीचे कोष्टक भरा ना प्लीज!
{सहज आज माझे जिवन सार्थकी}
असाच काहिसा धागा मला हवा होता
धन्यवाद...
{यु आर वेलकम}
पण नुस्ता वाचू नकोस. सिरीयस आहेस हे सिद्ध करायला वर सोप्या यांनी बनवले तसे एक अंदाजपत्रक बनव.
{हे बजेट नाही }
सध्याचा भारतातला आटे दाल का भाव माहीत नाही.
हे बजेट नाही. (आकडे पुर्ण पणे काल्पनीक आहेत)
पण मी माझा रोजचा खर्च खालील प्रमाणे एका एक्सेल शीट मध्ये मांडतो.
त्यामुळे किती खर्च होतो त्यावर नियंत्रण रहाते.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{खर्च}
किराणा व भाजीपाला = १००० भाजीपाल्यासाठी अन् ३००० किराणा
गॅस सिलिंडर= ३५६ रु
वीज बील = ७०० रु
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स = ३५० रु पाणीपट्टी टॅक्स माहीत नाही.
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार = ५०० ते ६००
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) = १३०० रु
वर्तमानपत्र= १०० रु
केबल टिव्ही = ४०० रु
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) = ५०० ते ६०० रु
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील = हप्ता ज्याची जितक्या पैशाची पॉलिसी असेल तितका १००० रु अन् वैद्यकीय बिल ८०० रु
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी = २५०० रु
इस्त्री, लॉन्ड्री = ४०० रु
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) + हाटेलात खाणे पिणे = १५०० रु
ग्रंथालय फी = नाही
सोसायटीची वर्गणी = २००/-
कपडेलत्ते खर्च = ८०० रु
एक वार्षीक सहल = २५०० ते ३००० रु
दुनियादारी = १००० रु
व्हेरीयस ऑव्हरहेडस = ४००/-
जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री = ७०० रु
एकूण = २०७०० रू
हा फक्त अंदाजे खर्च आहे. अंदाजे.
{धन्यवाद}
स्नेहाराणी धन्यवाद!
{आई गं ! एवढा खर्च ? माझा}
आई गं !
एवढा खर्च ?
माझा महिन्याचा खर्च तर फक्त ९००० येतो ( ४ माणसं)
{ओह}
>माझा महिन्याचा खर्च तर फक्त ९००० येतो ( ४ माणसं)
ओह म्हणजे दर माणशी ९००० गुणीले ४ माणसं = महीना ३६०००/- रु म्हणायचे का?
आणी खरच चार जणांचे कुटूंबाचा खर्च तुम्ही ९०००/- रु मधे तुम्ही बसवू शकत असाल तर कृपया वर दिलेला खर्च पहता काही सल्ले द्या, जेणे करुन हा खर्च कमी करायला इतरांना मार्गदर्शन होईल. ही विनंती करतो.
{छ्या आपल्याला खर्चाचं काय}
छ्या आपल्याला खर्चाचं काय माहित नाही ब्वॉ..
आपण सगळा पगार बायकोला देतो दर महिन्याला.. चहापाण्यासाठी घेतो कधि कधि मागतो लागतील तसे..
{व्वाव}
आपण कोणत्या ग्रहावर राहता? (ह. घ्या) आपण तिकडे शिफ्ट व्हायला एका पायावर तयार आहे. लगेच नोकरी सोडून देईन.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{:-)}
जरा डोके लावायचा प्रयत्न करतो, पटतय का बघा? कमीत कमी खर्चात बसवण्याकरता
१) न्यायला यायला कंपनीची फुकट बस, अन्य वेळी सायकल इ. (प्रवास खर्च एकदम कमी)
२) मुलांना चांगल्या व सरकारी अनुदानीत शाळेत प्रवेश - फी कमी, चालायच्या अंतरावर शाळा मुलांना ने आण करायला रिक्षा, बस नाही.
३) केबल टिव्ही कमी केला
४) वडीलोपार्जीत घर, बंगला असल्यास दरमहा सोसायटी खर्च नाही. किंवा एका बंगल्यात भाडेकरु तर तो महीना सोसायटी फी महानगरपालीका टेक्स इ खर्च वाचला
५) घरकामास नोकर/मोलकरीण नसणे
६) मोबाईल नसणे
७) साधी रहाणी (बाहेर न खाणे, कपडे लत्ते इ. बाबींवर कमीत कमी खर्च)
ररा वरच्या समजा २० हजार खर्चातुन किती कमी करावे म्हणता?
{अंदाज}
१)आम्हाला उपयोग नाही (आमचा वाहनखर्च सुमारे ७५० रू), २ आम्हाला गैरलागू (यातच सौच्या तिच्या नातेवाईंकाच्या वाढदिवसाची/रुसवा काढण्याची गिफ्ट अॅड करू शकता) अनुभवाअभावी एस्टिमेट देऊ शकत नाही,तुम्ही द्या.
३ नि ५ ने एकूण ९०० वाचतात. (खरेतर केबल पेक्षा पिक्चर पाहणे वजा करा जास्त पैसे वाचतील. महिन्याला ४ जणांनी एक सिनेमा पाह्यचा खर्च कमीतकमी ६०० रू, अधिक थेटरात जे चाउ माउ खाणे होते त्याचा खर्च.) आमच्या बापूजींनी बंगला न बांधल्याने (
, विचारतोच खडसावून का नाही बांधला म्हणून
) घर बांधले पण आता खर्च सोसायटी+कार्पूरेशन (सरासरी महिना ८०० रू) अर्थात आमचे घर साध्यासुध्या सोसायटीत आहे, क्लब हाउस ची हौस करणार्या सोसायटीत नाही. मोबाईल चे बिल ५०० धरा(महिलांसाठी ७५०
)
सगळे मिळून ५हजार सुद्धा कमी करू शकत नाही.
तरीही गाडं १५ हजारच्या खाली जाणं मुश्कील आहे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{धन्यु ररा}
म्हणुन आता खरच ९०००/- रु मधे मधे महीना ४ जणांचे कुटूंब मासीक खर्च कसा बसवते याबद्दल सल्ला ऐकायला उत्सुक आहे.
{>>आपण कोणत्या ग्रहावर राहता?}
>>आपण कोणत्या ग्रहावर राहता? (ह. घ्या) आपण तिकडे शिफ्ट व्हायला एका पायावर तयार आहे. लगेच नोकरी सोडून देईन.
+१२
{ब्युटीसलुनचा खर्च नाहि का}
{सामान्य माणुस खरोखरीच पिचलाय हो}
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{नवर्याने अॅपलचा फोन}
{-.५}
असे नाही साधारण एक फोन किती महीने वापरला जातो त्य हिशोबाने महीन्याच्या गॅजेट्स बील मधुन वळते कर. अगदीच काही फार कोलमडले नसणार. हो किनै?
{३१ मर्च २००९ ला सोनी}
३१ मर्च २००९ ला सोनी एक्स्पेरिया घेतला होता त्याने..
{मग}
विकून टाक तो. ट्रेड्-इन नाही केला का?
माझ्या मते स्पेशल अॅपल चा मन्थली प्लॅन घेतला की आयफोन फुकट आहे ना? काही स्पेशल कुपन्स इ नाही मिलाली का तुमच्या टेल्को कंपनी कडून.
{जुना फोन मी वापरणार आहे.}
{मग तुमच्या जुन्या फोन चे काय}
मग तुमच्या जुन्या फोन चे काय ? तो अगदीच जुना असेल तर वसूल झाला असे म्हणता येईल. तसे नसेल तर मग ही गरज धरायची की चैन ?
हा प्रश्न वैयक्तिक नसून प्रातिनिधिक समाजाला जावा, ही विनंती
लोभ असावा.
वि. मे
{घरचं माहीत नाही पण मुंबईत}
घरचं माहीत नाही पण मुंबईत नोकरीनिमित्त रहायचो तेंव्हाचा हा माझा ताळेबंद. (फक्त माझ्या एकट्याचा..एकूण चार जण रहायचो आम्ही)
घरभाडं - २५०० रू. (प्रत्येकाचे स्वतःचे घर असण्याची शक्यता कमी आहे..हा एक पॉईंट राहिला तुमच्या गणितात सहजराव.... )
लाईट बील - ३०० रू.
किराणा व भाजीपाला (चहा, नाश्ता, क्यांटीन सगट) : ३५०० रू
पेट्रोल - ५०० रू
गॅस (पाईप्ड) - ५० रू
वर्तमानपत्र + केबल - १०० रू
मोबाईल - ३५० रू
इंशूरंस हफ्ता - ४५०० रू
इस्त्री - ३०० रू
व्हेरीयस ऑव्हरहेडस +जनरल अदर +हाटेलात खाणे पिणे +सहल + कपडे - २००० रू
-----------------------------
टोटल - १४१००
{धन्यु प्रभो}
सोयी करता आपण या महीन्याच्या खर्चात घरभाडे अथवा घरकर्जाचा हप्ता धरायला नको कारण ज्याचे त्याचे घराचे बजेट. कोणी ५० हजार रुपये होम लोन मासीक हप्ता देत असेल (यांना मुळातच मध्यमवर्गीय म्हणावे का? हा चर्चेचा वेगळा मुद्दा असो.) कोणी १०,००० रु.
{ओक्के...तो मुद्दा निसटला}
ओक्के...तो मुद्दा निसटला माझ्या वाचनात...
{एक खर्च राहिला. नेट... ५५०}
एक खर्च राहिला. नेट...
५५० रू..
टोटल : १४१०० + ५५० = १४६५०
{हम्म!}
चांगला धागा!
बरीच नवीन माहिती मिळते आहे...
१०. मराठमोळा हा ब्याचलर मावळा आहे.

९. ब्रॉडबॅन्ड कनेक्शन कितीला मिळतं याची सहजला काहीही *ट कल्पना नाहिये.
८. लग्न झालेल्या लोकांना स्वतःचं मत नीट मांडता येतं असा स्नेहाराणीचा समज आहे.
७. सहजला दर रविवारी पॅटिस खायला आवडतील (जर बायकोने खाऊ दिले तर!!!)
६. फक्त चुचुच एकटी प्रामाणिकपणे आपण ब्यूटी पारलरवर खर्च करते असे सांगते.
५. नवर्याला काहीही झालं तरी अॅपल फोन घेऊ देऊ नका.
४. गणपा खानसाम्याला भारतातला डाल-आटेका भाव माहिती नाही. (तेंव्हा गृहिणींनो, सावधान!! बजेट तुम्हाला जमवायचंय!!!)
३. प्रभो कधी काळी मुंबईत नोकरीही करायचा, म्हणे.
२. त्याचे तिथे अजून तीन रूममेटस होते (पुरूष की स्त्रिया याबदल माहिती उपलब्ध नाही!!)
अणि,
१. स्वतः काहीही माहिती न देता नुसते अभिप्राय देण्यात निर्मयीची बरोबरी कोणीही करू शकत नाही!!!!
(शेवटी पुतणी कोणाची!!!)
{_/\_}
खी: खी: खी:, ब्येष्ट!
(बाकी ह्या धाग्यालाही 'अंदाज' अपना अपना असं नावं चालून जावं
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{हा हा हा}
अजुन येउ द्या!!
{०. एवढं सगळं बोलूनही}
०. एवढं सगळं बोलूनही पिडाकाकांचा प्रतिसाद अवांतरच आहे.
{आजोबांचा विजय असो}
आजोबांचा विजय असो
Hope is a good thing...
{काका, थ्यांक्यू}
काका, थ्यांक्यू
{ख्यॅक ख्यॅक}
काकानुं, पोरासोराक का छळताव?
यावरून आम्हालाही एक गोष्ट समजली. घरचे बजेट वगैरे गोष्टींबद्दल पिडां चिंता करीत नाहीत. ती पिडांकाकूंची जबाबदारी असावी. (कदाचित काकांच्या खिशातले पैसे काकूंच्या मुठीत असतील म्हणून.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{पिंडा काका की जय हो}
पिंडा काका की जय हो
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{सहज मध्यम्वर्गिय नसला तरी}
सहज मध्यम्वर्गिय नसला तरी आम्हा मध्यम्वर्गियांचा विचार करतो यातच त्याच्या मनाचा मोठेपणा दिसुन येतो. मला काय गरज म्हणुन त्याने माझ्या धाग्याचा विचार न करता काहीही असंब्ध रिप्लाय दिलाय असे मला कधिच आढळुन आले नाही. नाना तुझ्याकडुन हेच अपेक्शित आहे.
{हा हा हा.... सहज}
हा हा हा....

सहज हुच्चभ्रू असूनही आमच्यासारख्या निम्न मध्यमवर्गीयांचा विचार करतात.
-पुण्याचे पेशवे
{धागा वर आला... चला सान्गा}
{पैसे कसे वाचवायचे?}
खर्चायचेच नाहीत आमच्या ररांसारखे!