पाषाणभेद यांनी मंगळ, 29/06/2010 - 10:21 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखात आलेले आहे. हे वडलोपार्जीत चालत आलेले आहे - वंशावळ सांभाळणार्यांच्या अन वंश वाढवणार्यांच्याही!
हे लोक रेफरंस ने फिरतात. म्हणजे माझ्या काकांकडे ते आधी आल्यास ते सगळ्या भावांचा पत्ता घेतात. मग त्या गावी गेल्यानंतर त्यांच्याकडे. तेथून दुसरीकडे. खेडेगावात बरेच नातेवाईक जवळजवळ राहतात. मग हे सोईचे होते. शहरात कोण कोठे राहतो हे कोणाला माहीत अन वेळ कोठे आहे?
निर्मयी यांनी मंगळ, 29/06/2010 - 10:36 ह्यावेळी प्रकाशित केले.
ते वाचले मी, माझी (कु)शंका अशी की लोक इतक्या सहजपणे माहिती देतात का? म्हणजे आजकाल कोणीही येऊ शकते, माहिती काढून फसवतील वगैरे असे वाटत नाही का कोणाला? (कदाचित माझ्या शहरी मनोवृत्तीचा दोष असावा)
जयपाल यांनी मंगळ, 29/06/2010 - 10:44 ह्यावेळी प्रकाशित केले.
जमाती होत्या त्यांना "हेळवी" म्हणत असत. हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय असे. हा एक प्रकारचा डेटाबेस आहे ज्याचा उपयोग मुख्यतः लग्नकार्य करताना मुलाचा / मुलीचा (वंश) इतिहास पहाणे हा असायचा. तेंव्हा पैसे घेत नसत तर ४/५ माप जोंधळे देऊन आजोबा हा इतिहास तपासत.
मितान यांनी मंगळ, 29/06/2010 - 11:35 ह्यावेळी प्रकाशित केले.
अशाच वंशावळी तीर्थक्षेत्रावरच्या भटांकडे असतात. मयतकार्यासाठी ! १०वा ११वा दिवस करायला लोक गावात आले की त्यांच्या वंशाचे उत्तरकर्म करणारे ब्राह्मण कोण हे तिथलेच लोक सांगतात. अगदी ७ पिढ्यांची नावे या लोकांकडे असतात.
मी हे प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. या दरिद्री ब्राह्मणांचे यावर पोट असते. त्यांना ' यजमानासाठी ' आपसात भांडताना पण पाहिलंय....!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
पुण्याचे पेशवे यांनी मंगळ, 29/06/2010 - 12:39 ह्यावेळी प्रकाशित केले.
वंशावळीवरून आठवले. पूर्वी कोकणात आणि इतरत्रही अनेक लोकांनी आपापल्या कुलदेवतांची मंदिरे बांधली. विषेशतः कर्हाडे ब्राम्हण आणि सारस्वत यांच्यात हा प्रकार मोठ्याप्रमाणात पहायला मिळतो. म्हणून कोकणात आर्यादुर्गा, शांतादुर्गा, रवळनाथ यांची असंख्य मंदिरे पहायला मिळतात. त्यात फार पूर्वी जेव्हा गोव्यातल्या पोर्तुगिजांच्या छळामुळे तिथून अनेक लोक गावं सोडून कारवार, करवीर (कोल्हापूर),तळकोकण अशा ठिकाणी पांगले. मग त्यांनी तिथे येऊन आपापल्या कुलदेवतांची मंदिरे बांधली. जे लोक तिथेच गोव्यात राहीले त्यांनी मूळ गावांमधून देवस्थाने हलवून ती आडगावी नेऊन ठेवली. ही वेगवेगळी मंदीरे ज्या लोकांनी मिळून बांधली त्यांना त्या मंदिरांचे महाजन म्हणतात. त्यांच्या कुळातील लोकांना मंदिरात गेल्यावर वंशावळीतून त्यांची आडनावे, मूळ गावे यावरून ते महाजन आहेत का नाही हे तपासून मगच तिथे पूजा करण्याचा वगैरे अधिकार असतो.जर त्या देवळात महाजनकी नसेल तर त्या भक्ताला प्रसाद वगैरे देऊन त्यांची महाजनकी कुठे आहे याची ढोबळ मानाने माहीती दिली जाते. मग त्या देवळात जाऊन तपासायचे. तिथले अनेक गुरुजी तर इतके तयार आहेत की नुसते गाव व आडनाव सांगितले की सांगतात "तुमची महाजनकी इथे नाही अमुक अमुक गावी आहे. दर्शन घ्या आणि प्रसाद घ्यायला जा." तिथे पूजा, अभिषेक याच्या पैशाच्या लोभाने कोणाला उगाच तुमची महाजनकी इथे आहे असे सांगून लुटल्याचे पाहीलेले नाही.
पुण्याचे पेशवे यांनी मंगळ, 29/06/2010 - 13:11 ह्यावेळी प्रकाशित केले.
कर्हाड्यांमधे पण आहे.
आमची कुलदेवता महालक्ष्मी, कोल्हापूर असल्याने वाचलो. नाहीतर आर्यादुर्गा - शांतादुर्गा कुलदेवता असलेले फिरत असतात महाजनकी शोधत. अर्थात काहींना त्रास होतो काहींना मजा येते. माझा एक मित्र वेलिंगच्या शांतादुर्गेला गेला. तिथे कळले की ती त्यांच्या महाजनकीतली नाही. मग अजून २-३ गावे फिरल्यावर मिळाली. मजा आली सांगत होता. गेली २-३ वर्षे तो गोव्याला गेला की त्या सगळ्या शांतादुर्गांना दर्शनाला जाऊन येतो.
मला पण एकदा रवळनाथाची महाजनकी शोधत फिरायचे आहेत. तेवढेच गोव्यात फिरणे होईल.
{उत्तम, प्रथमच मी वंशावळ}
उत्तम, प्रथमच मी वंशावळ लिहलेली पाहतो आहे...
छान रे.
हा एक समाज उपयोगी कार्य करणारा वर्ग आजकाल नाहिसा झालेला आहे.
Hope is a good thing...
{छान}
छान
{वंशावळ जमा कशी करतात हे लोक?}
वंशावळ जमा कशी करतात हे लोक? ही माहिती कशी मिळवतात?
{लेखात आलेले आहे. हे}
लेखात आलेले आहे. हे वडलोपार्जीत चालत आलेले आहे - वंशावळ सांभाळणार्यांच्या अन वंश वाढवणार्यांच्याही!
हे लोक रेफरंस ने फिरतात. म्हणजे माझ्या काकांकडे ते आधी आल्यास ते सगळ्या भावांचा पत्ता घेतात. मग त्या गावी गेल्यानंतर त्यांच्याकडे. तेथून दुसरीकडे. खेडेगावात बरेच नातेवाईक जवळजवळ राहतात. मग हे सोईचे होते. शहरात कोण कोठे राहतो हे कोणाला माहीत अन वेळ कोठे आहे?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{ते वाचले मी, माझी (कु)शंका}
ते वाचले मी, माझी (कु)शंका अशी की लोक इतक्या सहजपणे माहिती देतात का? म्हणजे आजकाल कोणीही येऊ शकते, माहिती काढून फसवतील वगैरे असे वाटत नाही का कोणाला? (कदाचित माझ्या शहरी मनोवृत्तीचा दोष असावा)
{माझ्या गावी देखिल अशा}
जमाती होत्या त्यांना "हेळवी" म्हणत असत. हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय असे. हा एक प्रकारचा डेटाबेस आहे ज्याचा उपयोग मुख्यतः लग्नकार्य करताना मुलाचा / मुलीचा (वंश) इतिहास पहाणे हा असायचा. तेंव्हा पैसे घेत नसत तर ४/५ माप जोंधळे देऊन आजोबा हा इतिहास तपासत.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{अशाच वंशावळी}
अशाच वंशावळी तीर्थक्षेत्रावरच्या भटांकडे असतात. मयतकार्यासाठी ! १०वा ११वा दिवस करायला लोक गावात आले की त्यांच्या वंशाचे उत्तरकर्म करणारे ब्राह्मण कोण हे तिथलेच लोक सांगतात. अगदी ७ पिढ्यांची नावे या लोकांकडे असतात.
मी हे प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. या दरिद्री ब्राह्मणांचे यावर पोट असते. त्यांना ' यजमानासाठी ' आपसात भांडताना पण पाहिलंय....!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{वंशावळीवरून आठवले. पूर्वी}
वंशावळीवरून आठवले. पूर्वी कोकणात आणि इतरत्रही अनेक लोकांनी आपापल्या कुलदेवतांची मंदिरे बांधली. विषेशतः कर्हाडे ब्राम्हण आणि सारस्वत यांच्यात हा प्रकार मोठ्याप्रमाणात पहायला मिळतो. म्हणून कोकणात आर्यादुर्गा, शांतादुर्गा, रवळनाथ यांची असंख्य मंदिरे पहायला मिळतात. त्यात फार पूर्वी जेव्हा गोव्यातल्या पोर्तुगिजांच्या छळामुळे तिथून अनेक लोक गावं सोडून कारवार, करवीर (कोल्हापूर),तळकोकण अशा ठिकाणी पांगले. मग त्यांनी तिथे येऊन आपापल्या कुलदेवतांची मंदिरे बांधली. जे लोक तिथेच गोव्यात राहीले त्यांनी मूळ गावांमधून देवस्थाने हलवून ती आडगावी नेऊन ठेवली. ही वेगवेगळी मंदीरे ज्या लोकांनी मिळून बांधली त्यांना त्या मंदिरांचे महाजन म्हणतात. त्यांच्या कुळातील लोकांना मंदिरात गेल्यावर वंशावळीतून त्यांची आडनावे, मूळ गावे यावरून ते महाजन आहेत का नाही हे तपासून मगच तिथे पूजा करण्याचा वगैरे अधिकार असतो.जर त्या देवळात महाजनकी नसेल तर त्या भक्ताला प्रसाद वगैरे देऊन त्यांची महाजनकी कुठे आहे याची ढोबळ मानाने माहीती दिली जाते. मग त्या देवळात जाऊन तपासायचे. तिथले अनेक गुरुजी तर इतके तयार आहेत की नुसते गाव व आडनाव सांगितले की सांगतात "तुमची महाजनकी इथे नाही अमुक अमुक गावी आहे. दर्शन घ्या आणि प्रसाद घ्यायला जा." तिथे पूजा, अभिषेक याच्या पैशाच्या लोभाने कोणाला उगाच तुमची महाजनकी इथे आहे असे सांगून लुटल्याचे पाहीलेले नाही.
-पुण्याचे पेशवे
{बरोबर आहे पुपे.}
बरोबर आहे पुपे. सारस्वतांमध्ये हे आहे, आणि ज्या दैवताचे आणि स्थळाचे महाजन असू तिथे जावेच लागते.
{कर्हाड्यांमधे पण आहे. आमची}
कर्हाड्यांमधे पण आहे.
मजा आली सांगत होता. गेली २-३ वर्षे तो गोव्याला गेला की त्या सगळ्या शांतादुर्गांना दर्शनाला जाऊन येतो.
आमची कुलदेवता महालक्ष्मी, कोल्हापूर असल्याने वाचलो. नाहीतर आर्यादुर्गा - शांतादुर्गा कुलदेवता असलेले फिरत असतात महाजनकी शोधत. अर्थात काहींना त्रास होतो काहींना मजा येते. माझा एक मित्र वेलिंगच्या शांतादुर्गेला गेला. तिथे कळले की ती त्यांच्या महाजनकीतली नाही. मग अजून २-३ गावे फिरल्यावर मिळाली.
मला पण एकदा रवळनाथाची महाजनकी शोधत फिरायचे आहेत. तेवढेच गोव्यात फिरणे होईल.
-पुण्याचे पेशवे
{रवळनाथासाठी फिरणार असलास तर}
रवळनाथासाठी फिरणार असलास तर बाकीचा कोकणही घाल त्या यादीत.
{नाय. आमचो गोवेतंच असा.}
नाय. आमचो गोवेतंच असा.
-पुण्याचे पेशवे
{आमगेलाँ गोयांतच आसा... अशे}
आमगेलाँ गोयांतच आसा... अशे जाय रें..
{आमची देवी तर अम्बेजोगाइत}
{समस्त कोकणस्थांची देवी ती!}
समस्त कोकणस्थांची देवी ती!
{वा वा वा वा ! कसं देवळाच्या}
वा वा वा वा !
कसं देवळाच्या मंडपात बसून गप्पा ऐकल्यासारखं वाटतंय...
सारस्वत...को.ब्रा...'आमची देवी'.....
चालू द्या....!!!
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{सहीच ना. मग. तिथं देवाला कौल}
सहीच ना. मग. तिथं देवाला कौल लावलाय आणि गप्पा झाडायला बसलोय. देव काही कौल देतच नाहीये पण..
{मायादेवी, जरा हलके घ्या हो }
मायादेवी, जरा हलके घ्या हो
साध्या सरळ गप्पा आहेत ह्या. बोलायच्या आणि तिथेच सोडून द्यायच्या.