अविस्मरणीय केरळ आणि जेकब...भाग २


अविस्मरणीय केरळ आणि जेकब...भाग 1

अविस्मरणीय केरळ आणि जेकब...भाग २

आमच्या १० दिवसांच्या सहलीमधील पहिले दोन दिवस थोडे त्रासदायक गेले पण नंतर आम्ही जेकबशी खरोखर ‘communicate’ करून सहल enjoy करत होतो...
आम्ही केरळ मधील प्रेक्षणीय अशा ठिकाणांना भेट देत होतो...
केरळ सहलीत महत्वाचे (?) असे एक ठिकाण म्हणजे आलेप्पी-ठेकडी... या ठिकाणी Site seeing ला जाण्यासाठी फेरी बोट असते... आणि ही बोट backwaters मध्ये घेऊन जाते... इथे जाण्याआधी दुर्बिण इत्यादी गोष्टी बाहेर भाड्याने मिळतात... सामान्य पर्यटकाप्रमाणे आम्हीही दुर्बिण घेऊन मोठ्या जोशाने बोटीमध्ये बसलो... संपूर्ण बोटीमध्ये २ मार्गदर्शक (Guide) होते... H.M. चा Season असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यातून (त्यातही महाराष्ट्रातून आलेली) बरीच जोडपी इथे दिसली... आपल्या समोरचा माणूस मराठीतून बोलतोय असे बघितल्यावर प्रत्येक जोडप्यातील तो किंवा ती त्यांच्याच तिला किंवा त्याला कोपराने धक्का मारून, किंवा कानाजवळ पुटपुटत... च्यायला हे पण आपल्याकडचेच (इति तो) किंवा अगदी अय्या हे पण मराठीच आहेत वाटते (इति ती) असे संवाद चालू होते... त्यातच प्रत्येकला किंवा प्रत्येक जोडप्याला आपले फोटो काढून घेण्याची दांडगी हौस... मग एका जोडप्यातील तो दुसऱ्या जोडप्यातील त्याला Excuse me… One photo please (अर्थात फोटो काढाल का?) असे विचारात होता... मग तो कार्यकर्ता लगेच... ‘Yess… sure…’ असे म्हणून पहिल्या जोडप्याचा अगदी मोठा फोटोग्राफर असल्याप्रमाणे फोटो काढत होता आणि लगेच पहिल्या जोडप्यातील त्याला ‘आता आमचा पण एक फोटो काढा...’ असे सांगत होता... हा सगळा खेळ चालू असताना बोटीवरील मार्गदर्शक एकदम कुठेतरी डोंगरावर बोट दाखवून तिकडे कोणता तरी प्राणी असल्याचा दावा करीत होता... आणि त्याच्या या इशाऱ्यावर...सगळे हौशी पर्यटक बोटीच्या Balance ची परवा न करता या बाजुहून त्याबाजूला जात दुर्बिणीसह जात होते... मी पण त्यांच्यापैकी एक असल्याने मी पण थोडा वेळ हा खेळ खेळलो... पण काहीही प्राणी वगैरे दिसत नाही असे बघून निवांत बसलो... या तास दीड तासाच्या फेरीमध्ये मला काही हरणे आणि म्हशी सदृश एक प्राणी दिसला...

पण इतके सगळे होऊन देखील ठेकडीचे वातावरण खुपच आल्हाददायक होते... आणि केरळ सहल सार्थकी ठरत आहे असेही वाटत होते...
ठेकडी येथे कथकली नृत्य प्रकारात काही कार्यक्रम होते पण अपुऱ्या वेळामुळे आम्ही हॉटेलचा रस्ता धरला....

त्यानंतरचे सहल कार्यक्रमातील ठिकाण होते मुन्नार... हे एक थंड हवेचे ठिकाण आहे... आणि इथली हवा आणि इतर एकंदरीतच वातावरण खूप छान होते... मुन्नार मधील चहाचे मळे, चहा कारखाना (Tea Factory) आणि एक धरण (नाव आठवत नाही) अशी काही प्रेक्षणीय ठिकाणे होती... मुन्नारमध्ये २ दिवसांचा मुक्काम असल्याने आम्हाला सगळी ठिकाणे अगदी आरामात पाहता आली...

मुन्नार वरून आम्हाला गुरुवायुर या ठिकाणी जायचे होते... आणि इतके दिवस आम्हाला चांगली कंपानी देणाऱ्या जेकब साहेबांनी पुन्हा एकदा झटका दिला... माझ्या आठवणी प्रमाणे मुन्नार ते गुरुवायुर हे अंतर साधारण ६ तासांचे होते... आम्ही जेकबला विचारले आणि त्याला कळलेल्या खाणाखुणातून त्याने असे सांगितले की त्याला एक शोर्टकट माहिती आहे ... आणि आपण जर त्या रस्त्याने गेलो तर जवळपास ६० किलोमीटर अंतर वाचेल... आम्ही पण पुढचा मागचा जास्त विचार न करता त्याला हो म्हणालो आणि तिथेच फसलो... आम्ही त्याला विचारले की वाटेत जाताना काही बघण्यासारखे आहे का? त्याने फक्त Shortcut , waterfall असे म्हणून मन डोलावली... नाईलाजाने आम्ही हो म्हणून प्रवास सुरु केला... सुदैवाने आम्ही थोडा नाष्टा करून निघाल्याने थोडा वेळ चांगला गेला... नंतर एका गावात गेल्यावर जेकबने मल्याळम मध्ये रस्त्यावरच्या एक दोघांना बहुदा Shortcut बद्दल माहिती विचारली... कदाचीत ती पुरेशी नाही असे वाटून त्याने एका दुकानासमोर गाडी थांबवली... आणि तो परत चौकशी करण्यासाठी गेला... तेवढ्यात तिकडे एक केळी विकणारा कार्यकर्ता दिसला म्हणून मी सहज विचारले की कशी डझन? इकडे जेकबची जी परीस्थिती तीच त्या केळे वाल्याची... पण तिथल्याच एका दुकानदाराला हिंदी येत असल्याने बरेच काम हलके झाले आणि केळी डझनावर न मागता किलोवर घ्या असा सल्ला मिळाला... मग मी किलोने विचार करून अर्धा एक किलो केळी आणली... आणि तीच आम्हाला पुढचे जवळपास ५ तास पोटपूजेसाठी उपयोगी पडली... त्याचे झाले असे... जेकब साहेब Shortcut कळलयाच्या आनंदात आले आणि एकदम जोश मध्ये गाडी चालवत सुटले... काही अंतर गेल्यावर एक वन विभागाचे चेकं पोस्ट लागले... तिकडे जाऊन साहेबांनी काहीतरी नोंदणी केली आणि आम्ही एका जंगलातील रस्त्याला लागलो... दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मधून रस्ता... आणि रस्त्यावर आम्ही चौघे... मी, माझी बायको, जेकब आणि आमची गाडी... बाकी काळे कुत्र पण नाही... साधारणपणे अर्धा तास अंतर गेल्यावर मी जेकाबला विचारले Shortcut??? (हाच का तो Shortcut) त्याने पण अगदी खात्रीने हो म्हणून मान डोलावली... गाडीत निवांत बसून झाडे बघणे आणि पुढे कुठेतरी मनुष्यवस्ती दिसेल अशी आशा करणे इतकेच आमच्या हातात होते... त्यात भर म्हणून पुढे गेल्यावर अचानक एक Y Section आला आणि जेकब साहेब पुन्हा गोंधळले... फक्त नशीब चांगले म्हणून तिकडे काही जंगलामध्ये काम करणारी माणसे भेटली आणि त्यांनी जेकबला रस्ता सांगितला आणि पुन्हा जंगलातील प्रवास चालू झाला...साधारण तीन-साडेतीन तास प्रवास झाल्यावर मला जेकबला धारवा का मारावा असे वाटायला लागले...
हळू हळू सूर्यप्रकाश जास्त दिसू लागला आणि जंगल कमी होऊ लागले... आम्हाला थोडे हायसे वाटले... खरेच आपण Shortcut मारला असा आमचा समज होता...पण पुढे गाडी उताराची वळणे घेत घाट सदृश रस्त्याने खाली आलो आणि आता आणखी एक धक्का... पुढे चक्क नदी... आता परत फिरायचे म्हटले तर पुन्हा जंगलामधील प्रवास जो केवळ अशक्य आणि पुढे जायचे म्हटले तरी ना होडी ना नावाडी.... समोर मनुष्य वस्ती दिसत असूनही नदीच्या त्या बाजूला जाणे अवघड झाले....
मी रागाने एक एक कटाक्ष जेकब कडे टाकला आणि Shortcut, Sorry Sorry, No Complaint असे चालू केले... काही वेळाने तिकडे त्याने हातवारे करून नदीच्या या काठावरून तिकडे इशारा केला आणि एक माणूस एक तराफा घेऊन आमच्याकडे यायला निघाला... आमच्या जीवात जीव आला ... मग त्या तराफ्यावर आम्ही चौघे आणि तो तराफा चालक अशी सगळी स्वारी निघाली १० मिनिटात आम्ही पलीकडच्या काठावर गेलो... मग थोडा कच्चा रस्ता पार करून गेल्यावर हमरस्ता लागला....
आम्ही एक धबधबा या वाटेवर पाहिला आणि पुन्हा गुरूवायुराच्या दिशेने प्रयाण केले... सकाळी साधारण ८ -८.३० वाजता सुरु केलेला प्रवास दुपारी ४ वाजता संपला... आम्ही सहल कार्यक्रमातील शेवटच्या मुक्कामी पोचलो...
दुसऱ्या दिवशी सकाळी यथोचित देवदर्शन करून आम्ही एर्नाकुलम रेल्वे स्थानकाकडे निघालो... दुपारी १ वाजता रेल्वे स्थानकात पोचलो... जेकबने आम्हाला निरोप दिला... आम्हीही त्याला हिंदी इंग्रजी शिकण्यासाठी शुभेछा दिल्या...
आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली... येतानाची रेल्वे गोवा रत्नागिरी मार्गे येणार असल्याने गोवा आणि कोकण यांना खरोखर धावती भेट दिली...
अशा प्रकारे थ्रीलिंग शेवट झालेली ही सहल आयुष्यभर नक्कीच लक्षात राहील... आणि कोण सांगावे परतच्या केरळ भेटीत हाच जेकब परत भेटेल आणि आमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे हिंदी आणि इंग्रजी बोलून आम्हाला सुखद धक्का देईल...

No votes yet

प्रसाद's picture
फोटो उपलोड करणे...

कृपया मला फोटो उपलोड करण्यासाठी मार्गदर्शन करा... मी उपलोड केलेले फोटो नीट दिसत नाहीत...


राजे's picture
फोटोचा पाथ चुकला आहे. तुम्ही

फोटोचा पाथ चुकला आहे.

तुम्ही फोटो आधी इतर जागी अपलोड करा ( पिकासा / प्लिकर) व मग त्यांचा पाथ कॉपी करुन आपल्या येथे वर दिसत असलेल्या चित्र चौकटीमध्ये पेस्ट करा. Alternative text मध्ये काही नाव इत्यादी द्या.


पुण्याचे पेशवे's picture
प्रसाद, लवकरात लवकर फोटो

प्रसाद,
लवकरात लवकर फोटो अपलोड करा. म्हणजे धागा व्यवस्थापकांना नीट करता येईल.


-पुण्याचे पेशवे

राजे's picture
गजब ! सुरेख फोटो आले आहेत

गजब !

सुरेख फोटो आले आहेत मित्रा... !


निर्मयी's picture
फोटोंचा साईज मोठा करता येईल

फोटोंचा साईज मोठा करता येईल का?
छान लिहिलेत. कालडी पाहिलेत?


मेघवेडा's picture
छान! कधी कधी वाट चुकल्यानेही

छान! कधी कधी वाट चुकल्यानेही फायदा होतो. मस्त तराफ्यावरून गाडीतून नदी पार करण्याचा हा अनुभव वाट चुकला नसतात तर घेता आला नसता! हास्य मस्त!

अवांतर : हरणं दिसली, ते म्हशीसदृश प्राणी कुठेयत? wink

-(बर्‍याचदा वाट चुकून मनमोहक नजारे बघायला मिळालेला) मेघवेडा.


गणपा's picture
बरीच वाट पहायला लावलीस

बरीच वाट पहायला लावलीस दुसर्‍या भागासाठी, बट वर्थ इट. हास्य


मिनी's picture
मस्त लिहिलय एक्दम..

मस्त लिहिलंय.. वाचताना मजा आली ..
सगळे photos पण छान आलेत...


स्नेहाराणी's picture
मस्त लेखन

छान लिहलय्..अन् फोटोदेखील छान
हास्य


अर्धवट's picture
चांगलं लिहिलय.. आगे बढो.. पण

चांगलं लिहिलय.. आगे बढो..

पण दोन भागात का बरं संपवलं.. ट्रेनच्या प्रवासावर पण ऐकायला आवडलं असतं


मितान's picture
मला माझा केरळ प्रवास

मला माझा केरळ प्रवास आठवला...
आमचा 'जेकब' ठेक्कडीला रात्री थंडी खूप म्हणून पिउन टुण्ण झाला तो सकळी ९ वाजले तरी जागा होइना...
आमच्या दादाला गाडी चालवायचा थोडा अनुभव होता त्या जोरावर डायवरला गाडीत घालून तो आणि आम्हि चौघे ठेक्कडी उतरलो.. कालडी ला आल्यवर आधी ड्रायवर बदलला !!

फोटो मस्त ! फ्रेश ! हास्य


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !

प्रभो's picture
मस्त!!!

मस्त!!!


देवबाबु's picture
झक्कास..

झक्कास फोटो आले आहेत मित्रा..साइज मोठी असती तर आणखी छान वाटले असते..