मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी नेटवर्क !

दहशतवादी

एक दहशतवादी आहे
चिडलेला, अंधाऱ्या मनात
सुर्याची किरणे
पाहू शकत नाहीत त्याला
मधूर थंडगार पेय
नाही विझवत त्याचे निखारे.
किंचाळणारे रुदन
अथवा मायेच्या विनवण्या
त्याच्या दोन कानांमधील पोकळीत
गुंजत नाहीत.

त्याच्यापुढे आत्ता ह्या क्षणी
फ़क्त एकच कार्य अतीशय महत्वाचे आहे.
ते पूर्ण केल्या शिवाय त्याचा संताप निवणार नाही.

तिरमिरीने तो उठतो.
छोटीच्या हातातली नवीन गोंडस बाहुली हिसकावून
तिचे कपडे फ़ाडून,
हातपाय ओरबाडून पायाखाली तुडवतो.
आईच्या रागावण्य़ाकडे किंवा छोटीच्या रडण्याकडे
त्याचे लक्षही नाही.

छोटीची नवीन बाहुली चोळामोळा केल्यावर
त्याला एक अतीव समाधान झाले आहे.
निदान पुढच्या वेळी तरी,
तिच्यासाठी हे लोक माझ्यापेक्षा जास्त चांगली वस्तू
आणणार नाहीत, ह्या आशेने.
---------->>>>>>>>

प्रतिक्रिया

छान कविता

छान कविता

बापरे काय

बापरे काय लिहिलय...
ह्याला छान तरी कसे म्हणु

-निखिल

तिरमिरीने

तिरमिरीने तो उठतो.
छोटीच्या हातातली नवीन गोंडस बाहुली हिसकावून
तिचे कपडे फ़ाडून,
हातपाय ओरबाडून पायाखाली तुडवतो.
आईच्या रागावण्य़ाकडे किंवा छोटीच्या रडण्याकडे
त्याचे लक्षही नाही.

छोटीची नवीन बाहुली चोळामोळा केल्यावर
त्याला एक अतीव समाधान झाले आहे.
निदान पुढच्या वेळी तरी,
तिच्यासाठी हे लोक माझ्यापेक्षा जास्त चांगली वस्तू
आणणार नाहीत, ह्या आशेने.

Sad
अवघड आहे.. जगणं एकुणच अवघड आहे.