सुयोधन आणी कर्ण

0
0

गोष्ट तशी जुनी म्हणजे महाभारतातील आहे, आपल्या पैकी बर्‍याच लोकांना माहितीही असेल.
मृत्युंजय कर्ण एकदा सुयोधनाला (ह्याला आपण दुर्योधन या नावाने ओळखतो) भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला होता, काही महत्वाच्या कामानिमित्त तेंव्हा सुयोधन बाहेर गेला होता व त्याला येण्यास थोडा अवधी लागणार होता. मित्राची वाट बघत बसलेल्या कर्णास सुयोधन पत्नी भानुमती हिने बुद्धिबळ खेळण्याचा आग्रह केला. झाले खेळ चालु झाला, काहि वेळातच २/३ चालीत कर्ण जिंकणार हे स्पष्ट झाले, हार हा शब्द माहित नसलेली भानुमती आता मात्र भांबावली आणी कामाचा बहाणा करुन जायला लागली. आयुष्यात अनेक लोकांनी कर्णाकडे पाठ फिरवली होती त्याचा अपमान केला होता, आता विजयाच्या या क्षणी सुद्धा भानुमती कडुन मिळणारी हि वागणुक पाहुन कर्ण काहिसा संतापला आणी त्यानी रागाच्या भरात भानुमतीला हाताला धरुन खाली बसवायचा प्रयत्न केला. ह्या गडबडित भानुमती कर्णाच्या अंगावर पडली आणी तिच्या गळ्यातिल अत्यंत मौल्यवान अशी मौतिक माला ( मोत्यांची माळ) तुटुन तिचे मोती सर्वत्र विखुरले, आणी त्याच क्षणी सुयोधन महालात प्रवेश करता झाला. विचार करा आपली सुंदर पत्नी आपल्याच मित्राच्या (ज्याच्या सौंदर्याची, देखणेपणाची, विरतेची चर्चा सर्वत्र आहे) अंगावर पडलेली आहे, तिच्या गळ्यातिल माला तुटुन सर्वत्र मोती विखुरले आहेत हे पाहुन एखद्या संयमी पुरुषोत्तम हि शंकेने ग्रासला गेला असता त्यानी मनाचा काहि गैरसमज करुन घेतला असता. पण त्यांना या अवस्थेत बघुन सुयोधनानी कपाळाला हात लावला आणी हसत हसत म्हणाला "अरे काय रे तुम्ही दोघे ? येव्हडे मोठे झालात पण तुमच्यातील दंगेखोर लहाणपणा मात्र गेला नाही. येव्हड्या मुश्किलीनी घडवुन घेतलेली माळा सुद्धा तुमच्या दंगा मस्तीत तुटली बघा." असे म्हणुन तो सुर्‍हुद, तो मित्रोत्तम स्वत: खाली बसुन मोती वेचायला लागला.

छान

छान कथा.

अशीच एक कथा मागे कुठे तरी मासिकात वाचली होती पण नावे वेगळी होती तसेच ती कथा जरा मोठी पण होती.

सुयोधन

मी ही कथा वाचलेली नाही .

मी ही कधी

मी ही कधी वाचली नव्हती ही कथा, छान आहे. अजून काही कथा असतील तर सांगा.

सर्वांचा वाचायला राहिला असेल

सर्वांचा वाचायला राहिला असेल म्हणून वर घेउन येत आहे रे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान आहे...

छान आहे...



-निखिल

सुरेख!

सुरेख आहे!

+१ छान

+१ छान

मस्त

मस्त

मस्त कथा

वाचली नव्हती अगोदर.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

कथा माहित होती. पण धागा वाचला

कथा माहित होती. पण धागा वाचला नव्हता हास्य
पुरातत्वखात्याच्या प्रमुखांना धन्यवाद wink



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

छान....

मला शन्का वाटते आहे कि ही गोष्ट कर्ण आणि दुर्योधनाच्या बाबतीत घडली आहे का ते. पण खरेच खुपच प्रेरणादयी आहे.

धर्मराज....!

"सुयोधन...." महाभारतात कितीही उलथापालथ झाली तरी फक्त धर्मराजानेच शेवटपर्यंत दुर्योधनाला "सुयोधन" याच नावाने हाक मारली आहे.

म्हणून असेही म्हटले जाते की, एक धर्मराज सोडला तर कौरवांच्या मनी कोणत्याही पांडुपुत्राबद्दल ममत्व वा भ्रातृभाव नव्हता.

(बाकी हा "कर्ण+भानुमती" किस्सा प्रथमच वाचतोय. असाच एक प्रसंग कर्ण आणि कौरव राजकन्या दु:शला यांच्यात घडला होता काय? नीट आठवत नाही.)



~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

खरतर दुर्योधन म्हणलं कि एक

खरतर दुर्योधन म्हणलं कि एक नकारात्मक भाव मनात उमटतो. दुर्योधन म्हणजे काहीतरी दुष्ट, वाईट !!
पण दुर्योधन याचा खरा अर्थ आहे "युद्धात जिंकण्यास कठीण आहे असा जो तो"



(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)

प्रक्षिप्त कथा

मूळ महाभारतात नसलेल्या अशा काही कथा प्रचलीत आहेत. एखादा मुद्दा मांडण्यासाठी ठीक पण त्यामुळे व्यासांनी जे मूळ व्यक्तिचित्र रंगवलंय त्याला अनेकदा बाधा येते.



आपला स्नेहांकित...
-अशोक

प्रचलित कथांचे एक संग्रह तयार

प्रचलित कथांचे एक संग्रह तयार करावयास हवा आहे...



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नवीन माहिती समजली.

नवीन माहिती समजली.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही