भारतीय तत्वज्ञान - भाग २

0
0

भाग १

तत्वज्ञान हे शब्दांनी बनलेले असते. त्यामुळे शब्दांचा योग्य अर्थ काय आहे हे तत्वज्ञान समजुन घेतांना लक्षात घेणे जरुरीचे असते. अर्थ हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. ध्येय, हेतु, वित्त, राजनीती वगैरे. इथे शब्दाचा, भाषेचा अर्थ या अर्थाने अर्थ हा शब्द घेतला पाहिजे. मनातले विचार प्रकट करुन आपले ज्ञान दुस-याला देण्यासाठी मनुष्य शब्दांचा आधार घेतो.

शब्दाचा अर्थ उमगुन ज्ञान कसे होते यावर जवळ जवळ सर्वच दर्शनशास्त्रांनी चर्चा केलेली आहे. शब्दांचे अनेक प्रकार असतात. काही एक अर्थाचे, एकापेक्षा अनेक अर्थ असलेले, समानार्थी वगैरे. त्यामुळे अर्थ लावतांना शब्दाचा लेखकाला अभिप्रेत असलेलाच अर्थ आपण घेत आहोत हे भान राखणे गरजेचे असते. हे विशेष करुन जेव्हा संस्कृतसारख्या सध्या जास्त प्रमाणात न बोलल्या जाणा-या भाषेला लागु होते. काही पुरातन शब्दांचे अर्थ कालाच्या ओघात अर्थ बदलुन जातात. तेव्हा त्यांचा पुरातन अर्थ लक्षात घेवुन समजुन घेणे आवश्यक असते.

जसे "देवांना प्रियः" या संस्कृत शब्दाचा सरळ सरळ अर्थ देवांना प्रिय असा आहे परंतु व्यवहारात तो मुर्ख अशा अर्थाने वापरला जातो. महाब्राह्मणः हा महान ब्राह्मण असा न वापरला जाता चांडाळ म्हणुन वापरला जातो. म्हणजेच अर्थ हा प्रत्यक्ष शब्दांनी सुचित होणा-या अर्थापेक्षा भिन्न असु शकतो. या सर्वांचा विचार करुन अर्थ कसा लावला जातो यावर काही तत्वे निश्चित केलेली आहेत. कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ, शेवट, मांडलेले मुद्दे, कारणमीमांसा, फल, उदाहरणे, उपपत्ती यावर अर्थनिश्चिती केली जाते.

तत्वज्ञान विषयक ग्रंथांचे वैशिष्ट म्हणजे तत्वांचे वर्णन करुन निरुपण करणे. यात दोन भाग प्रामुख्याने होतात. एक मी म्हणजे विचार करणारा आणि तु म्हणजे ज्याच्याबद्दल विचार केला जात आहे तो. या दोहोंमधील संबंध सांगणे हा हेतु आहे. यात मी शब्दाने अंतर्गत तत्व आणि तु शब्दाने बाह्य सृष्टी प्रतिपादन केली गेली. यादृष्टीने जीव आणि जड ही दोन तत्वे, यांची उत्पत्ती, परस्परसंबंध, याबाबतचा विचार तत्वज्ञान नावाने ओळखला जातो.

भारतातील तत्वज्ञानाचे स्वरुप वरील दोन तत्वे, यांचे परस्परसंबंध यावर जरी विविध मते असली तरी ही तत्वे एकमेकांपासुन भिन्न आहेत की एकमेकांवर अवलंबुन आहेत की एकापासुन दुसरे उत्पन्न झाले वगैरे मुद्यांवर भेद आहेत. यात प्रामुख्याने जडतत्व हे जरी पालटत असले तरी तेच नित्य असुन केवळ विशिष्ट परिस्थितीत दिसुन येणारा चेतना गुण मानणारा जडाद्वैत, जड व चेतन दोन्ही अनित्य आणि क्षणभंगुर मानणारे शुन्यवादी, दोन्ही भिन्न आणि नित्य मानणारे द्वैतवादी, चेतन हेच एकमेव नित्य असुन त्यापासुन जडाची उत्पत्ती होवुन त्यातच विलय होतो मानणारे अद्वैतवादी हे प्रमुख चार प्रकार दिसतात. यांच्यात परत अनेक भेद पोटभेद तयार होवुन अनेक पक्ष निर्माण झाले. एकेकाळी २५० पेक्षा अधिक मतमतांतरे आपला प्रभाव राखुन होती असे मानण्यास हरकत नाही. यापैकी द्वैतवाद हा समजण्यास सोपा असल्याने अनेकांना तो पटतो आणि मानला जातो.

अशा सर्व विचारांचे एकत्रिकरण होवुन प्रमुख मुद्दयांवर आधारुन दर्शने तयार झालेली आहेत. काही दर्शने एकमेकांचे विचार उचलुन धरतात तर काही खंडन करतात. ज्याच्या बुद्धिला जे पटेल त्याचे तो समर्थन करत असतो. मत कुठलेही असो संसारातील दुःखाचे निवारण होवुन प्रश्नांची उत्तरे मिळणे हाच हेतु असतो.

क्रमशः

वाचतो आहे, पुढील भागांच्या

1

वाचतो आहे, पुढील भागांच्या प्रतिक्षेमध्ये.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाचते आहे, सुरेख सुरु आहे...

2

वाचते आहे, सुरेख सुरु आहे...

असेच म्हणते.

3

वाचत आहे.

नॅन्स, वाचत आहे. तरी यामागचा

4

नॅन्स,
वाचत आहे. तरी यामागचा उद्देश समजत नाहीये. कारण विषय खुपच मोठा आहे आणी त्यामुळे अनेक फाटे/प्रश्न फुटु शकतात. संदर्भ लागत नाही त्यामुळे माझ्या बालबुद्धीला झेपत नाहीये. wink
पड्द्यामागची कारणे आणी क्लायमॅक्स काय अपेक्षित आहे याची हिंट मिळाली तर समजायला सोपे जाइल असे वाटते. हास्य

संदर्भ शोधणे सोडले तर संदर्भ

5

संदर्भ शोधणे सोडले तर संदर्भ आपोआप लागतील.

wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उत्तम लेख...

6

उत्तम लेख...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नाना, उत्तम लेख .. वाचतो आहे

7

नाना, उत्तम लेख .. वाचतो आहे ..

?

8

विशिष्टाद्वैत म्हणजेच जडाद्वैत काय?

राघव