मी चूकलो...माफी !

0
0

काल मित्रांच्या बरोबर संध्याकाळी काम संपवून बसल्यानंतर बोलता बोलता खुप विषय निघत गेले, एक एक विषयावर मी तावातावाने चर्चा / वाद / प्रतिवाद करत गेलो, मध्यरात्र झाली, मी माघार घेण्यास तयार नव्हतोच त्यामुळे तो विषय तसाच सोडून आम्ही बाहेर पडलो.

काल रात्रीचा इफेक्क्ट म्हणा किंवा मी जरी झोपलो असेन माझ्या डोक्यात चालू असलेल्या विषयामुळे समजा अचानकच पहाटे पहाटे जाग आली. डोळ्यावर पाणी मारलं.. व क्षणभर थबकलो. रात्रीची चर्चा पुन्हा जशीची तशी आठवली. मी विचार करण्यास सूरवात केली एक एक मुद्दे कागदावर लिहित गेलो. अगदी छोटे छोटे मुद्दे. मित्रांचे, घरचे, माझे १०० एक मुद्दे बाहेर पडले असतील. मी चकित झालो, पुन्हा पुन्हा मुद्दे वाचले, त्यात काही छोटी छोटी कारणं होती ज्या मुद्द्यावरून मी भांडलो अथवा वाद घातला होता. मित्रांमध्ये कळत नकळत दुरावा निर्माण होणार्‍या गोष्टी अनेकवेळा अत्यंत छोट्या असतात की काही काळानंतर त्यावर विचार केला तर लक्ष्यात येतं अरे ह्यातील एक मुद्दा देखील योग्य नव्हता ज्यासाठी आपण भांडलो.

चूक कोणाची हा प्रश्न गौण, पण ह्याचा परिणाम किती दुरवर झाला, होतो ह्याचा आपण सारासार विचार देखील करत नाही व ह्या छोट्याशा वादाचा खोलवर परिणाम आपल्या मित्र साखळी वर देखील होतात व हे तेव्हा वेगाने होते जेव्हा दोन भांडणांर्‍या व्यक्तींचे मित्र कॉमन असतात. कळत न कळत दोन तट पडत जातात, टेबलाला रंगभूमीचे स्वरुप व शब्दांना तलवारीची धार येते. वाद-प्रतिवाद होतात, उत्तराला प्रति उत्तर... सगळेच वाढत जाते, व एका बेसावध क्षणी एखादा घाव वर्मी बसतो व सगळेच संपते !

अ व ब च्या भांडणा मुळे, क्षणिक वादामुळे, पुर्ण मित्र संग्रह दुखावला जातो, वाद संपला असतो, एकमेकांना पाहणे तर सोडाच एखादा समोरून गेला तर चक्क दुर्लक्ष करणे व जमेल तेथे उट्टे काढणे हे चालू होते व ती छोटीशी जखम हळू हळू वाढ्त वाढत एवढी वाढते की उरला सुरला मैत्रीचा आपल्या मनातील तो हिस्सा आपण स्वतः काढून टाकतो व तेथे मग दोनच प्रकारच्या भावना शिल्लक राहू शकतात एकतर पराकोटीचा द्वेष अथवा एक पुर्ण अलिप्तता. व हे फक्त अ व ब च्या मध्ये घडत नाही ते पुर्ण सर्कलमध्ये कळत न कळत घडले जाते. कित्येक दिवस जुण्या नात्यावर, प्रेमावर, मैत्रीवर तो छोटासा वाद भारी पडतो...

दिवसाला दिवस जातात, झुकला कोणीच नाही म्हणून एक विश्व वेगळे होतं, दोन गट, मध्ये एक अदृश्य भिंत. दोन्ही बाजूला मनात हुरहुर असते की त्या अदृश्य भिंतीच्या मागे काय चालू असेल ह्याची. दोन्ही बाजूला असं वाटतं असतं की ओलांडावी ही भिंत एकदा, पाहू तरी काय होतं ! पण अनामिक भिती, अपमानाचे शल्य व पुढून प्रति उत्तर कसे असेल ह्याची काळजी, भिंत ओलांडली म्हणून पुन्हा शब्दांचा वार झालाच तर ही भिती ? झुकायचे कोणालाच नको असते.

मी चूकलो...माफी ! हे तीन शब्द ! लिहण्यास खुप सोपे, पण म्हणताना ? मनातून शब्द बाहेर ओठापर्यंत येण्यासाठी त्या शब्दांना आपल्या आतील ईगो शी, झालेल्या गोष्टीच्या बदल असलेल्या रागाशी, पचवलेल्या अपमानाशी झगडावे लागते, त्याला साथ असते फक्त त्या मनामध्ये असलेल्या मैत्री विषयाबद्दल च्या प्रेमाची, पण हे शब्द नेहमी हरतात व मनात आलेले शब्द ओठापर्यंत पोहचतच नाहीत. लिहलेला मेल, डायल केलेला नंबर अथवा चॅट विंन्डोवर टाईप केलेला मॅसेज... मध्येच Esc होतो...डिलिट होतो... रद्द केला जातो, का ? माहित नाही... पण हे कुठेतरी थांबायला हवं ! कोणीतरी एक प्रयत्न नक्कीच केला पाहिजे, मागे मी एका लेखात एक वाक्य वापरलं होतं, मनाचे सर्व दरवाजे कधीच बंद करु नका, एखादी फट तरी नक्कीच ठेवा, कधीतरी चुकून भिंती पलिकडून.... मी चूकलो... माफी ! हे शब्द उच्चारले जातील, कधीतरी कोणाच्या मनामध्ये हे शब्द जिंकले असतील व ओठांवर आले असतील.... तर ते तुमच्यापर्यंत कमीत कमी पोहचतील...तरी ! आपल्या मनाची कवाडे थोडी उघडी राहू देत.. आपण दगड नाही आहोत की एक चिरा पडला म्हणजे शकले होणारच. आपण हसती खेळती, भाव भावना असलेली जिवंत माणसे आहोत..

मित्रांच्या जवळ, आपल्या आपुलकीच्या माणसासमोर झुकण्यात कसली आली शरम ?

नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |
गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||

******

आता एवढं लिहलचं आहे तर माझ्या मनातील एक मळभट देखील काढून टाकतो.. सर्व दरवाजे खिडक्या उघड्या करतो.. जगाला प्रकाश देणार्‍या सुर्याला साक्षी ठेऊन मनमोकळेपण, मनात कुठला ही वैरभाव, द्वेष, इर्षा न ठेवता जे माझ्याकडून / माझ्यामुळे कळत न कळत कधी दुखावले गेले असतील तर मी चूकलो...माफी ! क्षमा !

******

टारझनचा गुत्तुडा वाचला व काहीतरी लिहावेसे वाटले, त्या बद्दल त्याचे आभार.

" काय रे हे ?? आता नवीन काय

" काय रे हे ?? आता नवीन काय केलेस ?? जरा शांततेने घेत जा ?? किती दिवस पोरकटपणा करणार आहेस ??"

आता आम्ही मागु का माफी ??

दोस्ती का ऊसुल हय ? ना सॉरी ना थँक्यु ?? ओन्ली "व्हय" !!

आरंतिच्यामारी .... काय हे

आरंतिच्यामारी .... काय हे राजे ? Laughing out loud
असो ... झाले गेले विसरुन जा ... माझ्यामनात तुझ्याविषयी कधीच आढी नव्हती बरंका .. आमचं वॉशरुमचं दार आम्ही यासाठीच उघडं ठेवा म्हणतो हास्य
असो ...

स्वगत :
च्यायला , आमच्या गुतुड्यामुळे हा एक गुतुडा सुटला .... कोणाला हवेत च्यायला ५० प्रतिसाद !! आम्ही लिहीलेलं केवळ वांझोटं नसतं तर त्याला कधीतरी फळ येतं हे पाहुन आज खरोखर डोळे पाणावले आहेत हास्य

जियो राजे हास्य

चला...माफी मागायला, माघार

Big smile चला...माफी मागायला, माघार घ्यायलाही मोठे मन लागते!! विक्टरीची स्मायली नाहिये वाटते इथे..............V V V V V V V Big smile

देवा रे

आता हे काय आणखी नवीन. ए बाबा तुमच्या भेटी जरा कमी करा रे. अतिपरिचयात् अवज्ञा होते आहे असे दिसते. जे दुसर्‍या बाजूला होते त्यांनाही विनंती की कृपया मुद्दा ताणू नये नि झाल्या गोष्टी गंगेत सोडाव्या.

अहो काही झाले नाही आहे, फक्त

Big smile

अहो काही झाले नाही आहे, फक्त जे झाले ते चूकीचे होते असे वाटले म्हणून हे लेखन !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

झाल्या गोष्टी गंगेत सोडाव्या.

झाल्या गोष्टी गंगेत सोडाव्या. >>>
गंगा उपलब्ध नसल्याने कृपया जवळच(जिथे भेटी-गाठी होतात त्याचा जवळ) असलेल्या मुळा-मुठात सोडाव्या असे आमचा वार्ताहर कळवितो !!

तथास्तू ! सोडलं !

तथास्तू !

सोडलं !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

क्षमस्व

आम्ही अशा वेळी क्षमस्व म्हणुन मोकळे होतो. पण एक सुक्ष्म अढी वा दुरावा राहतो तो मानवी स्वभाव आहे.कधी कधी समुह उन्मादातुन कुणी नकळत दुखावल जाउ शकत ते दुखावणार्‍याच्या लक्षात पण येत नसते. कधी क्षमस्व म्हणायचे असते पण वेळ निघुन गेली असते.अग मनात ती सल बोचत राहते.चर्च मधे कनफेशन ला फार मह्त्व आहे असे ऐकून आहे. आपण माणुस आहोत चुकु शकतो ही भावना मह्त्वाची.
लेख आवडला



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

राजे

खरं लिहिता राजे..
असे विचार प्रत्येकाचेच झाले तर असंख्य प्रश्‍न मिटतील
तुमचे नुसते नाव राजे नाही, तर मनही राजा सारखे आहे.
प्रत्येक जण आपल्या चुकांची अशी माफी मागत नाही.

नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |
गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||

छान

काय बोलु ? शब्द नाहीत

काय बोलु ? शब्द नाहीत

+१

>>काय बोलु ? शब्द नाहीत
सहमत आहे,

पण थोडसं जमेल तसं बोलतो.
आपण सर्वांनी जर राग, आनंद, समज्-गैरसमज जर समोरासमोर शांतपणे बोलुन दाखवले, आणी कुणी हे बोलत असेल तर थंड डोक्याने समजुन घेतलं तर मोठे प्रश्नसुद्धा चुटकीसरशी सुटु शकतात. अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही, वेळ लागेल, त्रास होइल पण मग विन्-विन सिट्युएशन निर्माण करता येइल.
नदी कधी कधी भरभरुन वहाते, पण पाणी थोडं कमी झालं की तिच्या बाजुला डबके साचतात. जे पाणी नदीसारखं अखंड वाहु शकतं, हजारो लोकांच्या जीवनाचा आधार बनु शकत ते डबक्यात कुजायला लागतं, त्यात शेवाळ वाढतं, आणी एक दिवस ते पाणी वाफ होउन निघुन जातं - कुणाच्याही नकळत. माणसाचंही तसच आहे, माणुस स्वतःच अस्तित्व जाणवुन देण्याच्या नादात असंच एक डबकं होउन बसतो आणी स्वतःच ठरविलेली मुल्ये विसरुन बसतो.

असो,
राजेंनी पुढाकार घेतला आहेच, याच निमित्ताने मीसुद्धा सर्वांची माफी मागतो, कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल.

धन्यवाद.
आपला,
मराठमोळा

+१

असेच बोलतो

या निमित्ताने मीसुद्धा सर्वांची माफी मागतो, कळत न कळत झालेल्या अथवा न झालेल्या चुकांबद्दल.

+ १

आपण सर्वांनी जर राग, आनंद, समज्-गैरसमज जर समोरासमोर शांतपणे बोलुन दाखवले, आणी कुणी हे बोलत असेल तर थंड डोक्याने समजुन घेतलं तर मोठे प्रश्नसुद्धा चुटकीसरशी सुटु शकतात.

सहमत. वाफेला वाट मिळालेलीच बरी.

पण ते माफी वगैरे जरा जास्तच होतं कधी कधी. समोर कोण आहे, आपले त्याच्याशी संबंध कसे आहेत. नात्यांची वीण किती घट्ट आहे त्यावर निर्णय घ्यावा ज्याचा त्यानं माफी मागायची की नाही त्याचा. नाहीतर माफी मागण्याच्या अहमहमिकेत अजुनच तापातापी होऊ शकते.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

बरोबर आहे, तुमचे

बरोबर आहे,

तुमचे म्हणे...

आलेला हा अनुभव तर राव लैच वाईट Sad

असो,

आम्ही आमच्या बाजूने विषय संपवला !

माझे मन शांत झाले ह्यात देव पावला........... बाकी सगळे गंगेला मिळाले.

**

पण, जेव्हा एखादा हात पुढे जातो तेव्हा समोरुन पण तसा एखादा हात पुढे आला तर मज्जा असते.........

*

काहींनी ह्या माफीनाम्याचा गैर अर्थ घेतला आहे..... तो त्यांनाच लखलाभो...
क्षमा समर्थ व्यक्तीच्या हाती शोभते असे वाक्य शाळेत शिकलो होतो ते आठवले



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे एक एस एम एस आठवला

बघ आवडतो का?
" मी खुप हुशार होतो आणि म्हणुन मी जग बदलायाचा प्रयत्न केला
आत्ता मी शहाणा झालो आहे आणि मी स्वतःला बदलयाचा प्रयत्न करतो आहे"



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

छान

छाण सुविचार



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+ १ सहमत आहे.

+ १

सहमत आहे.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान सुविचार अगदी याच

छान सुविचार
अगदी याच परिस्थितीतून जात आहे सध्या...



__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

खलः सर्षपमात्राणि

खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||
अर्थ = दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे दोष मोहोरी एवढे असले तरी पाहतो. [नावे ठेवतो] पण आपले दोष बेलफळा एवढे असले तरी दिसत असूनही न पहिल्यासारखे करतो..

म्हणतात ना ". क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।"
म्हणूनच क्षमाशिलता आणि विनय अंगी बाणवेन मी, वरचा श्लोक मी माझे वागणे दाखवण्यसाठी लिहीला आहे, कृपया गैरसमज करू नयेत. कोणाचाही अवमान अथवा अनादर मला करायचा नाही. माझे काही चुकले असेल तर मोठ्या मनाने क्षमा कराल ही अपेक्षा.

सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||

अर्थ
ह्या [जगामध्ये] सर्वजण सुखी राहोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे खूप कल्याण होवो. कोणालाही दुःख भोगायला लागू नये.

छान प्रकटन रे.. तात्या.

छान प्रकटन रे..

तात्या.



खरय रे मित्रा. बरेच वेळा

खरय रे मित्रा.
बरेच वेळा "चुकलो मी" हे दोन शब्द उचारायच्या आधी अहंकार आड येतो. आणि मग दुरावा/तेढ वाढत जातो.
त्यामुळे सवतःच्या अहंकारावर विजय मिळवुन माफी मागणारा हा माफ करणार्‍या पेक्षा मोठा.



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

ह्म्म्म

त्यामुळे सवतःच्या अहंकारावर विजय मिळवुन माफी मागणारा हा माफ करणार्‍या पेक्षा मोठा.
असे वाटते खरे, पण कुणी आपली एखाद्या अक्षम्य चुकीची मनापासून माफी मागितली, तर खरेच आपणही मनापासून माफ करू शकू काय?? मनात अजिबात तेढ न बाळगता माफ करणं हे मला वाटतं जास्त कठीण आहे. किंबहुना, जो मनापासून माफ करू शकतो, तोच मनापासून माफी मागू शकतो असे वाटते.
एक कोडे -
काचेच्या तडकलेल्या तावदानाला कितीही बेमालूमपणे जोडायचा प्रयत्न केला तरीही थोडीशी फट का होईना राहतेच.. तसे मग मनापासून माफ करणे शक्यच होणार नाही का?
मला पटणारे उत्तर -
काचेच्या तडकलेल्या तावदानाला आचेने गरम केले व परत तावदान जमवले तर फट राहत नाही.. तद्वतच, माफी मागणार्‍याच्या पश्चात्तापाची आच व माफ करणारर्‍याच्या प्रेमाची आच यांचा संगम झाला तर दोघांच्याही मनरूपी तावदानावर भेग दिसणार नाही! हास्य

असो. मनापासून माफी मागणे अन् मनापासून माफ करणे ह्या दोन्हींची तुलना होऊ नये.. उलट संगम व्हावा अन् कटुता नाहीशी व्हावी हे सर्वात योग्य!

(मनापासून माफ करणे अजुनही न जमलेला) राघव

खरे आहे. माफ करणे हे फार अवघड

खरे आहे. माफ करणे हे फार अवघड असते.

टारुने तर गुत्तुडा मस्तच

टारुने तर गुत्तुडा मस्तच लिहिले आहे, पण हे प्रकटनही सुरेख आहे.

छान लिहीले आहे राजे.

छान लिहीले आहे राजे. पण
"नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |
गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||"

याचा अर्थ ही टाका ना मग!




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान लिहिलंय रे राज्या. @

छान लिहिलंय रे राज्या.

@ पाभे :

"नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |
गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||"

रूप(व्यक्तिमत्त्व) हा मनुष्याचा अलंकार आहे. गुण हा व्यक्तिमत्त्वाचा अलंकार आहे. ज्ञान हा गुणाचा अलंकार आहे आणि क्षमा हा ज्ञानाचा अलंकार आहे. असा सरळ अर्थ. खोलवर विचार केल्यास, मनुष्याकडे क्षमा (करण्याची मानसिक ताकद) नसल्यास रूपडं, सद्गुण आणि ज्ञान हे अलंकार काय कामाचे?
हास्य

मस्त रे मेव्या, एकदम शाळेची

मस्त रे मेव्या,
एकदम शाळेची आठवण झाली, वर्गात बसल्या सारख वाटल. हास्य



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

छान लिहिलय रे

मोठ मन आहे तुझ.. असाच रहा

राज्या, स्तुत्य प्रयत्न

राज्या, स्तुत्य प्रयत्न रे.....

प्रामाणिक!

प्रामाणिक प्रकटन!
स्वाती

वाचुन मनातले मळभ दूर

वाचुन मनातले मळभ दूर झाले!
धन्यवाद राजे. हास्य