१५०० अब्ज डॉलर !

0
0

मंदीने अमेरिकेचा गळा काय आवळला, अमेरिका एकदम जमीनीवर आली, आपल्या पैशाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ओबामा ने अनेक पाऊले उचलायला सुरवात केली व त्याच बरोबर भारतात सार्वजनिक निवडणूकीचे वारे वाहू लागले होते, व ओबामाला एक महत्वाचा मुद्दा कळाला जो मुद्दा भारतात राजीव गांधीच्या बोफोर्स लफड्यापासून शेबंड्या पो-याला ही माहीत आहे तो म्हणजे स्वीस बॅंकेतील काळा पैसा !

मंदीवरील एक उपाय म्हणून ओबामाने स्विस बैंकेमध्ये असलेल्या अमेरिकन खात्यांची माहीती मागवण्याची चाल खेळली, थोडासा दबाव टाकून स्विजरलैंड ला मजबूर केले की लिस्ट जाहीर करण्यासाठी. खरं तर गेली चारशे वर्षापासून स्विजरलैंड मध्ये गुप्त बैंक खात्यांची सुविधा आहे जी त्याकाळातील माफिया व गुन्हेगारांचा पैसा जमा करण्याची एकमेव म सुरक्षित जागा होती व बैंकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या खात्याची माहीती कुणाला ही मिळत नसे. पण मंदीमुळे व अमेरीकेच्या व तसेच बाकीच्या देशांच्या दबावापुढे बळी पडून स्विजरलैंड ने स्विस बैंकेतील खात्यांची माहीती जगासमोर उघडी केली.

त्या माहीतीमुळे अमेरीकेत भुकंप झाला की माहीत नाही पण भारतात मात्र सर्व सामान्यांचे डोळे फिरावेत व श्वास थांबावा असा हाल झाला, जगामध्ये सर्वात जास्त काळा पैसा स्विस बैंकेत कुठल्या देशाचा असावा तर तो देश आहे भारत, हो आपलाच महान भारत ! जेथे सचोटीने, सत्यांने, देशप्रेमाने भारावलेले काही वेडे देशाच्या आझादीसाठी अगदी मागे नाही साठ एक वर्षापुर्वी आपले जिवन त्यागले.. त्यांचा आत्मा क्लेषाने रडत असेल की काय करण्यासाठी आम्ही स्वातत्रं लढा दिला व काय झाले !

१५०० अब्ज डॉलर !

एवढा पैसे ! थांबा जरा हे वाचून कळणार नाही हा आकडा काय आहे, भारतावर जागतीक बँकेचे फक्त १५५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे, हे कर्ज मुक्त होण्यासाठी १५ वर्षाचा कालावधी लागेल सध्याच्या प्रगती नूसार ! समजले किती पैसा आहे जो धुळ खात पडला आहे. जर हा सर्व पैसा भारतात आणला तर भारतावर कुणाचे ही कर्ज राहणार नाही उलट तो पैसा जर भारतात वापरला गेला तर त्या पैसातून भेटणा-या फक्त व्याजानेच दर वर्षी २५-३० जिल्हे पुर्ण विकसीत करता येतील ! देशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल काही वर्षामध्ये एवढा आफाट पैसा आहे हा !

पण कुठला ही राजकिय पक्ष ह्या विषयी ब्र सुध्दा काढत नाही आहे ? ह्याचे काय कारण असावे ? साधे सोपे कारण सर्वांचाच पैसा आहे ह्यामध्ये, नेता, अभिनेता, व्यवसायीक सर्व जणांचा हा काळा पैसा, सामान्य जनता आपल्या रक्ताने देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काबाडकष्ट करते व जे हारामखोर हाच देशाचा पैसा त्या स्विस बँकेत जमा करतात व देशाचे वाटोळे करतात, जर हाच पैसा भारतात राहिला असतात तर सध्या आपण विकसित देश असलो असतो ना की अविकसित तिसरी दुनिया !

तुम्ही विचार कराल त्या काय एवढे बाकी देशाचा पैसा पण तेथे असेलच ना !
जरा पहिल्या पाच ची लिस्ट बघा मी काय म्हणतो आहे ते कळेल.

१. भारत - १५०० अब्ज डॉलर.
२. रशिया - ४७० अब्ज डॉलर.
३. ब्रिटन - ३९० अब्ज डॉलर.
४. युक्रेन - १०० अब्ज डॉलर.
५. चीन - ९६ अब्ज डॉलर.

आपल्या खालच्या सर्वांची रक्कम आपल्या काळ्या पैसाच्या अर्धीपण नाही आहे Laughing out loud काय विनोद आहे नाही ! हसावे का रडावे हेच कळत नाही आहे.

अमेरिकेने दबाव टाकून हा आकडा बाहेर काढला व आता त्यांनी दुसरा दबाव टाकून त्यांच्या देशातील खात्यांची पुर्ण माहीती व मालकांची माहीती मागवली आहे व त्यांना ती मिळाली सुध्दा असावी आता पर्यंत. जर भारतात खरोखर असा एक ही पक्ष आहे जो म्हणतो की आम्ही योग्य तो दबाव टाकून तो सर्व काळा पैसा भारतात परत आणू त्यांनाच माझे मत, त्या शिवाय मी मतदान करणारच नाही उलट जे करत आहेत त्यांना पण माझे हेच सांगणे की बाबा रे ह्यांचा वर दबाव टाकण्याची आपल्या कडे पाच वर्षातून एकदाच संधी येते, त्यांनंतर आपण त्यांचे बिगारी मजदुर आहोत, ह्यांचे नाक दाबा, मतदान करु नका, काय होईल ? देशाचे अजून ४०-५० अब्ज डॉलर ह्या नाटका पायी खर्च होतील होई देत पण ह्यांना जनतेची ताकत तरी कळेल. जनतेनेच जर ह्यांना नाकारले तर ह्यांना जन्मभराची अक्कल मिळेल की काही कर पण देशाचे वाईट चिंतले की जनता फाट्यावर मारेल !

जय हिंद !

भाजपचा समस

भाजपचा समस आला आहे कि ते (त्यांच सरकार आले तर) ही सगळी लफडी - कुलंगडी बाहेर काढतील म्हणून, पण...

प्रत्यक्षात ते तस करतील अशी अजिबात म्हणजे अजिबात अपेक्षा नाही.

Democracy is a device that ensures we shall be governed no better than we deserve.
George Bernard Shaw



_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

पडद्यामागचे व पडद्यापुढचे...!

लेखातील विचार मला तरी समर्थनीय वाटत नाहीत. ह्या देशात काळा पैसा तयार होतो त्याची कारणे समजून घेवून, त्यांचा पद्धतशीर आभ्यास करून अशा काळ्या पैश्याच्या निर्मितीवरच आळा कसा घालता येईल याचा विचार केला जायला हवा.

स्वीस बँकेतून सहजपणे तेथील खात्यामधले पैसे आपल्या देशात आणणे नक्कीच सोपे व योग्य नाही. सरकारी पातळीवर खातेदारांची नावे मागून घेवून त्या खातेदारांना ते पैसे परत भारतात आणण्यास सांगणे हाच मार्ग सनदशीर वाटतो.

ज्यावेळीभारतीय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून 'वरूण गांधी' हे प्रकरण लवून धरले होते त्याकडे दुर्लक्ष व्हावे ह्यासाठी भाजपाने/ लालकृष्ण आडवाणी यांनी ही बातमी जाहीर करून व मागणी करून विरोधी हवेची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला.

मला

मला स्वतःला देखील असेच वाटत आहे, कोणीच काही करणार नाही, मतांसाठी ह्याचा उपयोग होईल व नंतर सर्वकाही शांत.

सचिन - द ग्रेट 8)

माझ्या

माझ्या मनात ही हेच आले वाचताना Sad

या बातमीचे नन्तर काय

या बातमीचे नन्तर काय झाले.
सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांपैकी कोणीच काही पाठपुरावा केला नाही.
कोण्या नागरीकाने त्यावर माहिती सुद्धा विचारलेली नाही.
ही बातमी खरी होती की बाजारगप्प.
आणि समजा हे तथाकथीत १५०० अब्ज डॉलर भारतात आणले तर भारताची क्रयशक्ती वाढेल? चलनफुगवटा वाढेल? की मग सध्या निधी अभावी रेंगाळलेल्या वीज निर्मिती / रस्ते निर्मिती / शिक्षण / आरोग्य वगैरे अनेक योजना सरकार हाती घेईल?



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अर्थक्रांती

खालील लिंक बघा. अर्थक्रांती
अवघड आहे पण अशक्य नाही...



नानू (सरंजामी नसलेला)

१५०० अब्ज

हा विषय पुन्हा उकरुन आपल्याला काय साधायचे आहे. पैसे ठेवणारे ठेवतात. त्यांचे काहीही वाकडे होत नाही, उगाच आपण "तळतळुन " काय फायदा ? आपण आपली "झोप " का खराब करायची ?