एका मजेशीर भांग-प्रकरणाची लज्जत

0
0

एका मजेशीर भांग-प्रकरणाची लज्जत
भंग का रंग जमा हो चकाचक...


'काय मज्जा येतेय' करता करता गरगरायला लागले. भिती वाटायला लागली. . दोघींनी बेडवरून आरोळ्या मारायला सुरवात केली.
'आता आम्ही चाललो ...वर... मुलांना साभाळा'
'आता काही परतत नाही'. त्या जणू आकाशात १०० फूट तरंगत होत्या असे त्यांना होत होते.
'अहो मुलांचा नीट साभाळ कराल ना'. अशा हाका येऊ लागल्या. साने पतंग जसा मांजाने खेचतात तसे हातवारे करत, काही काळजी नका. आम्ही आमचे बघून घेऊ. तुमच्या पश्चात'. असे चेष्टेनी खिजवत होते.
एकमेकींना गळ्याची शप्पत घालून पुन्हा भांगेच्या वाटेला ना जाण्याच्या अनेक आणाभाका झाल्या. नंतर साने एका बेडवर जे आडवे झाले ते घोरत लंबेलाट. मीच तो काय जसा सा
वरलेला होतो. मला ब्रहमांड आठवले. कारण दुसऱ्यादिवशी ऑफिसमधे माझे मोठे प्रेझेंटेशन होते.त्यात गफलत होणे म्हणजे प्रमोशनवर गदा असा पेच होता.


वाटते तो सन १९८४-८५ चा काळ असावा...

ती होती जनकपुरी दिल्लीच्या होळीची मजा. त्यावेळी मी हवाईदलातील वेस्टर्न कमांडच्या पोस्टींगवर होतो. कॅम्पात घर मिळायला फार वेळ लागे म्हणून आम्ही एका भाड्याच्या बंगल्यात राहात होतो. जनकपुरीतील सी-२ ब्लॉक मधील 'दत्त-विनायक मंदिर' तेथील मराठी लोकांसाठी एक सांस्कृतिक व धार्मिक आकर्षणाचे केंद्र होते. मंदिराचे पुजारी उत्तर भारताच्या भागातून आलेले मराठी असल्याने महाशिवरात्री नंतर होळी पर्यंत भांगेचा गोळा तयार करायला ते लागत व मोजक्या लोकांसाठी भांग घोटून सेवनाचा कार्यक्रम साजरा होत असे.

अशाच एका होळीला.... सर्वांना गायनाचा मूड आला होता. ४-६ जणांनी मराठी फिल्मी गाण्यांनी सुरवात केली व होता होता भावगीते, गझला कव्वाल्यांना पेटीवरल्या बोटांनी सुरांशी जमवून घ्यायला सुरवात केली ..
.. अस्मादिकांना गोळी तुफान चढली. त्यातच ईमरती व अन्य गोडधोड पदार्थांनी जरा जादाच चढली... बाहेर रंगांची रंगारंग धमाल चालली होती. मंदिराच्या आवारात आम्ही गाणी म्हणता म्हणता... इतरांना रंगांनी रंगवत, 'होली है' म्हणतानाची रंगत भांगेच्या प्रभावाने उत्साही होत होती...
घरात आलो ते, टघेई छंद मकरंद म्हणतच'. मग ...'सर्वात्मका सर्वेश्वरा'... नाट्यगीतातील खोल अर्थ कळल्याची अनुभूती झाली. मधुरगीते स्टीरिओवर फुल आवाजकरून ऐकताना पोरे भांबावली...
कहर तर नंतर झाला. म्हणजे मावळणकर हॉलमधील टपुल व सुनीताबाईंचाट - बोरकरांच्या कविता - गायनाचा आस्वाद लुटायला त्या तंद्रीतच मी२०-२२ किमी कधी पोचलो व परतलो कळले नाही.त्यावेळी प्रेक्षकातून फक्त माझी 'वा-वा', - 'बहोत खूब' - ची दाद फार दणक्यात गुंजत होती असे भासत होते. तो असर पुढे दोन दिवस होता. आनंदाचा माझा तो मूड पाहून सौ. अलकाने ठरवले की आपण एक भांगेची पार्टी करू या. झाले ठरले...

उत्साही साने कुटुंबिय त्यांच्या दोन मुलांसह, परांजपेद्वय, आमच्याकडील चिन्मय व नेहा व आम्ही दोघे. आमच्या घरात घाट घातला गेला. वाटण-घाटण करत करत दुपारचे १२ वाजले. मुलांना ठंडाईचे गिलास हाती दिले. खसखस घातलेली ठंडाई मुलांना चढली. ती घरभर २-३ तास लपाछपीच्या खेळात रंगली. दुपारचे रणरणते ऊन. त्यात 'चियर्स' करून भांगेचे ग्लास फस्त करून अलका व मृणाल एकदम तर्र झाल्या. लवकर घरी जातो म्हणून परांजपे लगबगीने सटकले.

'काय मज्जा येतेय' करता करता गरगरायला लागले. भिती वाटायला लागली. . दोघींनी बेडवरून आरोळ्या मारायला सुरवात केली.
'आता आम्ही चाललो ...वर... मुलांना साभाळा'
'आता काही परतत नाही'. त्या जणू आकाशात १०० फूट तरंगत होत्या असे त्यांना होत होते.
'अहो मुलांचा नीट साभाळ कराल ना'. अशा हाका येऊ लागल्या. साने पतंग जसा मांजाने खेचतात तसे हातवारे करत, काही काळजी नका. आम्ही आमचे बघून घेऊ. तुमच्या पश्चात'. असे चेष्टेनी खिजवत होते.
एकमेकींना गळ्याची शप्पत घालून पुन्हा भांगेच्या वाटेला ना जाण्याच्या अनेक आणाभाका झाल्या. साने एका बेडवर जे आडवे झाले ते घोरत लंबेलाट. मीच तो काय जसा सावरलेला होतो. मला ब्रहमांड आठवले. कारण दुसऱ्यादिवशी ऑफिसमधे माझे मोठे प्रेझेंटेशन होते.त्यात गफलत होणे म्हणजे प्रमोशनवर गदा असा पेच होता.

सारखी घड्याळाकडे नजर जाऊ लागली. बराच वेळ झाला असे वाटून पुन्हा पहावे तर सेकंदाचा काटा फक्त ५-६ सेकंद सरकला होता असे वाटू लागले. मनावरचा ताबा सुटण्याच्या आत काही हालचाल केली तर निभाव वागेल असे वाटून घाम फुटला. वेळीच सावधपणे कोणालातरी सांगून वैद्यकीय मदत मागवण्याची व्यवस्था करावी असे वाटून मी तडक पायात चप्पल आडकवली व आमच्या घरासमोर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या विग कमांडर बाबूकडे गेलो.

'टींग-टाँग' 'टींग-टाँग' करत दारावर बेल वाजतच राहिली.
'क्या है?' करत लुंगीत बाबूसाहेबांनी मला पाहिले. असा अचानक न सांगता कसा असा त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखत मी त्याला सारी कल्पना दिली.त्यालाही चढली आहे असा मला उगीचच भास झाला. मलाही चढलेली आहे असे मी आवर्जून सांगितले.
'नो प्रॉबलेम', 'डोंट वरी', असा सिनियारिटीचा आव आणत त्याने मला घसघशीत धीर दिला. 'मी इथे असताना काही चिंता नको' असे त्याने तोंडभर आश्वासन दिले.पटकन दरवाजा बंद करून घेतला.
'ओके, ओके' करत मी घरात परतलो. घराचा दरवाजा धाडकन बंद होताना बाबूच्या तोंडावर आपटला. मी सटपटलो. 'माझ्या दारात तु इथे कसा' असे मी म्हटले.
तो तोंडावर बोट ठेऊन म्हणाला, 'रेकी करायला आलो. कितपत सीरियस मामला आहे'. महाशयाचा मूड काही और वाटला...
'ओके ओके' करत तो परतला. रस्ता ओलांडून वरच्या मजल्यावर पोचला. त्याने घराचा दरवाजा बंद करायला व मी त्याच्या पाठीला धक्का द्यायला एकच गाठ पडली.
'तू क्याकर कहा है?' आता तो चकीत व्हायची वेळ होती.
'मेरी चप्पल..' करत मी आत गेलो. तो त्याच वेळी एक जण सोफ्याच्या खालून बाहेर येत होता. मी डोळे विस्फारून म्हणालो, 'ये कौन? यहा क्या कर रहे है?
हातात रंगित पाण्याची बाटली धरलेल्याकडे पहात, कडवट तोंड करत बाबू म्हणाला, 'मीट माय हाऊस ओनर'. पंत चांगलेच तरंगत होते.
'ओके, ओके' करत मी काढता पाय घेतला.

दोघीना अती होऊन झोप लागली. मुलांचे पाय सारखे सारखे तिसऱ्या मजल्यपर्यंत
धाऊन धाऊन थकले. मी विंग कमांडर बाबूच्या कडील प्रकार पाहून चक्राऊन गेलो व अती श्रमाने पेंगळलो.
असेच काही तास गेले. मुलांना अती तहान लागली म्हणून त्यांनी फ्रिज मधील बाटल्याच्या बाटल्या फस्त केल्या. संध्याकाळी दूर दर्शनवर 'जंगली' सिनेमा चालू झाला.
'चाहे कोई मुझे जंगली कहे' म्हणून 'या....हू....' अशी मोठ्याने आरोळी ठोकावीशी वाटली. तो दिवस धुंदीचा मस्तीचा होता.
विंग कमांडर बाबू त्याच्या घरमालकाबरोबर पकडला गेला म्हणून त्याने ही माझ्या भांग प्रकरणाची बकबक कुठे केली नाही. आज मी मराठीवर हे डकवताना एका मजेशीर भांग-प्रकरणाची लज्जत पुन्हा अनुभवता आली.

(विषय दिलेला नाही)

1

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

मी अजुन कधिच हा प्र्कार चाखला

2

Big smile मी अजुन कधिच हा प्र्कार चाखला नाहिये

चुचु भांग घेतली की केस पण सरळ

3

चुचु भांग घेतली की केस पण सरळ होतात, एकदा चाखुन बघ.

एक दोनदा केला प्रयत्न.....

4

पण ही नशा काही झेपली नाही. तुमचा अनुभव वाचुन तेव्हा मी काय काय केलं असावं याचा अंदाज आता येतोय.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मस्त

5

मस्त हास्य

छान !! मी एकदा शिवरात्रीला

6

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

छान !!

मी एकदा शिवरात्रीला भांग घेत्ली होती ....काहीही झाले नाही ..त्या दिवशी अगदी घरीसुध्दा सगळ शातच होत ....कारण मी शेजारच्याच घरात जाऊन,त्यांच्या खाटेखाली.त्यांच्या नकळत मेल्यासारखा झोपलो होतो...दिड दिवसांनी बाहेर आलो तोवर घरच्यांनी पोलीस तक्रार केली होती ...

हा हा हा

7

हा हा हा

(विषय दिलेला नाही)

8

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्तच , मला पण एकदा ट्राय

9

मस्तच Laughing out loud , मला पण एकदा ट्राय करायचीय Oups ...


पुष्करिणी

देव बाकीच्यांचे भले करो

10

देव बाकीच्यांचे भले करो Grade


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

भन्नाट! कशी असते हो भांगेची

11

Laughing out loud भन्नाट!
कशी असते हो भांगेची चव?

ताकासारखी ! * आबंट / तुरट

12

ताकासारखी !

* आबंट / तुरट करणार्‍यावर अवलंबून आहे... काही जागी गोड पण करतात wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्ह्ह्म्म्म्म्म खूप्च ज्ञान

13

ह्ह्ह्म्म्म्म्म खूप्च ज्ञान दिसतय

मी पण भांग प्याली होती. ती

14

मी पण भांग प्याली होती. ती जरा तिखट लागत होती. मिरे, बदाम वगैरे होते त्यात वाटून घातलेले. पण मला काहिच झाले नाही. तंबाखू खाण्याच्या सवईमुळे असेल असे काही तज्ञांनी सांगितले. हास्य


-पुण्याचे पेशवे

पुन्हा असं करु नका!!!

15

पुन्हा असं करु नका!!!


पोपटराव

एकदा प्यायची ईच्छा आहे

16

बघुया कधी योग येतोय??

भांग पिणे - चांगले का वाईट

17

भांग पिणे - चांगले का वाईट ?

मित्र हो ,

हवाईदलात अनेक अनुभव येतात. घ्यावे लागतात. त्यातूनच सैनिकांची युद्धाला सामोरे जाण्याची मानसिकता बनते. युद्ध ही शिष्टाचार संम्मत गोष्ट नाही. विचार संपतात तेथे शस्त्र हाती येते.
भांग किंवा कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट या दोन पारड्यात घालून पाहू नका. नशा आणणारे सर्व पदार्थ चवीला नेहमीच तोंड वाकडे करायला लावतात. संयमाने व सीमित कुठलीही गोष्ट चांगले परिणाम करते. अति नेहमीच घातक. असा माझा अनुभव.


नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक

१००% खरं !

18

१००% खरं !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."