स्वरालयीची दुनिया..५


सखी ये री आली.. (येथे ऐका)

सखी ये री आली पिया बिन...

यमन रागातली ही पारंरिक बंदिश..हिंदुस्थानी रागसंगीताचा बादशहा राग यमन..!

यमनबद्दल काय बोलावं, काय लिहावं? सारे शब्द तोकडे पडतात! प्रसन्नता, प्रासादिकता म्हणजे यमन. माणसातलं माणूसपण म्हणजे यमन, चांगुलपणा म्हणजे यमन, माणुसकी म्हणजे यमन, हळवेपणा म्हणजे यमन, संवेदनाशीलता म्हणजे यमन! कुणा सुहृदाने पाठीवरून प्रेमानं फिरवलेला हात म्हणजे यमन, यमन म्हणजे राम, यमन म्हणजे कृष्ण, यमन म्हणजे साक्षात परब्रह्म!

ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं, ज्याला यमन कळला त्याला गाण्यातलं मर्म कळलं, ज्याने यमन ऐकला तो आयुष्य जगला, ज्याने यमन ऐकला त्याचा मानवजन्म सार्थकी लागला!

आपल्या रागसंगीतातले राग हे ऋषिमुनींनी निर्माण केले असं म्हणतात.. ज्या कुणा ऋषीला, ज्या कुणा मानवाला यमनची स्वरसंगती सुचली त्याची मानसिक अवस्था किती उन्नत असेल!

संजीवने ही बंदिश अगदी साधी सुंदर गायली आहे, छान गायली आहे...

'दिसामाजी काहीतरी लिहीत राहावे' याच चालीवर 'दिसामाजी एकदा तरी यमन ऐकावा' असं म्हणावंसं वाटतं!

-- तात्या अभ्यंकर.

No votes yet

राजे's picture
गाणे कसे ओळखावे कुठल्या रागात

गाणे कसे ओळखावे कुठल्या रागात आहे ते ?

ह्या बदल काही लिहावे तुम्ही.... साहेब.


निर्मयी's picture
+१.

+१.


पुण्याचे पेशवे's picture
छान. यमन मलाही आवडतो. ऐकायला.

छान. यमन मलाही आवडतो. ऐकायला.


-पुण्याचे पेशवे

मितान's picture
मलाही यमन आवडतो. या रागातली

मलाही यमन आवडतो. या रागातली चित्रपटगीतेही आवडतात.
विशेषतः ममता मधलं ' छुपा लो यु दिल मे प्यार मेरा ' लता,हेमंत कुमार.

मुकेशचं 'चंदनसा बदन'....

तुम्ही दिलेली ही बंदिश आणि संजूदादा ! व्वा !


जोवरी सुचते पावसाचे गाणे, हिरमुसवाणे व्हावयाचे नाही !