ज्येष्ठ गायक गजानन वाटवे यांचं निधन
आपल्या बहारदार आवाजानं अनेक मराठी गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ गायक गजानन वाटवे यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.
गायनातला फडफडता जरिपटका, अशी गजाननरावांची ओळख होती. भावगीत प्रांतात गायक व संगीतकार गजानन वाटवे यांचा उदय झाला आणि मराठी भावगीतांचा ‘ वारा फोफावला ’ . सुस्पष्ट उच्चार , संस्कारित भाषा , स्वरभावनेचा ओघवता आविष्कार यामुळे ' वाटवेयुग ' निर्माण व्हायला वेळ लागला नाही. यांच्या गीतामध्ये आलापीचा भाग कमी होऊन शब्दप्राधान्य वाढले. सूर आणि अक्षरे जवळजवळ समान झाली. ' गगनी उगवला ' पासून ' बापूजींची प्राणज्योत ' पर्यंत सर्वच गाणी रसिकमनात ठसली. संगीतकार यशवंत देवांनी एका कार्यक्रमात ' वाटवे इज गेटवे ऑफ मराठी भावगीत ' अशी सुंदर दाद दिली होती.
गर्जा जयजयकार क्रांतिचा, गाऊ त्यांना आरती, यमुनाकाठी ताजमहाल, दोन ध्रुवांवर दोघे आपण, राधे सैल तुझा अंबाडा, वारा फोफावला, अशी एक ना अनेक गाणी गजानन वाटवे यांच्या आवाजानं बहरली.
माहीती व छायाचित्र महाराष्ट्र टाईम्स द्वारे.

.jpg)
विनम्र
विनम्र श्रद्धांजली...
विनम्र
विनम्र श्रद्धांजली...
आदरांजली !!
आदरांजली !!
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन