पुप्याचा २४ कॅरेट वाढदिवस

0
0

दुपारी १:३० वाजता अचानक फोन खणखणतो. लॅपटॉप मधे खुपसलेले डोके उपसुन बघतो तर ह्यावेळी फोन म्हणुन विस्मयचकित.
"आज संध्याकाळी काय करतोयस रे?" तिकडुन प्रश्न.
"आज सोमवार आहे ना, मग संध्याकाळी वातावरण बघुन भातावर वरण घेउन टीवी बघत झोपी जाण्याचा विचार आहे." माझं उत्तर.
"अरे आज पुप्याचा वाढदिवस आहे, संध्याकाळी प्यार्टीचा प्लॅन आहे.७:३० ला २४ कॅरेट ला ये". प्रतिसाद.
काम टाळुन लवकर पोहोचण्यासाठी सैतानी डोकं काम करु लागलं आणी उपाय २ सेकंदात सुचला.
बंड गार्डन पासुन मनपा पर्यंत गाडी चालवताना वैतागलेलं मन नदीकाठचा रस्ता गाठताच प्रसन्न झालं, पावसामुळे झालेली आणी ती पहायला जमलेली हिरवळ पहात मंद वेगात म्हात्रे पुलाजवळ गाडी पोहोचली. २४ कॅरेट शोधत कोहीनुर हिरा शेवटी सर्वांच्या आधी पोहोचला. टेबल चांगल्या जागी लावण्याची कामगिरी सोपविली गेली. एक फ्रेश लाइम सोडा मागवला आणी सिगारेट सुलगावुन एक एक झुरका घेत शांतपणे आजचा कट्टा कसा होइल याचा विचार करत होतो तेवढ्यात पहिली व्यक्ती, एका अनोळखी व्यक्तीला घेउन समोर येउन "एक व्होडका आणी एक रम चा निप आणरे" (दुसरं कोण, प्रसन्नदा) म्हणत समोर येउन बसली. नविन व्यक्तीची ओळख झाली.
विमो - विवेक मोडक - ३०-४०तले तरुण (केस पांढरे असले तरी) असे हे विमो आल्यावर शांत होते.(फक्त सुरुवातीलाच) असो, wink
आजच्या कट्ट्याचे महानायक पुपे काजु रोल घेउन आले आणी सर्वांच तोंड गोड करत "मी आज १६ वर्षांचा झालो" असं सांगत २८ ईंचाच्या खुर्चीवर एकटेच विराजमान झाले. तेवढ्यात "हॅप्पी बड्डे दादा असं म्हणत राजे पुपेच्या मांडीवर जाउन बसला." एक चॉकलेट दिलं तेव्हा मांडी सोडली एकदाची. असो, चालायचचं.
मग नटसम्राट श्रामो, दामोदर पंत (यांची ओळख सर्व जण "मिंटीचा नवरा" अशी करुन देतात.) दत्ता काळे आणी पहिल्यांदाच आलेले डॉ. अशोक कुलकर्णी सर्वांच्या ओळखी पाळखी झाल्या.

आता काय, मराठी माणसं, त्यात संकेतस्थळावरची, काय होणार. हास्यफुफाटा. Laughing out loud

नको नको त्या कोट्या, विनोद, पायखेची, गळचेपी, हिंदु धर्माच्या उगमापासुन हातभट्टी दारु कशापासुन आणी कशी बनवावी इथपर्यंत चुपक्रमापासुन मिमचा आधार घेउन चर्चा (?) झाली.

"पण मी काय म्हणतो?", "ए राजा", "अरे एक बीयर आणी एक रम ची ऑर्डर द्या रे", "हे पुस्तक तु विकत घ्यावस?", "अल्कोहोलिक कोण, तर जो फिजिशिअन पेक्षा जास्त पितो तो", "हाहाहाहाहाहा", "सुहाश्या फोनवर पुप्याशी बोलतोय" असं काहीतरी चालु होत ब्वॉ.

मग पुप्याचे आवडते सर त्याची आतुरतेने वाट बघत होते म्हणुन पुप्याने वीस एक सिगारेटी कशा बशा संपवल्या, आणी त्याला सर्वांनी सरांकडे सरकवला.
कुणीतरी शिंगावर गंगावन कसे लावावे याची गहन चर्चा करत होते, इतिहास कच्चा असल्याने मी आपली बीयर रिचवत मोका मिळेल तिथे विनोदाचा चौकार मारण्यात लक्ष देत होतो. त्यात दामोदर पंतांनी अस्सल पुणेकर कोण याच्या जाज्वल्य पुणे-३० गमती सांगितल्या, डॉक्टरही सामिल झाले. राजेंनी नेहमीप्रमाणे वरिष्ट, अपेक्षाचा आक्षेप करत रॉयल स्टॅगचा रॉयल पेग बनवला आणी अपेक्षा चा अक्षेपा केला. प्रसन्नदा मधुनच १०-१० मिनिटांसाठी गायब होत होते.

हळु हळु गर्दी कमी होत होती. आम्हाला वाढणारे वेटर आम्च्याच बाजुच्या टेबलावर बसुन जेवण करत होते. प्रसन्नदांनी छत्तीसशे सत्तराची कहाणी सुफळ करत मी क्रेडीटकार्डरुपी सम्पुर्ण केली आणी टेबल सोड्ला. बाहेर गप्पा सुरु होत्याच तेवढ्यात पुन्हा फोन खणखणला.
"बाळा, १२ वाजले, येतोस ना?" - आमच्या मासाहेब.
ममतेची माया हाक मारु लागली, घरी पोहोचलो, आई शांतपणे झोपी गेली आणी तिला झोपी गेलेली पाहुन मला पण आता शांत झोप लागेल असा विचार करत हा लेख लिहिला. हास्य

आयुष्य कदाचित हेच असावं. कधी अनोळखी व्यक्तींना भेटावं, त्यांना सु़ख, दु:ख वाटावं, निसर्गाच्या हातात हात द्यावा, कधी दोन पेग घेउन थोडं झुलाव, कधी निद्रादेवीच्या कुशीत शांतपणे निजावं.

आणखी काय हवं? wink

आपला,
मराठमोळा

मस्त

1

वा, वा, पुप्याचा २६ कॅरेटी... आपलं २४ कॅरेटी वाढदिवस दणक्यात साजरा झालेला
दिसतोय हास्य

आयुष्य कदाचित हेच असावं. कधी अनोळखी व्यक्तींना भेटावं, त्यांना सु़ख, दु:ख वाटावं, निसर्गाच्या हातात हात द्यावा, कधी दोन पेग घेउन थोडं झुलाव, कधी निद्रादेवीच्या कुशीत शांतपणे निजावं.

आणखी काय हवं

?
--- क्या बात है!

शेम

2

शेम असच म्हंतो.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+१

3

+१

अक्षरश: धन्य झालो. माझ्या

4

अक्षरश: धन्य झालो. माझ्या सर्व मित्रांनी माझ्याप्रेमापोटी एक्तत्र जमून मला आनंदाचे ४ क्षण दिले त्याबद्दल फार छान वाटलं. (हुश्श! कस्लं साहित्यिक वाक्य लिहीलं आहे)

मोळ्या छान लेख रे मस्तं. फक्त २६ ऐवजी चुकून १६ पडलं का रे?


-पुण्याचे पेशवे

वा वा च्यायला

5

मजा आली एकंदरीत...
मी मिस् केलं म्हणजे... जाना दो.. नेक्ष्ट टाईम.... पुपे पुन्यांदा कवातरी..

ममो, झकास वर्णन रे! पण

6

ममो,
झकास वर्णन रे!
पण "नटसम्राट" श्रामो??

अग्गाग्गग्गा ! हे लै

7

अग्गाग्गग्गा !

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

हे लै भारी.... बॉ !

Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

दामोदर पंत (यांची ओळख सर्व जण

8

दामोदर पंत (यांची ओळख सर्व जण "मिंटीचा नवरा" अशी करुन देतात.)

Big smile

लेख एक्दम भारीच !! पण फोटो असते तर अजुन मज्जा आली असती..... हास्य

अवांतर : पुप्स आता आम्हाला कधी देणार पार्टी ???? wink

पुप्या काजु रोल घेऊन आला का?

9

पुप्या काजु रोल घेऊन आला का? आमच्या पुप्याला काजु अतिप्रिय ब्वॉ! wink आणि 'प्यार्टी' फक्कड झालेली दिसते! वृत्तांत इतका जोरदार आहे म्हणजे नक्कीच! वावावा! आणि नंदनशी सहमत! हास्य

जबरी!

10

हा हा हा. मस्त वर्णन!

हॅ शाब्बास

11

शिंगावर गंगावन कसे लावावे याची गहन चर्चा करत होते Laughing out loud Laughing out loud .

आम्हाला वाढणारे वेटर आम्च्याच बाजुच्या टेबलावर बसुन जेवण करत होते.
किती काळ आपण तिथे होते हे अन्योक्तीने सांगण्याची पद्धत आवडली. कविता लिहायला सुरुवात करावी अशी नम्र विनंती आहे.

छत्तीसशे सत्तराची कहाणी सुफळ करत मी क्रेडीटकार्डरुपी सम्पुर्ण केली
१. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे.
२. त्याचा वापर करून तुम्ही हाटेलाचे बिल देऊ शकता.
३. काल दिले.
एवढे समजले बरं का.

काल आम्हाला प्यार्टीला जाता न आल्याने अंमळ खंतावलो होतो ती उणीव ममोंनी भरून काढली आहे. ममो वृत्तांत एक लंबर झाला आहे. सटासट गोळ्या मारल्या आहेत. जियो.

बाकी पुप्याच्या वाढदिवशी त्याला एक झकास विचारजंती व्याख्यान ऐकवण्याची आमची मनीषा (म्हणजे मराठीत प्लान होता) होती ती बिचारी हिरमुसली. तिची नि पुप्याची पुन्हा केव्हातरी गाठ घालून द्यावी लागणार आता.

बाकी पुप्याच्या वाढदिवशी

12

बाकी पुप्याच्या वाढदिवशी त्याला एक झकास विचारजंती व्याख्यान ऐकवण्याची आमची मनीषा (म्हणजे मराठीत प्लान होता) होती ती बिचारी हिरमुसली. तिची नि पुप्याची पुन्हा केव्हातरी गाठ घालून द्यावी लागणार आता.
अरेरे मग ऐकवायचेस ना. नाहीतर फोनवर ऐकवायचेस. मी पण म्हटले असते ना 'वा तुमचे विचार ऐकणे म्हणजे एक मेजवानीच असते' हास्य


-पुण्याचे पेशवे

मस्त...

13

मस्त...

जहबहरा रे मामो!!!!

14

जहबहरा रे मामो!!!!

जबरदस्त.......

15

ममोंच्या या वृत्तान्तकथनाने अंमळ भारावलो.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

वृतांत वाचून अंमळ हळवी झाले

16

वृतांत वाचून अंमळ हळवी झाले हास्य (मला आणि मिंटीला सेपरेट पार्टी दे नाहीतर बघतोच तुझ्याकडॅ) Big smile

मी पण होतो की...

17

मी पण होतो या कारेक्रमाला. राजेनी निमंत्रण दिलं. मी पुण्यात नवीनच, पण पोहोचलो झालं. मजा आला. काही नवे शब्द कळाले...पुणे-३० प्रकरण माहित नव्हते. कळाले आणि मी पण एक किस्सा सांगितला... बाकी श्रवण भक्तीच केली. ते वेटर जेवतांनाचा प्रसंग होण्यापूर्वीच निघावे लागले. मंडळी वाचनात जबरी वाटली. आपलं जमेलसं वाटतंय, बघूया


आपला स्नेहांकित...
-अशोक

कौतुकाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब.

18

तसे आम्ही पढतमुर्खच! पण तुम्ही आलात, मनमोकळेपणे मिसळलात आम्हांत. बरं वाटलं. असाच लोभ ठेवा!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

वृतांत आवडला !! आयुष्य कदाचित

19

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

वृतांत आवडला !!

आयुष्य कदाचित हेच असावं. कधी अनोळखी व्यक्तींना भेटावं, त्यांना सु़ख, दु:ख वाटावं, निसर्गाच्या हातात हात द्यावा, कधी दोन पेग घेउन थोडं झुलाव, कधी निद्रादेवीच्या कुशीत शांतपणे निजावं. >>>.

व्वा !! क्या बात है..नाही चुकलच है नाही हय !!

आमच साल नशीबच फुटकं !! साल मित्राच्या बर्डेच्या दिवशी बंगळोरात आलो ...

बाकी २८ ईंची खुर्चीत बसलेल्या पुप्याला १७व्या वाढीव....आपल हे...वाढदिवसाच्या शुभेच्छा !!