अविस्मरणीय केरळ आणि जेकब...

0
0

साधारण डिसेंबर मध्ये लग्न होणाऱ्या लोकांनी मधुचंद्रासाठी एक तर केरळ ला जावे नाहीतर सिमला कुलू मनाली ला जावे असा काहीतरी अलिखित नियम असावा असा समज करून आम्ही केरळ ला जाण्याचा बेत ठरवला... खूप कंटाळवाण्या प्रवासानंतर आम्ही तिरुअनन्त्पुरम ला पोचलो... बऱ्याच उत्साहाने ट्रेन मधून उतरलो... आता आपण भरपूर एन्जोय करू वगैरे विचार करून...
पण पुढे भलतेच वाढून ठेवले होते... एक कार्यकर्ता (कार चालक) आमच्या नावाचा फलक घेऊन (तो दाखवू का नको असा धरून) उभा होता... मीपण सहल कंपनीचे मनातून आभार मानून (तत्पर सेवेबद्दल ???) त्याला भेटलो... आणि तिकडेच पहिला झटका लागला... काहीही जास्त न बोलता त्याने सरळ आमचे सामान उचलले आणि गाडीत घातले...
मी मोठ्या ऐटीत हिंदीची चिंधी करून त्याच्याशी बोलयला लागलो...

मी: तुम्हारा नाम क्या है...
कार्यकर्ता: .... (मला बोलतायत का दोघे गप्पा मारतायत असे भाव चेहऱ्यावर आणून)
मी: What is your name?
कार्यकर्ता:… (पुन्हा एक मोठा pause)
मी: Name? Name? (शक्य तितक्या खुणा करून)
कार्यकर्ता: जेकब ...
मी: (हुस्श्ह...कळले बाबा याला)
मी: हमे पहिले होटेल जानेका है...
कार्यकर्ता: Hotel? Temple?
मला वाटले याला हिंदी येत नसावे... म्हणून इंग्रजी मध्ये प्रयत्न केला... पण तरी तसेच...

आता मात्र माझी खात्री पटायला लागली कि...जेकब भाऊ पूर्णपणे ‘मल्लू’ आहे... याचा हिंदी आणि इंग्रजी सोबत दूरपर्यंत संबध नाही...
कसे बसे त्याने आम्हाला होटेल ला पोहोचवले... मी लगेच fresh होऊन सहल कंपनी मध्ये फोन लावला आणि दुसरा ड्राईवर देण्याची मागणी केली... सहल कंपनीने सांगितले कि ड्राईवर लगेच बदलणे अवघड आहे पण मी तुम्हाला एक नंबर देतो तिकडे फोन करा आणि बोलून घ्या... त्या नंबरला फोन केल्यावर असे लक्षात आले की कमीत कमी पुढचे २-३ दिवस दुसरा ड्राईवर मिळणे अवघड आहे...
मग आपल्या सहलीच्या आनंदावर पाणी फिरावण्यात काहीच अर्थ नव्हता... असे म्हणून पुढची लढाई सुरु झाली...
आमचे हिंदीचे/ इंग्रजी चे अगाध ज्ञान विरुद्ध जेकब चे मोजके इंग्रजी ज्ञान (Yes, NO, Sorry, Thank you, Food, Hotel, Shopping, Museum etc)

मी: हमे भूक लागी है... खांना कहा मिलेगा... pure Veg…
जेकब: (सहलीचा दिनक्रम दाखवत...) Temple?
मी: (वरील अनुभव लकशात घेऊन आणि हातवारे करत) Food? Food?
जेकब: Fish? Rice?
मी: Pure Veg… South Indian Food…
जेकब:????
मला कोणीतरी सांगितले होते कि तिकडे काहीतरी आर्य वगैरे प्रकारत शुद्ध शकाहारी होटेल आहेत...त्याचा संदर्भ घेऊन...
मी: आर्या होटेल... डोसा... उतापा...
जेकब: OK…
असे म्हणून गाडी थेट होटेल समोर थांबली....
मी त्याला काहीही न बोलता तू काही नाश्ता करणार का? असे खुणेने विचारले... त्याने माझे खाणे झाले आहे... तुम्ही जाऊन या... असे सांगितले... (मला मनात रविवारी दुपारी १ वाजता लागणाऱ्या मूकबधिरांच्या बातम्यांची आठवण येऊ लागली... पण काही इलाज नव्हता)...
शेवटी जरा पोटपूजा केल्यावर मला बरे वाटले... आणि मी त्याला बोलावले...

जेकब: Temple? Museum ? Beach? Shopping?

जेकबच्या शब्द भांडाराची कल्पना आल्याने समुद्र खवळलेला असेल का? तिकडे गर्दी असेल का? बोटिंग करता येईल का? असे गुढ प्रश्न विचारण्याचा काही उपयोग नव्हता...

आम्ही राजा रवी वर्मा संग्रहालय बघून घेतले...
मग शेवटी आमची स्वारी कोवलम समुद्र किनारी पोचली... थोडे फार फिरून झाल्यावर सन सेट बघून परत होटेल वर आलो... आणि पहिला दिवस कसा संपला याच्या आठवणीत सहल कंपनी ला शिव्या घालत झोपलो...

दुसऱ्या दिवशी जेकब साहेब सकाळी एकदम तयार...
आम्ही आदल्या दिवशी प्रमाणे आर्या... डोसा... उत्तपा असे करून नाश्ता करयला पोचलो... मग Temple बघून साधारण आपण कुठे जाणार आहोत... किती अंतर आहे आणि किती वेळ लागेल असे प्रश्न मी जेकाबला विचारले...

मी: अभी किधर जाने का? कितना टाईम लगेगा?
जेकब: (एक गोड smile देत)...???
मी: distance? Time? (हातावरील घड्याळाकडे बोट दाखवत)
हावभाव कळाल्यावर त्याने काहीतरी वेळ सांगितला आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली... रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यातून जेकब जोरात गाडी चालवत आम्हाला हिसका दाखवत होता... आणि विशेष म्हणजे अशा प्रत्येक दणक्या ला तो steering वरील एक हात सोडत... मागे वळत... Sorry… Sorry… No Complaint… असे म्हणत होता...
मग मी पण Ok… Ok करत त्याला त्याच्या भाषेत उत्तर देत होतो...

हळू हळू आमची आणि त्याची wavelength जुळायला लागली...

आता या जेकब सोबत आम्ही मराठी मध्ये हातवारे करून गप्पा मारू लागलो आणि तो सुद्धा तितक्याच सरावने आमच्याशी मल्याळम मधून बोलयला लागला...

जेकब चे अजून किस्से पुढील भागात...

मस्त!

1

मस्त! हास्य

हाहाहा! छान लिहिलंय.. ते

2

हाहाहा! छान लिहिलंय.. ते ओघवतं वगैरे सगळं.
भटकंती प्रकार बघून धागा उघडला. फोटो नाहीत म्हटल्यावर निषेधाचा प्रतिसाद लिहिणार होतो पण छान लिहिलंय. बाकी सुरूवात पाहून उडालोच! मी म्हटलं आता हनिमूनचं वर्णन केलंय की काय इतकं मोठ्ठं wink
बाकी विभाग तरी बदला नाहीतर केरळाचे फोटो टाका! भटकंतीचे धागे असे फोटोविना बघवत नाहीत!

चायला.. हणीमुण ला जाउन कोण

3

चायला.. हणीमुण ला जाउन कोण केरळाचे फटु काढतो व्हय राव.. Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

4

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मूकबधीरांसाठीच्या बातम्या...

5

मूकबधीरांसाठीच्या बातम्या फार आवडीने पहात असे व अर्थ लावत असे. जाम मजा वाटायची.
बाकी वर्णन छान करताय,
पुढील भाग लवकर टाका. नाहीतर मल्याळम मधे प्रतिसाद टाकेन इथे लय मल्लू आपले दोस्त हायेत.

वाचतोय...

6

वाचतोय...

छान लिहिलय. भटकंतीचे फोटो

7

छान लिहिलय.
भटकंतीचे फोटो बहुतेक येतिलच पुढल्या भागांत.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

कं लिवलय.. कं लिवलय.. छान..

8

कं लिवलय.. कं लिवलय.. छान.. येउद्या अजुन... पण जास्त वेळ घेउ नका.. नायतर विन्ट्रेस जातो..

अवांतर - आण्णा.. सुखद धक्का...आपलं सहर्ष स्वागत..
ओ मालक.. जरा स्वागत करा की.. नवीन माणुस आला राव..
स्वगत: राजेंच लक्ष नाय आजकाल...

अरे वा

9

अरे वा, अण्णा पण...

जोरदार काम आहे. चालू द्या.

पण जास्त वेळ घेउ नका.. नायतर विन्ट्रेस जातो..
+१


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

अरे कर्मा! काय म्हणावं या

10

अरे कर्मा! काय म्हणावं या सातारकरांना आता! अहो जरा विचार करून प्रतिसाद टंका की! wink

हे पहा

11

हे पहा अण्णा,

प्रसारमाध्यमांनी आमच्या विधानाचा विपर्यास केला आहे. आम्ही त्या अर्थाच काही म्हटलच नव्हत.

पण

(तुम्ही तो (अर्थ) घेतला तरी आमची हरकत नाही)
wink


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

मस्त मस्त ! स्वागत आहे मीमवर

12

मस्त मस्त !

हास्य

स्वागत आहे मीमवर अण्णा wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान

13

छान हास्य

मस्त

14

ओघवतं झालय लिखाण. मस्तच.

पुढचा भाग लिहा साहेब..

15

पुढचा भाग लिहा साहेब..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हहहा..छान लिहिल आहे

16

हहहा..छान लिहिल आहे राव..खुशखुशीत..येवु दे पुधचा भाग

छोटेखानी आणी खुशखुशीत लेखन

17

छोटेखानी आणी खुशखुशीत लेखन !!

एक किस्सा आठवला.........

आमचा मल्लु टि.एल. सारखं-सारख त्या मल्याळी भाषेच गुण-गाण करीत असे...आमचे एक आदरणीय सदाशिवपेठी मित्र त्याला खुप वैतागले होते...पण टि.एल असल्याने काही बोलता येत नसे ...एक दिवस टि.एल. मे मल्याळम भाषा आणी मराठी किती जवळच्या आहे हे सांगण्यास सुरुवात केली...अक्षरला अक्षरम म्हणतात, शब्दला शब्दम म्हणतात ...हा मित्र मध्येच पचकला म्हणजे " वडापाव ला तुम्ही वडापावम" म्हणणार का ? " असे विचारल्यावर त्याच्या चेहरा पाहण्यासारखा झाला.त्यानंतर त्याने कधीही मल्लु भाषेच कवितक केले नाही