कारमपल्ली-४ (अंतिम भाग)

0
0

मार्ग्यानी आईला भडकवुन दिलं होतं, आईनी दुस-या दिवशी रानात जायला मज्जाव केला आणि मला कुठल्याही किमतीत या शिकारीला जायचं होतं. मी आईला खुप विणवण्या केल्या पण आई काही ऐकेना. आता मात्र आईची नजर चुकवुन जायचं ठरवलं. आमचं पिंडंच रानातिल शिकार करुन जगण्याचं पण गाव नविन असल्यामुळे आई घाबरायची. कुडकेल्लीत असताना आईनी केंव्हाच रानात जायला मनाई केली नव्हती. पण हे आमचं गाव नव्हतं एवढ्च एकमेव कारण होतं न जाउ देण्याचं.
शेवटी आईची नजर चुकवुन गावाच्या बाहेर पड्लो. गावाच्या बाहेर टेकला रस्त्यावर वेटांग करण्या-यानी एकत्र येण्यासाठी जागा ठरलेली आहे. तिथे तरुण मुलं आधिपासुन जमलेली होती, आता शिकारीला निघायची तयारि करतच होती तेवढ्यात मी पोहचलो. ५-१० मिनिटात इतर मुलंही पोहचली. आता रानात शिकारीला निघायचं होतं. त्या आधी आव्वाल (गाव देवी) चं दर्शण घेण्याची प्रथा आहे. आम्ही १८-२० मुलं होतो, आव्वालला नमस्कार करुन एकदाचं रानात शिरलो.
सगळ्यांकडे गोरकांग, वादींग, तिर कामठे व इतर काही शस्त्र होते. सगळ्यात आधी काल जिथे आस्वलाचा प्रकार घड्ला तिथे पोहचायचं होतं. आम्ही तिथे पोहचलो व शिकारीचा अनुभव असलेले मोठे मुलं त्या जागेचं निरिक्षण करु लागली. झुडपांच्या पानावर सांडलेल्या रक्ताचा धागा धरुन आम्ही अस्वलाचा शोध सुरु केला. सगळ्यानी आपापले शस्त्र अगदी तयार ठेवलेत व रानात चारी बाजुनी शोधमोहीम सुरु झाली. ते कारमपल्लीचं रान कुडकेल्लीच्या रानाच्या तुलनेत जास्तच भयंकर आहे. दर १०-२० मिटरच्या अंतरानी साप, विंचु प्रकार दिसतोच. यातील बहुतेक आपल्याला घाबरुन आधीच आपली वाट धरतात पण हे असलं सगळं डोल्यासमोर दिसताना रानात पुढे सरकनं जरा अवघडच असतं. बरं नुसतं रानात हिंडताना गुराढोरांच्या चालण्याने तयार झालेल्या पायवाटांवरुन चालत असतो. पण एखादया जंगली प्राण्याचा पाठलाग करुन शोधायचं म्ह्टलं की पायवाटेचा वापर होत नाही. रानातील सगळी बांबुची झूडुप तपासुन बघावी लागत, व शींदीचं पुर्ण रान काठीने हाणून तपासाव लागत होतं. या व्यतिरिक्त टेंबराची झुडपं सुद्धा तपासत आम्ही पुढे सरकत होतो. हे सगळं खुप कठिन होतं पण आस्वलाचा मात्र पत्ता नव्हता. आम्ही किय्येरच्या रानातुन कोटीच्या रानापर्यंत पुढे सरकलो तरी काही आस्वलाचा पत्ता नव्हता. आता मात्र आम्ही फार कंटाळलो. आस्वल आता सापडणार नाही म्हणुन परतीच्या मार्गावर निघायचं ठरल. आम्ही सगळे दिवसभर रानात हिंडुन घामाघुम झालेलो होतो. येताना मात्र नदिच आंघोळ करुन घराकडे जाण्याच्या बेताने पर्लाकोटा नदिकडे मोर्चा वळविला. आम्हि सगळे नदित उतरुन डोहात ऊड्या मारल्या. आंघोळ झाल्यावर आपापले शस्त्र घेऊन कारमपल्लीच्या दिशेनी निघालो.
आता सुर्य बुडण्याची वेळ झाली होती, ईथुन गाव किमान पाऊन तासाच्या अंतरावर होतं. पर्लाकोटा नदिचं पात्र खुप रुंद व उंच आहे. या नदिची मधीली धार भर उन्हाळ्यातही वाहते म्हणुनच या नदीच मोठ मोठाल्या डोहांमधे मगर कायमचे निवासी बनुन राहतात. काही डोहाना तर मोगुर कसा (मगरीच वास्तव्य असणारं डोह), अशी नावं आहेत. बारामहीने पाणी उपलब्ध असल्यामुळे ईकडे जंगली प्राण्यांची रेलचेल जरा जास्तच असते. आम्ही नदिचं पात्र चढू लागलो, रानात हिंडताना सगळा गृप एकत्र कधीच नसतो काहि मागे, काही पुढे व काही मधे व आजु बाजुला मोठं अंतर ठेवून चालत असतात. मी जरा लहान असल्यामुळे मधल्या गटात चालत होतो. आम्ही आजुन पुढच्या गटापासुन बरच मागे चालत होतं. पुढचा गट नदिचं पात्र चढुन पुढे गेला होता. आता आमचं गट नदिचं पात्र चढायला सुरुवात करणार होतं तेवढ्यात पुढच्या गटाने जोरात ओरडायला सुरुवात केली. आम्हाला सावध करण्यासाठी ते ओरडत होते, आम्हाला सुरुवातिला कळलच नाही कि ते का ओरडत आहेत. पण तेवढ्यात एक मुलगा आमच्यातिल मुलांची नावं घेऊन ओरडत होता, “ वामाट रो, हिक्के वामाट रो, ईगा जेटले मांता वामाट रो, कात्तामतोर मार्रांगा आंगाट रो” (ईकडे अस्वल आहे, मिळेल त्या झाडावर चढा).
आम्ही नुकतचं नदिच्या काठाजवळ पोहचलो होतो. दिवसभर शिकारीसाठी फिरताना गोरका, तिर कामठा व वाद्दी याचं बरोबर Combination घेऊन शिकारीसाठी माणसांचं एक Formation तयार करुन रानात प्राण्यांचा शोध घेतला जातो. आता मात्र आमचं ते शिकारीच Formation तुटलं होतं. Formation मधला कोणि माणुस कुठल्याही गटा सोबत निघुन गेलेला होता. नदिचं तिर चढुन पुढे जाणे अवघड होतं आता काय करावा याचा विचार करतच होतो तेवढ्यात आस्वल पिल्लांसकट नदिच्या काठावरुन नदित उतरु लागली होती. आस्वलाला आमच्या पर्यंत पोहचायला १ मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणार होता. आमच्याकडे दोन पर्याय होते. एक तर मागे फिरुन नदिचं दुसरं काठ गाठणे, पण त्या साठी नदी (मधली धार) पोहावी लागणार होती. दुसरं हातात जे काही हत्यारं आहेत त्याच्या बळावर आस्वलाचा शिकार करणे. आम्हाला दोन ते तिन सेकंदाच्या आत हा काय तो निर्णय घ्यायचा होता. Formation तुटल्यामुळे शिकार करणे अवघड वाटत होतं. आम्ही मागच्या गृपला आवाज देऊन शिकारिला तयार व्हा, जमेल तसं Formation तयार करुन धावुन या,असं ओरडुन सांगितलं व आमच्या जवळ ५ गोरके व जवळपास सगळ्यांकडेच तिर कामठे होते, त्या बळावर आस्वलाला धडा शिकवायचं ठरवलं. पण आस्वलाच्या शिकारीत सगळ्यात महत्वाच असतं ते म्हणजे वाद्दी ( जाळी). आमच्या जवळ कुणीच वाद्दींगवाला नव्हता.
शिकारीचं तंत्र
आस्वलाची शिकार करताना तिर कामठ्यावाल्यानी डोळ्यांवर व पायांवर तिरांचा मारा करायचा असतो, हे तिर चालविणारे केंव्हाच एकाच दिशेला उभे नसतात. शक्यतो आस्वला वेढा घालतात. नाहीतर आस्वल आंगावर धावुन येते. हे चालु असताना वाद्दींगवाली टिम आस्वलाला वादींग मधे अडकविते व गोरकांग वाले जवळुन गोरकांग भोसकतात. असं हे तंत्र असतं. पण या वेळेस आम्हि सगले तिर कामठेवाले एकाच दिशेला उभे होतो. गोरकांगवाले वाद्दी शिवाय काहीच करु शकत नव्हते व वादींगवाले मात्र आमच्या मागच्या गृपमधे होते.
आमच्या गटातील एकाने जोरात आवाज देऊन मागच्या गटातिल वाद्दींग वाल्याला मदतीसाठी लवकर पुढे यायला सांगितलं व तिर कामठेवाले पहिला हल्ला चढ्विण्यासाठी तयारि करु लागले. पण नदिच्या पात्राच्या अगदी जवळ हल्ला चढविल्यास आम्हाला हालचाल करायला जास्त जाग मिळणार नाही हे ओळखुन आम्ही १०-१५ मिटर मागे सरकायचं ठरवलं. आस्वल पिल्लांसकट नदिच पात्र उतरु लागली, आमच्यातिल तीर कामठे वाल्यानी आस्वलावर तिन्ही दिशेनी हमला करता येईल अशी Position घेतली. वाद्दींगवाला आमच्या दिशेनी धावुन येत होते. त्यांच्या गटातिल काही तीरकामठे व गोरकांगवालेही आमच्या मदतीला धावुन येताना दिसत होते. आस्वलीने आम्हाला दुरुन पाहिलेलं नव्हतं. आधीच पाहिलं असतं तर पिल्लांचं जीव धोक्यात आहे याची जाण होऊन तिनी खाली उतरायचं धाडसच केलं नसतं, पण पुढे शिकारी माणसांची टोळी उभी आहे हे तिच्या लक्षात लक्षात येईस्तोवर ती अर्धा काठ उतरली होती, तीच्या मागे मागे तीची पिल्लही उतरत होती. आता त्याना आम्हाला बघुन आस्वल क्षणभर जागीच थांबली, तिच्या लक्षात आलं कि पुढे शिकारी माणसांची टोळी आपली वाट बघताय. पिल्लं मात्र आईला मागे टाकुन खाली नदिच्या पात्रात उतरली होती. आई का येत नाही म्हणुन पिल्लानी मागे वळुन बघितलं तेंव्हा आस्वल मधे ऊभी राहुन परत फिरण्याच्या मनसुब्यात होती. तेवढ्यात आस्वलाच्या डाव्या पायावर वरुन एक तीर येऊन शिरतो. आस्वल ओरडत स्वत:भोवती एक गोल वळसा घालते. तेवढ्यात नदिच्या काठावरुन आमचा पहिला गट परत येताना दिसला. हा तीर आमच्या पुढे गेलेल्या गटातील लोकानी परत फिरुन आल्याची खात्री देणारा होता. काही क्षणात आमच्या लोकानी आवाज देऊन ते परत फिरल्याची खात्री देत होते. आम्ही आता आस्वलाची शिकार करणार हे नक्की झालं होतं. तिची सगळी पिल्ल इकडे तिकडे पळु लागली. आमची वाद्दींग वाली टिम वर ऊभी होती पण त्याना काहीच करता येईना. वरुन फक्त तीर चालविले जाऊ शकत होते. आम्हाला खाली वाद्दींग लावुन आस्वलाला त्यात अडकविण्यासाठी वरिल तीरकामठ्या वाल्यांचा चांगला उपयोग होणार होता. आम्ही खालून ओरडुन त्याना तीर कामठ्यांचा मारा वाढवायला सांगीतलं. त्यानी लगेच तीरांचा वर्षाव सुरु केला. आता आस्वल जीवाच्या आकांतापायी सुसाट वेगाने नदीच्या पात्रात उतरु लागली. आम्ही आस्वलाला धरण्यासाठी वाद्दींग लावलेलं आस्वलाच्या लक्षात येताच तीनी दिशा बदलली व डाव्या बाजुला पळत सुटली. त्या बाजुला आमचे तीर कामठे चालविणारे काही गडी दबा धरुन बसलेले होते. त्यानी लगेच तीरांचा मारा सुरु केला. आस्वला तिकडुन परत फिरण्याच्या नादात होती तेवढ्यात वाद्दींगवाल्याना मागुन वाद्दींगचा सापडा लावला. आस्वल वाद्दीगच्या दिशेनी गेली पाहीजे या साठी ती दिशा सोडुन इतर सगळ्या दिशेकडुन तीरांचा मारा चालु ठेवण्यात आला. सहाजिकच आस्वल वाद्दींगच्या दिशेनी धावत सुटली व शेवटी वाद्दींगमधे अडकली. वादींगमधे अडकतात त्या टिमच्या नियमाप्रमाणे गोरकांग वाल्याने हमला चढविला. वादींगवाल्यानी लगेच आस्वलाला वाद्दीमधे गुंडाळलं. इतर ट्रेन लोकानी लगेच आस्वलाचे पाय धरले व पाऊर मार्रा ( पाऊर या झाडापासुन दोरी तयार करतात) च्या दोरीने घट्ट बांधले. इतर गोरकांगवाल्याने आस्वलाच्या डोक्यात व मानेत वार घातले व आस्वलाने एकदाचं प्राण सोडलं. हे सगळ घडत असतना आस्वलाचे काही पिल्लं पळुन गेले, पण दोन पिल्ल मात्र शेजारच्या डोहात पडलीत. आमच्या लोकानी त्या पिल्लाना बाहेर काढलं. त्यांचे हात पाय बांधले. जवळच्या रानातुन एक मोठं जाडजुड व लांब असं झाड तोडुन मोठी पाटी ( झाडाचं मजबुत Rod म्हणा) तयार करण्यात आली. आस्वलाच्या दोन पायामधुन ही पाटी घातली व दोन टोकाला दोन लोकानी धरुन उचललं. आस्वलाला अशा प्रकारे अडकवुन गावात आणण्यात आलं. काही लोकानी पिल्लाना पण सोबत धरलं होतं. गावात पोहचल्यावर आस्वल मारल्याचं जाहिर करण्यात आलं. मग आस्वलाला कापुन त्याचं मटन तयार करुन घरो घरी वाटुन देण्यात आलं. तरुणानी मात्र गोटुलमधे स्वयंपाक करुन आस्वल मटनाचा आस्वाद घेतला व रात्रभर गोटुलमधे नाचुन आनंद साजरा करण्यात आलं.
दुस-या दिवशी आस्वलाच्या पिल्लाचं काय करायच या साठी एक मिटींग घेण्यात आली. त्या दिवशी लोकानी रानात सोडण्याचा सल्ला दिला, काहीनी प्रकाश आमटे यांच्या कडे नेऊन सोडण्याचा सल्ला दिला. आमच्या भागात हे असं शिकारीमुळे लहान पिल्ल अनाथ होण्याचे खुप प्रकार घडतात. मग तिकडची लोकं शिकारीत लहान पिल्ल मिळाली कि हमखास प्रकाश आमटेंकडे आणुन सोडतात. आज ईथेही तोच निर्णय झाला. दोन मुलं पिल्लं घेऊन लोक बिरादरीला निघाली, पण मधेच कुणीतरी ट्रकवाल्या सरदारने त्याना पिल्लांच्या बदल्यात पैशाची आमिष दाखविली, जी आमटेंकडे मिळत नाही. मग या पठ्ठ्यानी ती दोन्ही पिल्लं त्या सरदारला विकली व पैसे स्वत:च खाल्लेत. आम्हाला हे फार उशीरा कळलं.

समाप्त

टिपः पुढचा लेख गोटूल

मस्त मस्त मस्त....

1

मस्त मस्त मस्त....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुंदर लेखमाला....

2

सुंदर लेखमाला....

कारमपल्लीचा अंतिम भाग असला तरी

3

कारमपल्लीचा अंतिम भाग असला तरी भामरागड सुरूच राहो.
वाचण्याची इच्छा आहे.

सुंदर लेखमाला.... ४ ही भाग

4

सुंदर लेखमाला.... ४ ही भाग अप्रतिम लिहले आहेत.
Grade

छान लिहले आहे, एक वेगळेच

5

छान लिहले आहे, एक वेगळेच विश्व !