पुस्तक परीक्षण
लिखाणाच्या जगतात, लेखक- कवी- समीक्षक- नाटककार आपल्याला कल्पनेच्या जगतात असे लीलया घुमवून आणतात की, स्वतः लेखकाने जरी आपली कलाकृती वास्तव नाही, असे शपथेवर सांगितले तरी त्यावर वाचकांचा विश्वास बसणार नाही.
सुप्रसिद्ध दक्षिणी पत्रकार रोहिणी निलेकणी यांनी लेखनाव्यतिरिक्त, समाजकार्याच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. पती "आयटी' क्षेत्रातले नामवंत असल्यामुळे त्याही क्षेत्रात रस निर्माण होऊन त्यांनी बरीच बाजी मारली आहे. या सर्वांचा परिपाक होऊन एक अतिविलक्षण रहस्यमय कादंबरी जन्माला आली - "स्टीलबॉर्न'.
एम. आर. हिल्सवरच्या आदिवासी वस्तीत एका मृत विरूप अर्भकाचा जन्म आणि त्याचवेळी बेंगळूरमधील शोधपत्रकार पूर्वा पंडित हिला अपघात होणे... प्रथमदर्शनी या घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तरी त्यामधून सुरू होतो एक विलक्षण रहस्यमय प्रवास... पूर्वाचा!
अपघातग्रस्त पूर्वा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, तिच्या कानावर, डॉक्टरांचे काही अर्धवट संवाद पडतात. त्यातून तिला कळते की, डॉ. अंशुल हिरेमठ याने स्त्रियांसाठी संतती-प्रतिबंधक लस तयार करण्यात बाजी मारली आहे. प्रयोग पहिल्या टप्प्यावरच्या चाचण्यांमध्ये पूर्णतया यशस्वी होतो. दुसरा टप्पा संपताना या यशाला थोडे गालबोट लागते. लसीचे इंजेक्शन घेतलेले असताना देखील काही आदिवासी महिला गरोदर राहतात व त्यापैकी काहींचे नैसर्गिक गर्भपात होतात, तर काहींना मृत विरूप बाळे होतात. प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न होतो. पण, "केती' नावाची आदिवासी स्त्री वाढलेल्या गर्भाला जन्म देण्याचा निर्णय घेते व पूर्वाची हेरगिरी फळाला येते. यशस्वी लस परदेशी शास्त्रज्ञांना विकून, इथल्या लसीच्या डोसात फेरबदल करणारी व्यक्ती उघडकीस येते. डॉ. हिरेमठांची सहकारी डॉ. रीटाच हे काम करत असते.
संपूर्ण कथानकाला पत्रकारितेची पार्श्वभूमी दिली आहे. त्यामुळे त्या जगतातले बारकावे, स्पर्धा, स्वातंत्र्य, धोके हे आपोआपच चित्रित होतात. काही आदिवासींना लसीची चाचणी करण्याकरता निवडलेले असते. त्यामुळे आदिवासींची राहणी, श्रद्धा, खाणेपिणे, व्यवसाय, जीवनशैली वगैरे सर्व बारकाव्यानिशी यात येते. तिसऱ्या ठिकाणी ज्या लसीला केंद्रबिंदू बनवून ही कथा रचली आहे, त्या (काल्पनिक) लसीची सर्व (सत्य) वर्णने, गरजा, पार्श्वभूमी, उपयोगिता, वापरण्याची पद्धत, संभाव्य धोके वगैरे सर्व ऊहापोह लेखिकेने अनेक महिने अनेक डॉक्टरांशी चर्चा करून, विस्तृतपणे अतिशय मनोरंजक रूपात केला आहे. त्यामुळे त्या लसीच्या नामकरणापासून (एफ. आर. पी. ४१) सर्व काही सत्यच वाटत राहते. झोता पेल्सूसिडा (बीजांडा वरील एका प्रकारचं आवरण) यावरील डॉक्टर व पूर्वाची चर्चाही कंटाळवाणी वाटत नाही.
नायिकेची बहीण "फ्रेडरिक्स अटॅक्यिया' या दुर्धर रोगाने पीडित आहे. त्यावर उपाय नाही. मज्जा तंतूमधील ऱ्हास होणाऱ्या पेशी व त्यापायी निकामी होत जाणारे स्नायू बघत रुग्णाला मृत्यू येतो. त्यालाही कथानकात गरज पडेल तिथे चपखल बसवले आहे. इंटरनेटवर हॉकिंग करून शोधलेले "फुटीर' व्यक्तीचे नाव, नंतर परदेशातून खणलेली केसची पाळे-मुळे, हे सर्व स्वतंत्र विषय असूनही ज्या चलाखीने एकत्र गोवत कथानक पुढे नेले आहे त्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन.
या सर्व विषयांची केवळ वरवर माहिती असून जमणारी ही गोष्ट नव्हतीच. त्यामुळे लेखिकेचे चौफेर, गहिरे ज्ञान प्रकट होते. या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद श्रावण मोडक यांनी अतिशय मनोरंजक, पण तितक्याच समर्थपणे केला आहे. वैद्यकीय विषयांवरची ही कादंबरी, त्यामुळे थोडासा क्लिष्ट विषय असूनही "समजत नाही' अशी एक ही ओळ यात नाही, याचे श्रेय लेखकाला, तितकेच अनुवादकाला देखिल!
स्टिलबॉर्न
मूळ लेखक : रोहिणी निलेकणी
अनुवाद : श्रावण मोडक
प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे
मूल्य : २२५, पृष्ठे : २७३
******
परिक्षण लेखिका :
अंजली आमोणकर
******
पुस्तक खरेदीसाठी येथे क्लिक करा.
पुस्तक वाचले आहे. सुंदर आणि
पुस्तक वाचले आहे. सुंदर आणि ओघवत्या भाषांतरासाठी श्रामोंचे अभिनंदन!!
छान, वाचावयास हवे पुस्तक.
छान,
वाचावयास हवे पुस्तक.
श्रामोंनी अनुवाद
श्रामोंनी अनुवाद केलाय...वाचायला हवे..
वा
परिचयाने उत्सुकता चाळवली गेली आहे, आता वाचावेच लागेल.
अवांतर: यावरून सुबोध जावडेकरांची एक विज्ञानकथा आठवली. त्यात एक शास्त्रज्ञ सर्वांपासून दूर राहून गुपचूप माणसाचा (स्वतःचाच) क्लोन बनविण्याचे संशोधन करीत असतो. एक गुप्त पोलीस अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवते. अखेर त्यांचा सामना होतो तेव्हा तो शास्त्रज्ञ अशा प्रयोगात गैर काय असा प्रश्न विचारतो. चर्चेच्या ओघात ती विचारते की डॉक्टर हा तुमचा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला नसेल ना? तो होकार भरतो. मग ती विचारते की त्या चुकिच्या प्रयोगातून जन्माला आलेली मुलं, त्यांचं काय झालं? तो म्हणतो ती माझी प्रतिकृती नव्हती त्यामुळे मी ती नष्ट केली. ती काही अवघड प्रश्न विचारते तेव्हा तो चिडून म्हणतो ती जगायला लायक नव्हतीच. ती म्हणते ती जगायला लायक नव्हती असे नव्हे, ती 'तुमची प्रतिकृती नव्हती' म्हणून तुम्ही नष्ट केलीत. ती हाडामासाची माणसे होती, जरी तुम्हीच जन्माला घातली असली तरी त्यांचा अंत करण्याचा हक्क तुम्हाला नाही. त्यामुळे ते सर्व खूनच होते. जसजसे विज्ञान जगण्याच्या मुळाकडे जाऊ पाहते तसे अनेक नैतिकतेचे प्रश्न निर्माण करते हे अधोरेखित करणारी ही छोटेखानी कथा. (अर्थात त्या कथेचा शेवट अतिशय समर्पक आणि अनपेक्षित होता तो सांगून गुपित फोडण्याचे पाप करीत नाही. आगेकी इष्टुरी खुद पढिये.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
शोधावे लागेल पुस्तक !
शोधावे लागेल पुस्तक !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
दोन्ही पुस्तके वाचावी असे
दोन्ही पुस्तके वाचावी असे वाटत आहे मला.
मोडकांचा परिसस्पर्श लाभलेले
मोडकांचा परिसस्पर्श लाभलेले सुंदर पुस्तक !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वाचायला हवे.
वाचायला हवे.
करतो. करेन. व करेगें