मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle
कसिनो रॉयल
"ड्राय मार्टिनी' बाँडने सांगितलं, "शँपेनच्या खोलगट गॉब्लेटमध्ये, तीन भाग गॉर्डनचे, एक भाग व्होडका आणि कीना लीलेटचा अर्धा भाग. अगदी थंडगार होईपय|त चांगलं ढवळ. मग त्यात लिंबाच्या सालीचा पातळ तुकडा टाक. आलं लक्षात?' "नक्कीच आलं साहेब.' इयान फ्लेमिंगच्या बाँड मालिकेतील हे पहिले पुस्तक. जेम्स बाँड - उमद्या व्यक्तिमत्त्वाचा, आधुनिक विचाराचा, अतिशय देखणा, जातिवंत निर्दय व कमालीचा घातकी. गुप्तहेर मालिकेतील ह्या पहिल्या गोष्टीत, 007 बाँडवर एका प्राणघातक, व जबरी "खिलाडी' असलेल्या रशियन कारस्थानी व्यक्तीला नामोहरम करायची कामगिरी येऊन पडते. लोकत्याला फक्त "ल शिफ्र' या नावाने ओळखतात. त्याला बक्कारा हा जुगार खेळत असलेल्या टेबलावर उध्वस्त करायचं व परिणामी त्याच्या रशियन वरिष्ठ हेरांना त्याला "निवृत्त' करायला भाग पाडायचं, अशी ही भन्नाट योजना होती. नशीब बाँडवर प्रसन्न होतं व शिफ्रच्यामागे हात धुऊन लागलं होतं; मात्र काही लोकांचा नियमाप्रमाणे खेळण्यास नकार, बाँडचे एका सुंदर गुप्तहेर ललनेकडे आकर्षित होणं त्याला गोत्यात आणतं. आणि...
.jpg)