माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी. माझा स्वभाव लहानपणी जरा बुजरा, अबोल होता, मला कसलातरी न्युनगंड असावा बहुतेक त्याकाळी, कारण मला ९वी-१०वीत जाइपर्यंत फार जवळच्या मित्र-मैत्रिणी नव्हत्या. आमच्या गल्लीत मुले दुपारी एकत्र जमुन क्रिकेट वगैरे खेळायची पण मला फारसं यायचच नाही, म्हणुन मी जायचो नाही तिकडे.
काय असेल ते असो मला अश्या कित्येक दुपारी एकट्यानेच, स्वतःशीच रमवलेल्या आठवतात ते ह्या अंगणात. आमच्या अंगणात वेगवेगळ्या दिवसात असंख्य प्रकारचे किडे असायचे. मी इतक्या एकाग्रतेनं त्यांचं निरीक्षण करण्यात रमुन जायचा, की मला घरातुन हाक मारलेलही कळायच नाही कित्येकदा, त्यात दुपारी ११ ते ४-४:३० हा वेळ म्हणजे खुप मस्त असायचा, जेवण, झाकपाक होउन शक्यतो सगळी मंडळी निवांत असायची, कुण्णाकुण्णाला माझी आठवण यायची नाही, उलट यावेळेत दंगा न केल्याबद्दल कृतज्ञताच वाटत असेल कदाचीत. आणि मग मी त्या माझ्या बालमती गुंग करणार्या छोट्या जगात हरवुन जायचो.
सर्वात जास्त आठवतात ती 'सुरवंट'. हिवाळ्यात पेरुच्या झाडावर सुरवंट फार, कधी कधी आंब्यावर पण असतात. बोट- अर्ध बोट आकाराची काळी, करड्या, भुर्या रंगाची सुरवंट हा एक मजेशीर प्रकार असतो. त्यांची चाल लयदार, एखाद्या अळीसारखी, पण त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान लय बघत रहावीशी वाटते. चौथी पाचवीत असताना ही सुरवंट आम्ही पाळायचो पण, म्हणजे पुर्वी जुन्या त्या 'होम' की काहीतरी नावाच्या मोठ्या काडेपेट्या यायच्या, त्याच्यामधे पेरुची, आघाड्याची वा झेंडुची पानं भरुन त्यात सुरवंट पकडुन ठेवायचो, सतत पाने घालत रहायला लागायचं, काही दिवसानी सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करुन घेतं, मग ती काडेपेटी त्या कोषासकट बाहेर ठेवायची एखाद्या दगडावर, आणि त्यातुन फुलपाखरु बाहेर यायची वाट बघायची. कधीच दिसलं नाही माझ्या डोळ्यासमोर फुलपाखरू बाहेर येताना, मग खुप हिरमुसला व्हायचो मी, पण नेहेमी मोकळे कोष मात्र दिसायचे. सुरवंट घरात आणलं की खुप शिव्या खाव्या लागायच्या पण कसतरी लपवुन मी ती काडेपेटी आणायचोच घरात. ह्यात कष्ट काहीच पडायचे नाहीत अस नाहीये बरका. सुरवंट जराजरी लागले हाताला वा कुठेही त्वचेला कि प्रचंड खाजायचं, जरा बारकाइनं पाहिलं तर कोवळ्या त्वचेत रुतून बसलेले केसही दिसतात, खुप आग होते. ह्यावर उपाय असायचाच, जिथे सुरवंट लागलय त्या त्वचेवर जाड घोंगड्याने घासल्यावर ते केस निघुन जायचे आणि आग कमी व्हायची, आणखी एक हमखास उपाय म्हणजे झेंडुची पाने कुस्करुन लावणे, थंड वाटायचे एकदम.
तिथल्या तुतूच्या झाडावर गोल रंगीबेरंगी चकचकीत किडे दिसायचे, त्यावेळेला आम्हाला बीट्ल नाव माहीती नव्हतं आम्ही टॅक्सीकिडे म्हणायचो त्याला.
गवळण कीडा कधीमधीच दिसायचा, मात्र पानगळीच्या दिवसात काडीकीडा मात्र नेहेमी बघितलाय. वाळलेल्या पानात तो कीडा पायाखाली येउ नयी म्हणुन वाकुन चालायचो, शोधत शोधत.
पावसाच्या दिवसात तर ते सगळे नवं जग बघताना भानच रहायचं नाही, असंख्य प्रकारचे बेडुक ओरडायचे. एखादा बेडुक उडी मारुन कुठे जातोय त्याचा नजरेने पाठलाग करायचा, मग एखादा दुसराच बेडुक दिसायचा क्षणभर, आणि पहिला हरवुन जायचा. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागच्या दाराला आम्ही एक लाकडी फळी बसवायचो आडवी, बेडुक येउ नयेत म्हणुन, पण तरी एखादा घरात शिरलाच तर त्याला झाडु घेउन बाहेर हाकलायची मोठ्ठी जबाबदारी माझ्यावरच. आत्तासुधा हे लीहीत असताना त्यांचा तो खर्जातला गलका माझ्या कानात तस्साच आहे. ते डराव डराव चं समुहगीत ऐकून आता किती वर्ष झाली कुणास ठाउक.
ह्याच दिवसात यायच्या त्या गोगलगायी. चालताना पायाखाली एखादीजरी गोगलगाय आली तरी प्रचंड किळस यायची, त्यात दोन प्रकार आठवतात, एक शंखाची गोगलगाय आणि एक बिनशंखाची. शंखाची गोगलगाय खुप शांत, कागदावर घेउन आम्ही बाहेर सोडुन यायचो, कध्धीच त्रास नाही द्यायचो, पण बिनशंखाची गोगलगाय खुप किळसवाणी, बोटभर लांब, दोन्ही टोकाला निमुळती, आपल्याच स्त्रावाची बारीक रेघ बनवत त्यावरुन सरकत येणारी ती वस्तु बघितली कि आम्ही डोळे मिटुन, एका जाड पुठ्ठ्यावर घेउन ती लांब बाहेर फेकायचो.
पहिल्या पावसाच्या आधी आठवडाभर अचानक एका संध्याकाळी 'चाचड' दिसायला लागायचे, म्हणजे इकडे पंखाच्या मुंग्या म्हणतात ते. अचानक यायचे कुठुनतरी खुप संख्येने, हे दिसायला लागले की आम्ही ओळखायचो की आठवड्याभरात पहिला पाउस नक्की. संध्याकाळी सगळे दिवे बंद करुन बसावं लागायचं. बरोबर प्रकाशाकडे आकर्षीत होतात हे कीडे. कधीकधी एक कागद तेलात बुडवुन ट्युबला दोर्याने बांधुन ठेवायचो चाचड येउ नयेत म्ह्यणुन. कमी यायचे त्यामुळे, पण यायचेच. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती तर हजारोंच्या संख्येने असायचे.
आमचं घर कडीपाटाचं, त्यामुळे पाली पण असायच्या भरपुर, सारख्या चुकचुकायच्या संध्याकाळच्या वेळेला, रात्री अंधुक प्रकाशाची डोळ्याला सवय झाल्यावर एखाद्या पालीची किडे पकडण्यासाठीची शांत तपश्चर्या बघताबघताच झोप लागायची.
मुंगळे जमात खुप मजेशीर, सारखे आपले गडबडीत, तुरुतुरु कुठल्यातरी मोहीमेवर, चावल्यावर खुप झणझणायचं. पण ह्याचे निरिक्षण घरापेक्षा अंगणात करायला मजा यायची. समोर आलेल्या काट्याकुट्यातुन, दगडातुन मार्ग काढुन स्वारी धावतेय पुढे. यांच दिशेच भान खुप आश्चर्यकारक असतं, तुम्ही बोटाने कीतीही लांब उडवा, दोनतीन मीनिटात पुन्हा आहे त्या ठिकाणी येउन प्रवास चालु.
मुंग्यांमधे लाल मुंग्यांची फार भीती वाटायची, कधी चुकुन पाय पडला तर मी खुप जोरात थयथयाट करायचो जागच्याजागी. पण काळ्या मुंग्यांच्या वाटेला मात्र कधीच गेलो नाही, का कुणास ठाउक, खुप आदर वाटायचा ह्या काळ्या मुंग्यांच्याविषयी, ह्यांना धावर्या मुंग्या का म्हणतात ते बघितल्याशिवाय लक्षात नाही यायचे तुमच्या.
माती उकरताना कधीतरी गांडुळ दीसायचं पण लगेच वळवळत मातीच्या ढिगात नाहिसं व्हायच,
आमच्या गावाला खिंडीतल्या गणपतीला जाताना, पावसाळ्यात 'पैसा' दिसायचा, शेकडो पाय असलेला, तपकीरी लाल रंगाचा हा किडा, काडिने थोडा स्पर्ष केला तर लगेच ते शेकडो पाय पोटाशी आवळुन घेउन, अंगाचा अगदी बंद्या रूपायासारखा गोल करुन, घरंगळत जायचा. ह्याच गणपतीच्या बाहेत प्राजक्ताचा थोरला पार होता, रातराणी, चाफाही होता. ह्या पारावर रात्री आठच्या सुमाराला, खुप काजवे जमा व्हायचे, सतत हवेत उडत असायचे. त्या काळ्या कातळावरुन शांतपणे चालत जाणारा, एका लयीत लुकलुकणारा काजवा परत कधी तसा दिसला नाही.
खुप काही मिळवुन दिलय ह्या सगळ्यांनी मला, शब्दांत नाही सांगता येणार सगळं. अगदी एकटं एकटं वाटायचं तेव्हा हि सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली, आणि नकळत माझ्या बालपणाचा भागच बनुन गेली. अजुन भरुन येतय ते सगळे हरवलेले क्षण आठवुन.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
आत्ता ह्याक्षणी मी परत त्याच ठिकाणी गेलो तर दिसतील का हे सगळे मला, का माझीच नजर बदललीये.
मस्त लेख ! आवडला. माझ्या पण
मस्त लेख !
आवडला.
माझ्या पण लहानपणच्या गावी घालवलेल्या सुट्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्या अंगणातच एक मोठे कडूनिंबाचे झाड आहे. त्याच्या खोडावर अगदी त्याच रंगाचे त्रिकोणी तोंडाचे खूप किडे असायचे. गावात तेव्हा वीज आली नव्हती. शेणाने सारवलेल्या अंगणात लिंबाखाली आम्ही बाजा ( खाटा ) टाकून झोपायचो. खाली बेडकांच्या लीला चालू असायच्या. रात्री कधी खाली पाऊल टाकावं लागलं तर हमखास तो गिळगिळीत स्पर्श पायांना व्हायचा..
अजून खूप आठवणी येतायत..लिहीन कधीतरी.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
लेख आवडला.
माझ्याही गांवाकडच्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी किटकांचे विश्व फार मजेशीर वाटायचे. चतुर, शेणमाशी, गोचीड्या, काटक्यांसारखे टोळ, पैसे, गोम, पोपटी रंगांचे टोळ, डेंगळ्या, असे अनेक आणि कितीक किटक दिसायचे. श्रावण-भाद्रपदात फुलपाखरांचे रंगीबेरंगी थवेच्याथवे शेतातून, गवतावरून हिंडत असायचे. आम्ही ती मारण्यासाठी झुडपे उपटून त्यांच्यामागे पळायचो.
एवढ्यातच, साधारणपणे ५-६ महिन्यापूर्वी मी एक माशीपेक्षा थोडा छोटा एक किटक बघितला त्याचा रंग झळाळणार्या सोन्यासारखा होता. मी तो पकडून एका काचेच्या छोट्या पेटीमध्ये काहीवेळ निरिक्षणासाठी ठेवून दिला होता. नंतर सोडून दिला.
बाकी..
खाली बेडकांच्या लीला चालू असायच्या. रात्री कधी खाली पाऊल टाकावं लागलं तर हमखास तो गिळगिळीत स्पर्श पायांना व्हायचा.. घाबरगुंडी ... हा..हा..हा..
चार्ल्स डार्विनने किटकांमधले आणि प्राण्यांमधले असे अनेक लिलावती आणि लिलाधर न्याहाळून ग्रंथ लिहीले आहेत.
सुंदर आठवण
अर्धवट राव चांगल्या आठवणी जाग्या केल्यात. साप विंचु घरात निघायचे. गावात भैरवनाथाचे देउळ होते भैरोबाला रविवारी तेल वात घातली की घरात विंचु काटे निघत नाही अशी दृढ समजुत होती. माझ्याकडे तेल वात घालायचे काम असायचे. एकदा टंगळमंगळ केल्यानी तेलवात घातली नाही. नेमका विंचु का साप निघाला घरात. मला अपराधी वाटल.घरात आईला शिवायच नसताना जर घोंगडीला जरी शिवल तरी विटाळ व्हायचा. त्याचे प्रायश्चित्त म्हणुन गायीला हात लावून यायच. एकदा तेही केल नाही तर विंचु निघाला. झाल अधिकच समज दृढ होत गेले.
शेतावर फुलपाखरे सरडे मारायाला मजा यायची. आता त्यातला क्रुरपणा जाणवतो. गांधील माशा हमखास चावायच्या. तुळशीची माती लावायची त्यावर मग आग थांबायची.नाकतोडे खरोखरच नाक तोडतो अस वाटायच. मुंग्यांची वारुळांची भीती वाटायची आतुन साप बाहेर आला तर?
बालपणीची दुनियाच काही और!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
मस्त!!!
मस्त!!!
क्या बात है
काडेपेटीत सुरवंट पाळण्याचे उद्योग आम्हीही केलेत नि त्याबद्दल बेक्कार मार पडलाय. अर्थात या सुरवंटांनी आम्हाला भरपूर प्रसाद दिलेत. आम्ही ज्या एका पत्र्याच्या खोलीत राहत होतो त्याच्या पाठीमागच्या बाजूला मागच्या वाड्यात एक प्राजक्ताचे झाड होते (सकाळी सकाळी तो सडा पडलेले ते घर अजूनही हळवे करते. एकदा बैठे घर बांधून त्यासमोर असा प्राजक्त लावावा असे स्वप्न अजूनही आहे) त्यावर थंडीच्या दिवसात असंख्य सुरवंट दिसू लागत. ते रात्रीच कधीतरी छतावर पडत नि हळूहळू घरात प्रवेश करीत. रात्री कधीतरी टपकन अंगावर पडत. अंगभर पांघरुण नि चेहरा उघडा त्यामुळे चेहर्याला प्रसाद मिळे. त्यामुळे थंडीत बरेच दिवस गाल सुजवून हिंडायची वेळ येई.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>एकदा बैठे घर बांधून
>>एकदा बैठे घर बांधून त्यासमोर असा प्राजक्त लावावा असे स्वप्न अजूनही आहे
येताव का शेठ सोलापूरला आमच्या घरी??? बैठ्या घरासमोर प्राजक्त आहे.. अंगणात चुचुसाठी झोका पण आहे..
वा अरर्धवटराव.. तुमच्या लेख
वा अरर्धवटराव.. तुमच्या लेख सुंदर आहे... व तुमच्या लेखामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...!
लहानपणी अहिंसा परमो धर्म || गळी उतरवण्यात घरच्यांचा व पाहुण्यांचा पुर्ण वेळ खर्ची पडला....
असो... नाकतोड्या पासून अगदी सरड्यापर्यंतचे जीव आमचे मित्र, घरामागेच शिवार आहे व समोर शेत... त्यामुळे घुशी, साप हे तर आमचे खास दोस्तच.. !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त
मस्त लिहलय. खरच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही लहानपणी लाईटकिडा (काजवाकिडा) पकडायचो, त्याची आठवण झाली.
मस्त लेख
आम्हाल आजुन ही किड्यांचा नाद आहे.
ती इथे पहा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त
मस्त
मस्तं. आम्ही पण लहानपणी खूप
मस्तं. आम्ही पण लहानपणी खूप सरडे मारायचो.
त्याची आठवण झाली.
-पुण्याचे पेशवे
गुर्र
द्रुष्ट कुठ्ला. देव्बाप्पा शिक्शा करनार तुला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ख त र ना क ले ख रे मि त्रा
ख त र ना क ले ख रे मि त्रा !!!
आमच्या लहाणपणी किडे मारण्यापेक्षा करण्यात जास्त मजा होती ..पण " गोम " नावचे सरपट मी ईतक्या-वेळा मारलीय की ..आमच्या बोलण्यातली गोमच निघुन गेली...
+ १
+ १
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान आठवणी
लहानपणि पैसा बघण्यात मजा वाटायचि. कधि त्याला मारले मात्र नाहि. एक उड्णारा किडा आहे लांब शेपटिचा. त्याच्या शेपटिला दोरा बाधायचो. हा क्रुरपणा होता हे आता जाणवते. नाकतोड्याचि का माहित नाहि पण भिति वाटायचि
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
तो
ड्रॅगन फ्लाय किंवा चतुर. हे अनेकरंगी असायचे. लाल, पिवळे, हिरवे, निळे. प्रत्येक रंगाचा एक तरी पकडायचा असे सूत्र होते. एका पुड्याच्या दोर्याला सैलसर गाठ बनवून ठेवायची. कुठे हे महाराज निवांत बसले की दोर्याची दोन्ही टोके धरून ती गाठ हळूच शेपटीभोवती गळ टाकावा तशी टाकायची नि दोन्ही बाजूने हलकेच ओढून घट्ट करायची. मग दोर्याचे एक टोक धरून पतंग उडवल्याची ऐट मिरवायची. खेळ संपला की सोडून द्यायचा त्याला. म्हणून काही वेळ याला पतंग असेच म्हणत. पण 'प्रीत पतंगाची खरी...' वगैरे मधला पतंग लै फेमस झाल्याने याचे चतुर हेच नाव जास्त प्रसिद्ध असावे. आमच्या शेजारचं एक पिल्लू त्याला 'हेलिकॉप्टर' म्हणायचे, हेलिकॉप्टर जसे हवेतच स्थिर राहू शकते तसा हा राहू शकतो म्हणून. चार-पाच वर्षाच्या त्या पोराची निरीक्षणक्षमता नि तुलना करण्याची अक्कल पाहून मी खूष झालो होतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
भौ.. आम्हीपण म्हणायचो.. आमचं
भौ.. आम्हीपण म्हणायचो.. आमचं पण कवतीक करा की..
पण आम्ही हेलीकॅप्टर म्हणायचो
हो
सगळी चॅप्टर पोरं हेलिकॅप्टरच म्हणतात. (झालं ना कवतिक?)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हॅ हॅ हॅ ! चॅप्टर आहात हां
हॅ हॅ हॅ !
चॅप्टर आहात हां दोघं
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बिन शंखाच्या गोगलगाइला आम्ही
बिन शंखाच्या गोगलगाइला आम्ही शेंबडी म्हणायचो. एक आणखिन लाल रंगाचा किडा मिळायचा. मखमली सारखा
हाता लावला की पाय जवळ घ्यायचा. त्याला आम्ही लाल गाय म्हणायचो. आता तो दिसत नाही. कोणी पाहिला
आहे का इतक्यात.
वेल्वेट चा किडा म्हणायचो
वेल्वेट चा किडा म्हणायचो आम्ही..
आणि धन्यवाद सायेब.. 'शेंबडी' नावच विसरलो होतो मी..
>>>त्याला आम्ही लाल गाय
>>>त्याला आम्ही लाल गाय म्हणायचो. आता तो दिसत नाही. कोणी पाहिला
आहे का इतक्यात.
पैसा का ???
त्याला बघून तर वर्षानू वर्ष झाले आहेत.........
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लहानपणीच्या आठवणी जाग्या
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, मस्त लिहलय.
छान लिहिला आहे!!!
लहानपनी बरेच कीड़े केले आहेत तुम्ही!!!
छानचं.... मस्त लिहिला आहेत
छानचं....
मस्त लिहिला आहेत लेख
नाही पॅसा नाही. हा लांब नसतो.
नाही पॅसा नाही. हा लांब नसतो. गोलाकार असतो.
मेरेको आवड्या
मेरेको आवड्या
छान लेख!
छान लेख!
सुरवंटावरुन आठवण झाली ती भिंगोट्याची (भुंग्याची), आम्हीही काडेपेटीत अशी भिंगोटे जमा करायचो,
त्याला खाण्यासाठी म्हणून बाजरीचं पीठ ठेवत असु. थोड्या दिवसांत ते भिंगोटे अंडी घालत असत, त्यावेळी खुप मजा वाटत असे.
मंगेश खैरनार
http://mangeshkhairnar.com