इंडिया इन स्लो मोशन

अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे "सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्यांच्या आत्महत्या काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सवा|तून "सारे जहाँसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.