महात्मा

हिंदू धर्म हा जगात अत्यंत पुरातन आणि समृद्ध विचारधन पुरवणारा मानला जातो. परंतु या धर्माला काही अत्यंत हीन रूढी, परंपरा, अन्याय्य धर्मवचने जातीव्यवस्था, अस्पृश्यता या आणि अशा अनेक दोषांनी घेरलेले होते. अस्पृश्यता, स्वत:च्या स्वार्थासाठी ब्राह्मणांनी माजवलेले अन्याय्य कर्मकांड यामुळे बहुजनसमाज हा अत्यंत दु:खी जीवन व्यतीत करीत होता. अन्याय, अपमान, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत या समाजाचे सारे चौतन्य हरपलेले होते. अशावेळी महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यता निवारण, देवदासी प्रथा निर्मूलन, पर्यावरण, शेतीसुधारणा, तंत्रशिक्षण अशा अनेक दृष्टींनी अत्यंत मौलिक कार्य केले आहे. नव्या युगासाठी नवे मानवी कायदे असावेत हा त्यांचा हट्ट होता. सार्वजनिक सत्यधर्माचा अंगिकार हा त्यांचा मूलमंत्र होता. माणसामाणसात भेद करणार्या पाखंडी धर्मविचारापासून समाजाची मुक्तता करून गोरगरीबांना शूद्रातिशूद्रांना जन्मजात मानवी हक्क निर्वेधपणे उपभोगता यावे यासाठी त्यांनी अखंड परिश्रम केले. आधुनिक महाराष्ट्राच्या वौचारिक संक्रमणाला महात्मा फुले यांनीच प्रथम गती दिली. सामाजिक अन्यायामुळं दीन बनलेल्या प्रत्येकासाठी ते धावून गेले. स्त्रीशिक्षणाची त्यांनी दिलेली देणगी हा समाजोद्धाराचा फार मोठा टप्पा आहे. अशा थोर व्यक्तीचं जीवनचरित्र अत्यंत ओघवत्या भाषेत या पुस्तकात मांडले गेले आहे. आजच्या काळातही मार्गदर्शक ठरणारी क्रांतीदर्शी चरितकहाणी